** समजूतदारपणा **
नको अपेक्षा करू
माझ्याकडून समजूतदारपणाची
मन ओरडत आहे
गहिऱ्या वेदनेच्या डोहात
वळसा घातलेल्या नौकेसारखे
तरंग उठतात लहान मोठे
वेदना अंती होईल असे
सतत वाटत राहते
पण मनस्थिती हुकुम
गाजवीत आहे
खोल डोहातील भोवऱ्यात
सातत्याने...
ओंजळीत शिल्लक आहे फक्त
काजळ राखआठवणींची
पैलतीर गाठताना
वर्षानुवर्ष
नियंत्रण नाही आता
समजूतदारपणाचे
अपेक्षा वाढल्या आहे माझ्या
माझ्याकडून प्रवास नयनातील
आसवांकडून
म्हणूनच
नको;
अपेक्षा करू ....
समजूतदारपणाची माझ्याकडून !!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- ***** समजूतदारपणा *****
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
Thank you !!!!!!!
************************************