वेटिंग रूमची ...❤!!
काही आठवणी खूप सुंदर असतात. काही आठवणी शब्दांच्या सोबतीने सोबत येतात. काही आठवणी वर्षांनुवर्ष हृदयाच्या कप्प्यात साठून राहतात. शब्द नसले तरी त्या आठवणी घर करून आपले स्थान वर्षानुवर्ष जपून ठेवतात.
कितीही पावसाळे गेले तरी त्या आठवणींचा संग्रह अगदी काल परवा झालेला प्रसंगा सारखीच राहते. ताजे टवटवीत आणि मनाला आपलेपणाची जाणीव निर्माण करणारी..!!
नयन माझे नयन त्याचे
भेट दोघांची एकाच क्षणाला
जसे नियतीने ठरवावे
क्षणात, मनात ..!!
त्याच्या - माझ्या भेटीचा
मुहूर्त प्रेमाचा❤❤
असेच काही झाले... ती आठवण म्हणजे मनाला खूप म्हणजे खूप ...खूपच आपली आहे. त्या आठवणीने आजही त्या क्षणाला अनुभवलेले सर्व आपलेपणा ...आपलेपणाची जाणीव ...आपलेपणाची मर्यादा आणि नकळत मनात वेगवेगळ्या शब्दांची गुंफण... खरच, ती आठवण म्हणजे माझ्या- त्याच्या आयुष्यातील सुंदर क्षण होते.
त्याच्या माझ्या रेशीमबंधाची एक नवीन ओळख होती. खरच त्याच्या माझ्या आयुष्यातील एक नवीन पहाट होती. ती पहाट कधीच उगवलेली नाही. तरी त्याच्या मनात आजही त्या पहाटेच्या कल्पनेनेच मनात आजही ती पहाट, ते क्षण, त्या क्षणातील शब्द....हृदयाच्या कुठेतरी बंद कपाटात साचलेली असेल पण त्यावर कुठेही धुळे साचलेली नसेल..!!
स्वच्छ आरशासारखी त्याच्या मनात आठवणीच्या स्वरुपात जागी असेल? जसे माझ्या मनात जागी आहे.
सांजवेळेची ऊन धूसर कलल्यावर
क्षणात सावलीची नवीन ओळख
निराळेपणाने अनपेक्षित क्षणात
नव्या ऊर्जेने
आताही त्याच ऊर्जेने
आठवणींच्या स्वरूपात
अमर्यादितपणे
शांत ....
पाण्यासारखी
पाणीदार नयनांनी..!!
माझ्या- त्याच्या त्या क्षणाला कधीही लोक साक्षी असले तरी मनातील चलबिचल फक्त आम्ही दोघे साक्षी होतो आणि सोबत आमच्यातील तो दुरावा, आमच्यातील दुरावलेला... नात्यातील ती ओळख. अनोळखी होती काही मिनिटापूर्वी ती व्यक्ती आता काही क्षणानंतर ती आपलीशी झाली. ओळखीची झाली. अनोळखी क्षण सारे ओळखीचे झाले त्याच्या - माझ्या अनोळख्या नजरेला आता ओळखीचा स्पर्श येऊ लागला. त्याच्या -माझ्या नयन भेटीला ओळखीच्या शब्दांची सोबत येऊ लागली. त्याच्या - माझ्या शब्दाविना संवादाला आता इतरांच्या नजरा चुकवीत शब्द येऊ लागले. नकळतच; आम्हा दोघांच्याही..!!
क्षणाक्षणाला फुललो आम्ही
क्षणाक्षणाला बहरला आम्ही
क्षणाक्षणाला हसलो आम्ही
क्षणाक्षणाला जगलो आम्ही
क्षणाक्षणाला अनुभवले प्रेम आम्ही
क्षणाक्षणाला संस्कार जिंकलो आम्ही
त्याच्या - माझ्या प्रेमाच्या
क्षण संस्कारांनी...!!
खरंच, क्षण किती अनमोल असतात. सार्या आसमंतात आम्हा दोघांच्या त्या संवादाला सहमती दिली होती. त्या क्षणांचे वर्णन अवर्णनीय आहे. त्या क्षणाला आज पर्यंत शब्दात मी कधीही बांधले नाही... बांधू शकले नाही. शब्दांच्या धाग्यात गुंफले नाही कारण त्याच्या माझ्या अनोळख्या प्रेमाला फक्त आम्ही दोघे साक्षी होतो आणि सोबत तो हसर्या आसमंत.
