savitalote2021@bolgger.com

गुरुवार, २३ मे, २०२४

चुकलेली वाट आपण होतो !


      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रियसी आपल्या मनातील भावना या शब्दात मांडत आहे, हे सत्य तिला पचवता येत नाही याच भावविश्वातून ही कविता...!💕

**** चुकलेली वाट आपण होतो ****

पाहिलेले सर्व स्वप्न सुंदर नसतात 
कधी ते वाट चुकलेला वळणासारखे संध्याकाळच्या काळोखा सारखे 
तर कधी सावली सारखे काळे असतात 

दडपण मात्र सतत असते 
गोळा केलेल्या गोंधळासारखे 
जगताना सतत ठेच लागावी 
असे स्वप्न असतात 

अडखडलेल्या पावलांनी संघर्षावर 
मात करेल व्यक्त होतो आपण 
पण त्याला कुठे कळते 
आपले सुंदर स्वप्न 

आपलेच दडलेले 
त्याला कुठे कळते आपले मन 
रक्तबंबाळ वेदनेने भरलेले असते 
तो तर इतकेच सांगत राहतो 

चुकून वळलो मी तुझ्याकडे 
चुकलेली वाट आपण होतो
हे मनाला समजावताना सुद्धा 
प्रेम कमी होत नाही 

डोळ्यातल्या समुद्राला आठवता येत नाही स्वप्नाच्या किनाऱ्यावर धावल्यामुळे 
मागे वळवता येत नाही 
वेळ गेलेली असते 

वेळ निरोपाची असते 
संध्याकाळच्या काळोखायच्या आधी 
रंगांच्या उधळण सारखे हरवलेली 
कुठेतरी मन त्या जुन्या आठवणीत 

त्या जुन्या आठवणीत 
चुकलेली वाट आपण होतो !
या शब्दासोबत 
या शब्दासोबत

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

--------------------------------------------------------------------------

       The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.  Beloved is expressing her feelings in words, this poem is from the feeling that she cannot digest this truth...!💕

 *** We were the wrong way ***

 Not all dreams are beautiful 
 Sometimes it is like a lost turn, like the darkness of evening 
Sometimes they are as black as a shadow 

 But the pressure is constant 
 Like a collected mess 
 There should be constant stumbling   blocks while living 
 Such dreams exist 

 On the struggle with stumbling steps 
 We express that we will overcome 
 But he knows where 
 Your beautiful dream 

 Your own hidden 
 He knows where your mind is 
 Blood clots are full of pain 
 That's all he keeps saying 

 I accidentally turned to you 
 We were on the wrong path
 Even while explaining this to the   mind 
 Love never fails 

 The sea in the eye can't remember   For running on the shore of a dream 
 Cannot be reversed 
 Time has passed 

 It's time to say goodbye 
 Before dusk 
 Lost like a burst of colors 
 Somewhere in that old memory 

 In that old memory
 We missed the way!
 With this word
 With this word

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

        Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

--------------------------------------------------------------------------


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...