एकतर्फी प्रेमाची ही गोष्ट...❤💔! पारिजातकाचे पुष्प उगवणे आणि गळणे यातील जो कालावधी असतो तसेच प्रेम. विशेषता एकतर्फी प्रेमाची ही गोष्ट आणि हे प्रेम विसरणे कठीण असते.
......... अश्रूंचा थेंब ही आता त्या व्यक्तीचा राहिला नाही कारण सर्व काही चोरून नेले...💔❤!!
कविता स्वरचित आणि स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा..!!
*** स्मित हास्य ***
काळीज माझ चोरल
चोरी गेले माझ मन
पण चोरू शकली नाही
तुझे मन
तुझ्या स्मित हास्याने
हृदयाचे स्पंदन वाढले
पण माझ्यास वाढलेल्या
स्पंदनाने तुझे स्पंदन
वाढलेच नाही
तुझ्या स्मित हास्याने
विचारांचा काहूर माजल
नसलेल्या भावनेवर
भावनाही उत्तेजित झाले
पण तुझ्या भावनेमध्ये
भावनाच निर्माण झाली नाही
साधी आपुलकीची
तुझ्या स्मित हास्याने
सर्वच चोरून नेले
कदाचित ,स्वप्नही चोरून नेले
पण तुझ्यापर्यंत ते
पोहोचलोच नाही
ते स्मित हास्य इतिहास
जमा झाले आता
ते तुझ्यातील माणुसकीचे होते
त्यावर रचलेली माझी रांगोळी
कधीही रंगीबेरंगी नव्हती
ती निर्माणच झाली होती
रंगहीन होण्यासाठी
पण काही क्षणासाठी का होईना
तुझ्या स्मित हास्याने जगून
गेले कधीही न जगलेले क्षण
आणि जगण्याची आता
पायवाटही ते स्मितहास्य
चोरून गेले हृदयाचे ❤!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
This story of one sided love...❤💔! Love is the period between the flowering and falling of the Parijataka flower. Attribution is the story of one-sided love and this love is hard to forget.
......... The teardrop is no longer that person's because everything has been stolen away...💔❤!!
The poem is composed and handwritten. Don't forget to like and share if you like. Be sure to share your opinion in the comment box..!!
*** smile smile ***
Your smile
Kalij stole me
My mind was stolen
But could not steal
your mind
With your smile
Heart beat increased
But I grew up
Your vibration with vibration
Not increased
With your smile
Kahoor Majal of thoughts
On the feeling of not being
Emotions were also aroused
But in your spirit
The feeling did not arise
Of simple affection
With your smile
All stolen
Perhaps, the dream was stolen
But that's up to you
Not reached
That smile is history
Collected now
It was your humanity
My rangoli designed on it
It was never colorful
It was created
to become colorless
But why not for a moment?
Living with your smile
Gone are the moments never lived
And now to live
Even the path is a smile
Stolen heart ❤!!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
==========================================================
# मराठी साहित्य #विद्रोही साहित्य #मराठी कविता #मराठी चारोळी #मराठी लेख #हिंदी #इंग्रजी #मराठी कविता #सुविचार #डायरी #दलित साहित्य #आयुष्य कविता #सकारात्मक कविता #नकारात्मक कविता इत्यादी लेख
#Marathi Literature #Rebellious Literature #Marathi Poetry #Marathi Charoli #Marathi Articles #Hindi #English #Marathi Poetry #Thoughts #Diary #Dalit Literature #Life Poetry #Positive Poetry #Negative Poetry etc.
=============================