savitalote2021@bolgger.com

सामाजिक कविता स्त्री कविता संग्रह कविता सकारात्मक कविता aayushavar kavita आरसा कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सामाजिक कविता स्त्री कविता संग्रह कविता सकारात्मक कविता aayushavar kavita आरसा कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

जरा बदलून बघं ...

**** जरा बदलून बघं ....****

तुझे विचार सापडतील 
तुला तुझी नवीन ओळख 
तुझ्या पायातील पैंजण 
बेडी नसून अभिमान आहे 
तुझा स्त्रियात्वाचा 
जरा बदलून बघं ...
तुझे मनभावना तुला सापडतील 
त्यात नवीन संकल्पना 
तुझ्या नात्यातील 
सापडेल तुला तुझ्यातील 
स्वाभिमान कुंपणाच्या आतच 
जरा बदलून बघं... 
तुझ्यातील सरळपणा...
येईल तुझ्यासमोर तुझीच नवीन 
ओळख; तुझ्यातच नवीन प्रकाश 
तुला वाट दाखवेल चोहीकडे 
अंधारमय कुंपणात 
दिवा होऊ नकोस 
फक्त प्रकाशासाठी 
नष्ट होण्यासाठी 
नष्ट झाल्यावर मागे थोडीफार 
अस्तित्व ठेवण्यासाठी 
तू हो अस्तित्वाच्या प्रकाशलाटेत 
प्रकाशाची लाट... अनंत 
जरा बदलून बघं .....
जरा बदलून बघं..!!!!!

            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-    जरा बदलून बघं ....

             आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...