savitalote2021@bolgger.com

कविता माझी रमाई सामाजिक कविता स्त्री कविता सकारात्मक कविता संग्रह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता माझी रमाई सामाजिक कविता स्त्री कविता सकारात्मक कविता संग्रह कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ९ मे, २०२१

माझी रमाई

------माझी रमाई ------
अपार कष्ट करुनी झिजली 
माय रमाई आम्हासाठीच
भिमाचा संसार प्रवास ओढीत
बौद्धिक- मानसिक शक्तीप्रतिमा... 
भिमाची!!!
आयुष्याचा प्रवास 
खडतर 
एका वस्त्रानिशी... सोबत; उपाशीपोटी 
काटेवरती चालती....
सुसंस्कृत माझी माय माऊली रमाई
सौभाग्य हाच तिचा दागिना 
ना शालुत नटली ना सोन्यात नटली 
हातात क्रांतीची मशाल घेऊन 
ज्ञानाची प्रकाशवाट दाविली 
संघर्षाची... जळती मशाल 
माझी माय माऊली रमाई
भुकेल्या वस्तीगृहातील खंबीर... 
प्रेरणाशक्ती तूच !
आणि भीमाची हृदय संवेदनाही तूच 
आम्हा सर्वांची कीर्तिवान माय माऊली 
माझी रमाई!!!
           ----सविता तुकाराम लोटे ---- 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...