अंगणात फुलता फुलता
आज कुंडीतही फुलली
हसली उगवता सूर्यसोबत
हसली पानांवरील दवबिंदुसोबत
मनाच्या आत अबोल झाली
तरी स्वप्न रंगविली
तेज सूर्यकिरण्यांसोबत
झाली सांजवेळ... परत हसली
गोड ...मावळतीच्या
उधाणलेल्या रंगासोबत
रुसून बसली अंधारात
अबोल होऊनी रात्रकिडण्यांसोबत
नव पहाटेच्या सप्तसुरांची
रंग उधाळणीसोबत
बोल होतास
परत फुलली अंगणात...
कुंडीत...
अबोल नजरेने सूर्यासोबत
अबोल होऊन
अबोल हसली !!
©️✍️सविता तुकाराम लोटे