मनमुराद त्या क्षणांचा आस्वाद घेत. त्याच्या- माझ्या मनात प्रेमाचे अंकुर फुलवून हळूच गोड हळुवार नात्याची सुरुवात करीत होता. क्षण जात होते. तस तसे नाते फुलत होते. तस तसे मनात शब्दांची चाहूल नवनवीन वाटत होते.
खूप काही बोलून गेलो.... खूप काही ठरवून गेलो..... खूप काही अनुभव घेऊन गेलो आणि खूप काही क्षण जगून गेलो..!! असे वाटत होते. त्याच्या- माझ्या त्या मूक संवादाला आता अधिकच व्याकूळ होत होता. माहित नाही का? पण मन रडवेली होत होते. त्याचे - माझे तरीही , शांत भावविश्वात चेहऱ्यावरील भाव ठेवावे लागत होते.
फुलले अखेर हृदयात
त्या भावना नवनवीन शब्दांच्या
सोबतीने त्याच्या नयन
शब्दांसोबत त्याच्या - माझ्या
मनात...❤!!
जिंकला तो क्षण... जिंकला तो...! जिंकले त्याची नयन शब्द, त्याच्या भावना आणि त्याचे प्रेम. त्याच्या मनातील तळमळ पोचली माझ्या मनापर्यंत;तो जिंकला. तो हसरा आसमंत माझ्याकडे बघत बोलून गेला असे वाटून गेले जसे नाते फुलायचे तसेच ते फुलत जाते. त्याच्या माझ्या मनात नसले तरी क्षणाने फुलविले. कधीतरी इतरांच्या नयन शब्दांनी त्याला हवे असलेले, तो जिंकला... त्याचे प्रेम जिंकले... हा क्षण जिंकला. ही वेळ आपली नव्हती..? तर ती वेळ त्या नयन शब्दांची होती.
खरच असे होत असेल का? या प्रश्नांसोबतच त्याचा माझ्या नयन संवाद चालूच होता. नकळत त्याच्याकडे जाणारे मन क्षणात आत कुठेतरी हरवत होते. कुठेतरी ओळखीची खूण जपत होते. कुठेतरी मन हरवूनही मनातील प्रश्न शांत स्तब्ध आणि नसल्यासारखे झाले होते.
खरच असे होत असेल का??? त्याच्या माझ्या मनात खरंच एकाच वेळी एकच भावना येत असेल का आणि त्याचे उत्तर प्रत्येक वेळी होकारार्थी आणि फक्त होकारार्थी येत होते. त्याच्याकडून त्या संवाद नसलेला शब्दाविना नयन भेटीतून..!!
हरले मी त्याच्या प्रेमासमोर
हरवले मी मीच स्वतःला त्याच्या प्रेमासमोर
हरले मी त्याच्या व्याकुळ प्रेमासमोर
मन हरले,शब्द हरले, नयन शब्द हरले तरी ही संवाद चालूच अनोळखी व्यक्ती बरोबर ओळखीच्या नात्याने.
आज मनात राहून राहून त्या क्षणांच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या मनाला कुठेतरी घेऊन गेल्या कुठेतरी नाही त्याच जागेवर त्याच्या टेबलावर.... मुंबई छत्रपती टर्मिनस, रेल्वे स्टेशनवर. गाड्यांचा आवाज... माणसांचा आवाज.... गर्दीची रेलचेल आणि क्षणात झालेली शांतता. परत गाड्यांचा आवाज आणि हा सर्व मध्ये चाललेला एक प्रेमळ संवाद ..!!
आठवण खूप जुनी पण आता झाल्यासारखी काल-परवा होऊन गेलेले, तरी मनात त्या आठवणी बांधलेल्या आहे. त्याचा माझ्या संवादाविना प्रेमाला मी स्वतःही अंतिम क्षणापर्यंत पोहोचवु शकले नाही. तसे त्याचेही झाले असेल का?
ते पहिले प्रेम होते. पहिल्या प्रेमाची चाहूल होती.पहिल्या प्रेमाची सुरुवात होती. मनाचा कोपरा न कोपरा कुणीतरी शब्द कोरले होते... गुंफले होते. नवीन नात्याची ओळख करून दिली होती. नवीन भावनेची ओळख करून दिली होती. नवीन नात्यासोबत नवीन संस्कारांची भाषा माझ्या मनाला नवीन धाग्यामध्ये गुंफली होती.
