savitalote2021@bolgger.com

शनिवार, ५ जून, २०२१

वेदनेचा बांधा

@@@@@@वेदनेचा बांधा...@@@@@@

वेदनेचा बांधा फुटताना 
असं कधी कधी होतं 
मनातील चुका आपल्या 
वाटतच नाही !

कमी पडतात शब्द 
कमी पडतात अक्षरे 
कमी पडतात सर्वच भावना 
वेदनेचा व्यथा मांडताना ....

ओंजळीत बांधू ठेवते 
सुटतच जाते शब्दविना 
घुसमटत घोटात वेदनेच्या 
ओझे मनावर ठेवत !!

विनाकारण झाले दुःखांचे 
ओझे चुका नसताना 
सुखाची वाट गेली राहूनच 
वेदनेचा बांधा फुटताना!!!


****✍️©️ सविता तुकाराम लोटे ****




-----✍️🏻©️Savita Tukaram Lote -----


*************************************

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...