क्षणी फुललेल्या ओंजळीत भरतांना मनात किती आनंद आनंद होत असतो आणि तोच क्षण मनासारखं नसताना ओंजळीत भरतांना मनाला आनंद होईलच असे नाही.
ओंजळ आपली... पण ती किती भरलेली आणि किती रिक्त हे माहीत नसते.
ओंजाळ म्हणजे आपल्या दोन्ही हाताची एकत्र आलेली एक प्रतिक्रिया पण ती येते तेव्हा भरपूर काही आपल्या त्यामध्ये ओंजळी मध्ये येते त्याला किती मोकळे सोडायचे की जणू जपून ठेवायचे हे त्या क्षणावर अवलंबून असते. वाकलेल्या त्या क्षणाला ओंजळीत
ठेवण्यापेक्षा आनंदी क्षणाला सांजवेळी सुद्धा आपल्या ओंजळीत ठेवावे मनाला ते कळू सुध्दा न देता! मूक भावनेने आणि ओल्या श्वासाने व फुललेल्या स्वरबद्ध संगीताने.
सविता तुकाराम लोटे