गुंफले मी त्याच्या प्रेमात
गुंफले मी त्याच्या शब्दात
गुंफले मी त्याच्या मनात
गुंफले मी त्याच्या नजर भेटीत
गुंफले मी त्याच्या नयनात
स्वतःला स्वतःच्या नकळत
आणि ....💖
गुंतला तो माझ्या पाणीदार नयनात
गुंतला तो माझ्या साधेपणात
गुंतला तो माझ्या सौंदर्यविनाच
असलेल्या चेहऱ्यात...🌹
गुंतला तो माझ्या ओठांवरील हसूत
गुंतला तो माझ्या नयनशब्दात
त्याच्याही नकळत
माझ्यासारखाच
नवीन नात्यात..❤❤....!!
हा संवाद खूप वेळ चालू होता. जस जसा वेळ जात होता; तस तशी मनात हळूच भीतीने आपले साम्राज्य स्थापित केले होते. आतापर्यंत हसणारे डोळे अश्रूंनी भरले होते. त्याच्या माझ्या दोघांचाही नजरा आता शून्यवत होत चालल्या होत्या. आता संवाद निरोपाचा असावा असे वाटत होते.
संवाद निरोपाचा चालू झाला. संवाद आता ताटातुटी चालू झाला. संवाद आता फक्त विरहाचा चालू झाला. नयन ओले, नयनातील शब्द ओले, नयनातील संवादही ओला. आतापर्यंत खूप स्वप्ने रंगविणाऱ्या मनाने आता क्षणात हार मानली. नको दुरावा, नात्यात...., तरीपण त्या दुराव्याच्या कल्पनेनेच आता मन हलवून गेले.
मन उदास होत होते. तरी त्याच्या सोबतीने मन अधिक ताकतवान होते. अलौकिक शक्ती मिळत होती. तो येण्याआधी मनात जी भीती होती त्या भीतीने आता परत जागा घेतली होती. पण आता त्या भेटीची जागा विरहाच्या दुःखाने घेतली होती. दुराव्याच्या त्या क्षणाला समोर कसे जायचे त्या क्षणासाठी मनाला शक्तिशाली करीत होतो, आम्ही दोघेही ..!!
एकमेकांना हसत....परत भेटूया!!! वचनाने..! परत भेटू; याच शब्दाने. पण तो क्षण परत आलाच नाही. त्याच्या माझ्या आयुष्याच्या सुखद पानावर सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासाठी. त्याच्या माझा जीवन प्रवासात फक्त ते काही क्षण आले.
मनमोहक क्षणांना आता निरोप होता
मनात प्रेमाची झालर होऊन
त्यालाही कळले मलाही कळले
नात्याचे रुपांतर आता प्रेमात
झाले ...विरहाचे दुःख त्याचे माझे
क्षणातच येऊन पाहणारे
ओले नयन त्याचे माझे
आता माझ्यासारखेच
या आठवणीला खूप दिवस झाले
...नाही आठवण म्हणता येणार नाही. ते तर प्रेम होते. त्याने दिलेले मला.... मी दिलेले त्याला.... क्षण आपले होते.... क्षण माझे त्याचे होते. क्षण आम्हा दोघांचे होते!! क्षण आमच्या नयनांचे.... क्षण माझा शब्द नयनांचे.... प्रतिसाद आम्ही दोघांनी तिला एकाच क्षणाला.... एका शब्दात.... व्याकुळ नयन भेटीने ... नयन संवादाने.
रेल्वे स्टेशन वर आता गाड्यांचा आवाज येत होता. ही गाडी आता काही मिनिटात स्टेशनला येईल. हे सतत सांगितले जात होते. तस तसे मन अधिकच व्याकूळ होत होते. वेटिंग रूम डायरीवर नाव गाव पत्ता नंबर लिहीले जात होता.आता बाहेर जावे लागणार होते. आता त्याने आपली माहिती लिहिली माझ्या अधिकच अगदी गडबडीने माझ्यासमोर येऊन लिहिले.
