savitalote2021@bolgger.com

शनिवार, २४ डिसेंबर, २०२२

मनातले बोलताना ....💔

मनातले बोलताना ....💔

      मी एकटीच पळत आहे असे वाटत असेल तुला पण तसे नाही. अजूनही तुम्ही पळत आहे सोबत माझ्या तुझ्या मनातील विचारांमध्ये.
        मनातले बोलताना एकच वाटते तू मला माझ्या तुझ्या स्वप्नांच्या आयुष्यातून वजा केले ठीक आहे. पण तू आता कशाला शोध घेत आहे माझ्या नयनातील एकट्या भावनेसोबत.
        गतकाळातील शब्द म्हणून म्हणते, मनातले बोलताना सांभाळून तुझेही डोळे बोलके होतात पण मी नाही शोधत त्यात माझे अस्तित्व..! कारण माझ्या मनातले बोलताना तू नसतोच तिथे कधी.
         कारण सांगू तुला विचारांच्या शब्दांमध्ये कधीकाळी असलेला तू आता डिलीट झाला आहे. तू दिलेल्या जखमा तेवढ्या मनावर ओरखडे घेऊन आहे. त्याही जाते त्यात कुणी येऊ पाहत आहे आणि मी येऊ देणार आहे.
       नको शोधू आता तुझी अस्तित्व माझ्या कोणत्याही शब्दांमध्ये भावनेमध्ये तू फक्त माझ्यासाठी गेलेली वेळ आहे. येणारी वेळ माझी आहे.
         मनातले बोलताना स्वतः स्वतःशीच मी खूप खुश असते. गेलेली वेळ माझी नव्हती पण तरी वेळ कुणीतरी खोट्या शब्दांवर रचलेली होती. खोटा स्वप्नांवर रचलेली होती.
     बर झाल वेळेने मला थांबविले. तीही बोलली तिच्या मनातले म्हणून तर आधी वेळ समाधानाचे म्हणून म्हणतो थोडे मनातले बोलत जा आपल्या हळव्या मनाशी तीही वाट दाखवीते. आपल्याला आपल्याच अस्तित्वाची..!
        तुझे असणे नसणे आता फरक पडत नाही. तुझ्या असण्याच्या खुणा आता काहीही मनात शब्द उमटवीत नाही. नकोस असेही वाटत नाही. राग येत नाही. प्रेम येत नाही. शब्द ओले होत नाही. आणि खरं सांगू, का? 
      जाऊ दे! नाही सांगत ... ? तरी पण सांगून देते, तुझे अस्तित्व इतरांसोबत जे तू निवडलेले. मी असताना हाच संस्कारातील फरक..!! 
       माझ्या - तुझ्या इथेच पडतो. शब्दांमध्ये फरक आता असणाऱ्या अस्तित्वात सोबत समाधानाने राहा.  प्रत्येक वेळी एकच चूक करू नको. मी सांभाळले समोर गेले चालत गेले एकटीचा प्रवास स्वीकारला. मी तू असूनही अस्तित्वात...
         पण गेलेली वेळ कधीही परत येत नाही हे सत्य स्वीकारले मी. म्हणून सांगते, तुला माझ्या मनातले तुझ्याशी बोलताना. विसर आता तुझ्या मनातील आठवणी आठवणींचा कल्लोळ आणि वास्तवातील वास्तव यामध्ये खूप फरक आहे म्हणून दोन दगडावर चालताना तोल  जाणारच आहे म्हणून वास्तविक ते मध्ये जग.
        नको शोधू माझे अस्तित्व अशा कोणत्याही समाज माध्यमांमध्ये कारण मी सतत असते कुठे ना कुठे. माझ्या शब्दांच्या अस्तित्वासोबत वास्तवात पण त्यात तू कधीच नसतो. माझ्या ओला भावनांमध्ये, माझ्या शब्दांमध्ये, माझ्या विचारांमध्ये,माझ्या भाव विश्वात.
        कारण मी save केलेले सर्व काही डिलीट delete केले आहे. मेंदू स्वच्छ आरशासारखा करून ठेवलेला आहे. त्यात फक्त आता, "मी आणि मी" आहे. हसऱ्या चेहऱ्यावर हसूच आहे. मनसोक्त..! त्यात कुठेही वादळ नाही, कुठेही पानगळ नाही, कुठेही ओल्या भावनेचा चिखल नाही आणि शेवाळ.        हे मनातले बोलताना मी एकटीच पळत आहे. पळता पळता थकेल थोडी विश्रांती घेईल पण पळत राहील. उडत राहील. गरुडएवढी जरी झेप घेता येत नसेल तरी सुद्धा छोट्या पक्षा इतकी तरी झेप घेईल नक्कीच..!
      कारण वास्तव अजून माझ्याजवळच आहे. पंखच माझ्या जवळच आहे आणि या पंखांना बळ सुद्धा देण्याची ताकद शक्ती हिम्मत माझ्यातच आहे. म्हणून मनातले बोलताना सांगते, मी एकटीच कळेल अस्तित्व शोधू नको. माझ्या त्या कोणत्याही शब्दात तुझे तुझ्या मनातले बोलताना तुझ्याशी तू.
         शेवटी एकच सांगते, मला माझ्याशी मनातले बोलताना हम तेरे सहारे नही है और हम किसी को अपने सहारे रखते नही.  कारण अस्तित्वाची लढाई ही स्वतःलाच जिंकायचे असते त्यात कुणीही नसले तरी स्वतः मात्र प्रामाणिक असायला हवे.

    " मी एकटीच माझ्या अस्तित्वात तुझ्या 
     खोट्या अस्तित्वापेक्षा माझे अस्तित्व 
     कधीही खरे मनातले बोलताना....!"

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

******❤❤❤💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔❤❤❤******

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...