***** पाऊस सुगंधा धारेवर ****
घेऊन आला
चिंब भिजवाया
मनाला !
स्पर्श होतास
शहारे मनाला
नजर अजूनही
तुझ्या रूपावर रंगावर
निशब्द झाले
भांबावलेले शब्द सारे
लाटेवर हलकासा स्पर्शाने
झेलावे वाटते
परत ...अंगावरी
ओलाचिंब शिथिल
भावना करुन... चिंब
मनसोक्त उजेडात
मातीचा सुगंध
दरवळे चोहीकडे
उजेड लाटेवरती
मनातील सुगंध धारेवर
✍️🏻©️सविता तुकाराम लोटे
****×*****×*****×*****×*****×*****×