त्याने माझ्याकडे पाहिले, मित्राला सांगू लागला ...मला ऐकू येईल त्या आवाजात पण मी मात्र न समजण्याच्या भूमिकेत. मीही माझी माहिती लिहिली... पण अर्धवटच.कारण माहीत होते तो क्षण विरहाचा होता. तो क्षण त्या क्षणापुरता मर्यादित होता तो क्षण आपला असला तरी तो आपला आयुष्यात न येणाऱ्या क्षणामधील एक होत्या.
तो क्षण आपला असला तरी आपल्या आयुष्यात न येणाऱ्या क्षणामधील एक होता.
विरह सुखाचे विरह व्याकुळतेचे
विरह माझ्या प्रेमाचा
त्याच्या माझ्या प्रेमळ क्षणांचा
...... शब्दही कमी पडतात त्यावेळेला शब्दात बांधण्यासाठी. आजही मनात त्याच भावना जाग्या होतात त्या आठवणीने मन परत इतकेच त्रास करून घेते स्वतःला.... या त्रासाला फक्त तोच जबाबदार नाही तर नयन भेट दोघांची हि झाली होती.
एकटाच प्रवास कसा असेल
जेव्हा नजर एक झाली तेव्हा
तू ही हसली होतीस की,
मनसोक्त खळखळून
मनातल्या मनात
एकमेकांच्या नजरेतील
संवादासोबत..
विरहाचे दुःख माझेच का?
दोष फक्त मलाच का?
मग एकटाच प्रवास कसा,
माझा प्रेम
भाषेच्या
विरहाचा..!!
रेल्वे स्टेशनच्या हॉल मधून बाहेर पडताना झालेला तो स्पर्श हळूच बोलून गेला. नको ना!! हा दुरावा ..!!त्याच्या हातातील बॅग बघत बोलून गेली.. sorry ... हळू! लागेल. पण त्याचे लक्ष नव्हतेच जणू. तो फक्त बोलत होता शब्दशिवाय संवाद साधत होता.सांग ना... आणि अशा अनेक प्रश्नांची साखळी माझ्यासारखीच त्याच्याही जवळ होती.
माझ्या सारखेच प्रेम फुलेल का? सांग ना ..!!माझे प्रेम तुला मान्य आहे का. तो क्षणात बोलून गेला. माझ्या हातातील बॅग हळूच बाजूला करीत बोलून गेला; Miss you... Savita आश्चर्याचा धक्का मला त्यावेळी बसला नाही जसे मी त्याचे नाव गाव पत्ता नंबर पाहिला असेल तसाच त्यानेही.
मी मौन होती. तो बोलत होता आता ही एक सारखा डोळ्यांकडे बघून ओठांची हालचाल चालूच होते विरहाचे दुःख सहन होत नव्हते व्याकूळ मन अधिक व्याकुळ होत होते मनाला समजावे कि त्याच्या मनाला कळत नव्हते मी मी समजावले माझ्या त्याच्या मनाला शब्दाने एकाच...sir ,प्लीज..!! तरीही तो त्याच भूमिकेत. मी ही त्याच भूमिकेतच..!! चल, ना!! गाडी आयेगी ना ..!!या वाक्याने.भानावर आलेलो आम्ही लक्षात आलेच नाही किती वेळ निघून गेला तो. मित्राच्या आवाजाने भानावर आलेलो आम्ही.
आता वेटिंग रूम मध्ये नव्हतोच. आता दूर गेलो. आता वेटिंग रूम नव्हती... आता नयन भेट होती फक्त दुरूनच. काही अंतराने. पण तरी संवाद चालूच होता. पुस्तकातून डोके वर करून वाचण्याच्या अभिनयाद्वारे... वाचण्याच्या बहाण्याने..!!
बहाण्या नव्हता तो
प्रेम होते Miss you नव्हते ते
love you होते ते
तरी Miss you.. Love you होता होता क्षणाक्षणाला ....
व्याकुळ शब्द होते ते
मन miss you करीत होते. त्याच्या मनाला.... त्याच्या संवादाला. आतापर्यंत चाललेला संवाद आता काही अंतराच्या दुराव्याने चालला होता. नाही तो त्या क्षण सोबत त्याच्या माझ्या मनात चालला होता. हे सर्व तिसरा कोणा व्यक्तीच्या लक्षात आले.तो व्यक्ती म्हणजे त्याचा 'मित्र,' त्याला कळत नव्हते; नेमक काय चालू आहे? तो आमच्या दोघांकडे ही पाहू लागला. काय झाले? उत्तर नव्हते... त्याच्याकडे. उत्तर नव्हते माझ्याकडे.
