savitalote2021@bolgger.com

Marathi kavita आंबेडकरवादी कविता सामाजिक कविता सकारात्मक कविता विद्रोही कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi kavita आंबेडकरवादी कविता सामाजिक कविता सकारात्मक कविता विद्रोही कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २० मे, २०२१

फरक फक्त इतकाच

मला माहित आहे 
तुला माहित आहे 
माझ्या पायाखाली जमीन आहे 
तुझ्या पायाखालीही जमीन आहे 

माझ्या डोक्यावर आकाश आहे 
तुझ्या डोक्यावर ही आकाश आहे 
पण ! तुला हे माहित आहे का? 

अनिष्ट रूढी परंपरेच्या नावावर 
बांधलेले  मडके, खराटे...
ओंजळभर स्वच्छ 
पाण्यासाठी.....झालेला सत्याग्रह 

मला माहित आहे 
तुला माहित आहे 
माझ्या तुझ्या पायाखाली जमीन आहे 
डोक्यावर आकाश आहे 

पण तुला माहित नाही 
माझ्या पायाखाली जमीन ...आकाश 
यासाठी कितीतरी 
पिढ्या गुलामगिरीची.... 
हुकूमशहा प्रवृत्तीची ठरली आहे 
बळी.... 

मला माहित आहे 
तुलाही माहित आहे 
तुझ्या माझ्या पायाखाली 
एकच जमीन आहे 
फरक फक्त इतकाच 

माझा तुझ्यातला
.....त्यासाठी करावा लागला नाही 
तुला,  कधीही संघर्ष!!!
      

          सविता तुकाराम लोटे 
----------------------------------
         

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...