जागतिक महामारी कोरोना व्हायरस ( Coronavirus) कधीही कुणालाही गर्दीच्या ठिकाणी किंवा सोशल डिस्टंसिंगचा वापर न केल्यास होतो त्यावर सुचलेली कविता ,"वेळ".
*** वेळ ***
कधीच कुणासाठी थांबत नाही
वेळेचे चक्र आणि वेळ, वेळेनुसार
चला. पण परिस्थिती समजून - उमजून
काळ वैऱ्याची आहे
दिवसाही ...रात्रीही...गर्दीचा
कोणत्याही स्थितीत....
कधी घाव घालेल माहित नाही
म्हणून जपून चला
आत्ताच
या क्षणाक्षणाला
विचार करा नियतीघाव घालेल
तर !!
आपआपली जपून पावले टाका
आयुष्याच्या परिस्थितीनुसार
वेळेनुसार जिंका वेळेला
आत्ताच ...
श्वास चालू ठेवण्यासाठी...