savitalote2021@bolgger.com

प्रेम कविता Savita Tukaram Lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता Savita Tukaram Lote लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ११ एप्रिल, २०२१

सोबत

               सोबत

सोबत होतो, हातात हात नव्हता 
सोबत होतो, ओठांवर शब्द नव्हता 
सोबत होतो , पण ...नजर रस्त्यावरील                                            वर्दळीकडे 
सोबत होतो, पण लक्ष बॅगेतील मोबाईल
कडे आला तर? 
सोबत होतो, चहाच्या टपरीवर बिस्किट एकमेकांना देण्यात मात्र 
लक्ष्य एकमेकांच्या शब्दाविना संवादकडे  सोबत होतो, आभाळा एवढ्या प्रेमाने 
पण हसर्‍या ओठांनी अन 
बोलता डोळ्यांनी 
आजही,सोबत आहो...एकमेकांच्या आठवणीने 
आपआपल्या... भाव संवादामध्ये
         सविता तुकाराम लोटे

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...