savitalote2021@bolgger.com

विरह कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विरह कविता प्रासंगिक कविता प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

पुन्हा भेटावेस तू

पुन्हा भेटावेस तू 

पुन्हा भेटावेस तू
अशी इच्छा हृदयी
येऊन गेली
या बंदिस्त मनाच्या स्मृतीआठवणीत

पुन्हा भेटावेस तू 
तेच कळया जुळवून माळरान गुंफीत 
केसात माळावे तुझ्या हाताने 
मनाच्या आनंदात फुलावे 
पुन्हा मिळून 

पुन्हा भेटावेस तू 
नयनी भाषेच्या सोबत 
शब्दविना सांगावे तू 
तुझे शब्द 

पुन्हा भेटावेस तू 
मला माझे अस्तित्व सांगण्यासाठी 
येणाऱ्या वादळ वाटेवरून सावरण्यासाठी भेटावेस तू!
           सविता तुकाराम लोटे 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...