आमच्यातील संवाद आता त्यालाही कळला होता. आमच्यातील प्रेम आता त्यालाही समजले होते. प्रेम लपविता येत नाही असे म्हणतात तसेच झाले. नाही, संवाद नवीन पद्धतीने चालू झाला. तोही त्या संवादाचा भाग होत होता. पण समजूतदार व्यक्तीसारखा.
नको मानेने खुणावत होता. त्याला मला पण मनाला ती दिसतच नव्हती. हा संवाद खूप वेळ चालू होता. गाडी येण्याची चाहूल लागली मनात अधिकच बेचैनी सुरू झाली.नको असलेला क्षण अगदी जवळ येत होता मनात फक्त प्रश्नांची आणि शब्दही न सुचावे अशी काही चालू होते. आम्ही मनाला समजू शकत नव्हतो. फक्त नयन भाषा चालू होती. त्याची तळमळ कळत होते. पण काहीही करू शकत नव्हते. तो मित्राला खुणावत होता.
आपण नंतरच्या गाडीने जाऊन. पण वेळ नव्हती. आणि येऊ नये ती वेळ आली. मन जड झाले... पाय जड झाले... अश्रूंचा बांधा सुटला... त्याच्या ही आणि माझ्याही.. लक्ष नव्हतेच कुणाकडे ना सामानाकडे. डोळे फक्त तो क्षण जपून ठेवण्याकडे चालला होता.
मनात प्रेम फुलविण्यासाठी
आणि त्या 💓💓💖💖भावना मनाला
समजून सांगण्यासाठी परत
प्रेमळ मुक संवाद घेऊन
माझ्या आयुष्यात..!!
तुझ्या माझ्या प्रेमाला नजर लागली, वेळेची. मी ही हरले आणि तू ही हरला. विरहाचे दुःख दोघांचाही पदरी पडले. हिशोब मांडला तर आपल्याला कळेल किती वेळा या विरहाच्या दुःखात अशी कितीतरी आनंदी क्षण हरवून बसलो आहोत. पण त्या वेळेचा हिशोब मांडला तर कितीतरी क्षण जगून घेतले आहे.
त्याच्या माझ्या समजूतदारपणाची किंमत होती. आम्हा दोघांना पण भावनिक नात्यांना किंमत नसते. हे आज यावेळेला कळते. त्याच्या माझ्यातील तो क्षणभराचा प्रेम संवाद थांबविता आला असता तर पण नियतीने ठरविलेला होता तो जणू.
भावनिक नात्यांची गुंतवणूक करून मनाला ती निभवावी लागली. तो क्षण विसरता न आल्यामुळे जणू नव्या सुखाच्या शोधात. आम्ही दुःखाचे चावट सोबत घेत आहोत. हे त्या प्रेमळ संवादात कळलेच नाही. उलट चुकत गेले... एकमेकांच्या मूक संवादाला प्रतिसाद देऊ.
प्रेम विरहाच्या आगीत फक्त स्वतःला जळवत ठेवायचे. आता वाटत असेच त्याच्यासोबत सुद्धा होत असेल की सर्व काही वेळेनुसार विसरला असेल माहित नाही. पण, मी नाही विसरले ....पहिले प्रेम, पहिली भावना, पहिले उमलणे आणि पहिले संवाद तेही मुक. पहिल्या विरहाचे ते क्षण ताटातुटीचे ते क्षण ती वेटिंग रूम आणि ते स्टेशन सर्व काही काल झाल्यासारखेच..!!
विरह नव्हताच तो
होता नवीन वळणावरील
नवीन वळण जीवन गाथेचे
नवीन प्रवास सुरू झाला
नवीन आयुष्याचा
त्याच्या माझ्या प्रेमळ प्रेम
आठवणीचा पण ताटातुटीचा
तरी हवाहवासा वाटणारा
नको भेटू कुठेही, पण मनात राहा. शेवटच्या टप्प्यापर्यंत. तसाच... प्रेमळ नवीन भेटीसाठी!! कुठेतरी ,संवाद मूक असला तरी चालेल. पण भेट एकदा;मनाला फुलविण्यासाठी. माझ्या आठवणीतील प्रेमळ मित्र ....!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- एक प्रेमळ आठवण
वेटिंग रूमची ...
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
💓💓💓💓💓💓💓💖💖💖💖💖💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓💓