savitalote2021@bolgger.com

मंगळवार, ३१ जानेवारी, २०२३

***काळोख ****

       काळोख म्हणजे अंधार पण कधी कधी या काळोखा झालेला प्रवास मनाला खूप सकारात्मक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देतो. या काळोखानंतर येणारा उजेड खरंतर आयुष्याला नवीन सकारात्मक वळण देते....!!!

****काळोख ****
उध्वस्त झालेला प्रवास परत 
चालू झाला, त्याच काळोखात 
पळणारी झाडे अंधारासोबत 
चंद्राचा हलका प्रकाशात  
चांदण्याची सोबती 
मनाला परत हसण्याचा बळ देत 
सांगून जाते 
बघ चालू झाला ना प्रवास परत 
तुझा माझा तुझ्या मनासारखा 
हा काळोखी प्रवास सूर्याच्या 
पहिल्या किरणासोबत 
स्वप्नाच्या त्या वाटेवर घेऊन जातो 
तिथे फक्त प्रकाश असतो 
संघर्ष खूप जीवघेणा 
तरी हवाहवासा वाटणारा 
हा प्रवास काळोखातच करतो 
मला पहिला किरण शोधायचा असतो 
 याच काळोखी  खिडकीतून 
कधी सूर्याचा तर कधी स्वप्नांचा 
तर कधी मूठमाती दिलेल्या शब्दांचा 
काळोखाचा प्रवास उजेडाचा प्रवास 
खूप काही मिळण्याचा प्रवास 
संघर्षाला अर्धविराम 
स्वप्नांना स्वल्पविराम 
आणि आयुष्याला आणि 
आयुष्याला गती 
काळोखात उध्वस्त झालेला 
प्रवास सोबत...!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

------------------------------------

        Darkness is darkness but sometimes this dark journey gives the mind a very positive outlook on life.  The light that comes after this darkness actually gives a new positive turn to life....!!!


            ***darkness****
 Ruined journey back
 Turned on, in the same darkness
 Running trees with darkness
 In the light of the moon
 Companion of the moon
 Giving strength to the mind to smile back
 It goes without saying
 Let's see if the journey is back
 Your mine is like your mind
 This dark journey of the sun
 with the first ray
 Takes you on that path of dreams
 There is only light
 The conflict is very deadly
 However desirable
 This journey is done in the dark
 I want to find the first ray
 Through this dark window
 Sometimes of sun and sometimes of dreams
 And sometimes the words given with a fist
 A journey of darkness, a journey of light
 A journey to achieve so much
 A pause in the struggle
 Comma to dreams
 And to life and
 Speed ​​up life
 Ruined in darkness
 Along with the journey...!!
          ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
       If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
 The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
 Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤


=============================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...