मनातली गाणं आणि बाहेरील गाणं (म्हणजे तोंडाची बडबड त्याला सूर नाही की ताल नाही तरी म्हणायचे गाण) तसे बाहेरील गाणं यात किती फरक दिसतो. मनातील गाणं मनाला आनंद देतो मनाला वेडेपिसे करून टाकतो. आनंदाने मन प्रफुल्लीत होत जाते. कधीही न विचार केलेले सगळे कसे करून टाकते.
नवं उमलत जाते. जुने पुसत जाते नव फुलताना कितीतरी वेळ उमलत राहतो. गालावरील हसू पाणावलेले हसरे नयन, लाजेने लाल झालेले गाल! मखमली पडद्याने नवं फुलविण्यासाठी तयार झालेली... मनातील गर्दीतल्या कोप-यान कोप-या फुलविण्यासाठी तयार झालेला. तरी पण त्यावर सतत रागाने आपले सामर्थ्य निर्माण करून ठेवलेल्या
त्याला सुद्धा लाजेचे रंग येतो. नवं प्रफुल्लित फुलतांना!!
नवं प्रफुल्लीत फुलताना मनातील भाव कुठेच जात नाही. शब्दांची सोनेरी सर्व कुंपणे बाजूला सारून हळुवारपणे फुलू देतो. मनाला आणि नकळत गाणं ओठाबाहेर निघून जाते, कसेही... क्षणोनीक्षण आरशात पाहतांना आपल्याच आपण नवीन वाटत असतो पापण्याआड डोळे दडलेल्या असतात.
आरशात पाहताना हळुवारपणे आपण आपले विचार नाहीसे करीत असतो क्षणात प्रफुल्लतेचे स्वप्न फुलवीत असतो मनाला चिवचिवाट आवडत असते. अंगणातील मस्ती करणारे मुलांचे शब्द आपले असते. मनातील मातीत मिसळून हिरवळीचा लांबचलांब वाटा मनात तयार होतात. ती थंडगार न वाटता रोमँटिक वाटत असतं. मनातील भावगंध चिंब भिजलेली असते.
खरंच आपण फुलवीत नसताना तेव्हाही फुलत असतं टेकडीवरील मंदिर सुद्धा कधी आपले वाटत. सगळं नवं वाटत असते रोज येणारे नव वाटत असते ध्यानीमनी नसताना भेटणारी व्यक्ती नवीन वाटत असते नवं आणि नवं फुलताना असलेली वस्तू आणि नसलेली वस्तू यात फरक नसतो. हवेतील गारवा ते करू देत नाही.
मावळतीचा सूर्य ही मनाला आनंदीआनंद करून देतो. मग काचेवरील पाण्याचे थेंब खाली येताना आपल्या आपले वाटते,' आठवणी थेंब वाटतात', ते'..... नवं फुलत असतांना आपल्यालाच पायातील पैंजण काढून वाजवीत राहणे. तसे सतत करत राहणे.
आवाज मनाला प्रफुल्लित करीत असते. पायातील पैंजण बेडी म्हणणारे मन आता मनाला हवे हवे असते. क्षण सामोर जातांना ते क्षण मात्र ओंजळीत साठविलेले असतात. सांजवेळेची कातरवेळ हवी हवी असते. क्षण फुल होऊन नाचू लागतात😀 नवंप्रफुल्लित फुलतांना.
क्षण मोकळ्या आकाशाखाली फिरत राहते आपणच आपल्याला विसरत असतो. थांबलेल्या क्षणाला... कधीही सोडून घ्यावे वाटतच नाही पण का द्यावे सोडून? नयनातील पाऊस थेंब होऊन वाहत राहते. नयनावाटे निघून जाताना पावसाचे थेंब ओंजळीत तोलून त्यांचे मोती ते अलगद ओंजळीत घेऊन नवं फुलत राहत. ते का निघाले कळत नाही. दाटलेली नयनांना सांगावे, हे आपलेच आहे तरी साठवून ठेव. फुलणार आहे 'नेहमी',वेळ लागत असला तरी!
नवं फुलत असते. नव्हो नवं फूलवावे लागते. मनात प्रत्येक क्षण उमलत असतात मनावरील रांगोळीमध्ये रंगबिरंगी रंग भरले जाणार आहे. भिजलेल्या नयन आपले असले तरी मोती आपले नसते. नकळत आलेले पाणी सुद्धा आपले नसते. नवं सर्व फुलत असतांना आपले असते.
मुद्दाम राखून ठेवलेले क्षण आपले असतात. उमलते क्षण आपले असतो...क्षणात माया दाटून आलेली आपले असतात. नयनातील ढगाळ आभार आपले असतात. डोळ्याभोवती आलेले आपले असतात कुठल्याशा एका क्षणाला फुलले म्हणजे सर्व जुने होतात नव्हे!! कुणाचीही नजर चुकवून फुलविता येत नाही. नवं फुलत असते. रंग गंध नाद स्पर्शसोबत!
नवं फुलवित -फुलवीत मनाला फुलवावे लागत नाही. सहज फुलवीत राहावे .पुन्हा शब्दांचे जाळे विणावे. उगवत असेल तर उगवू द्यावे. सर्व दिशा फुलवीत असते. अश्रूंची सर नवं प्रफुल्लित फुलवीत असते फुलवीत रहावे...नवं प्रफुल्लीत फुलतांना!!!!!😀😀😀😀
सविता तुकाराम लोटे
16.2.2008
(सर्व चित्र गुगल वरून घेण्यात आलेल्या आहे)