अंधार संस्कार फक्त माझे
अंधार कधीकधी अंधार हवा असतो तर कधी कधी अंधार आपल्या वाटेला येतो. मनातल्या मनात असलेल्या कितीतरी गोष्टी अंधारात बोलून दाखवितो. सर्वोत्तम असे काहीच नाही. आतले बाहेरचे असे काही नाही. आंतरिक अंधार हा आपल्या असतो. अर्थात तो अंधार कसला आहे.
पूर्णत्वाकडे येणार आहे की अंधार कोठडी मध्ये स्वतःला नेणारा अंधारात फक्त आपण आपल्या भावना जाणून घेतो. अंधाराशी तडजोड करणे म्हणजे ,"आपल्या स्वप्न कल्पनांना मागे सोडणे होय." अंधारात जगणे म्हणजे जगण्यात वनवा आणणे होय. अंधारात फक्त मनाच्या आत असलेला किरणांचा काळ असतो.
अंधार मनाला काळ दाखवितो तसा तो थोडा थोडा प्रकाशाकडे घेऊन जातो. अंधारात आपला श्वास... आपली आसवे... आपली अंतर खेळ आणि जगण्याची आस स्पष्टपणे उजळलेले दिसते.
अंधारात कधीही नव्या जमिनीचा शोध लागू शकत नाही. अंधारअंगणात फक्त काळोख असतो. विचारांची प्रश्नांची आणि क्षितीजा पलीकडील विश्वाची..!!
....अंधार संपलेला असेल प्रकाशाची वाट आली तर पायवाट अंधारलेली असे प्रकाशाचा रस्ता कुठेतरी हरवलेला दिसतो प्रकाश असतो. पण ते मन चैतन्यात कुठेतरी लपलेला असतो. हरवलेला असतो.... प्रकाशाच्या दिशेला अंधार आपण कवेत घेत नाही तर त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न सतत करीत असतो.
मनाला एकाकी करीत असतो. मनाला कमकुवत होण्यापासून परावृत्त करीत असतो. प्रस्थापित विचारांना प्रकाशाकडे नेण्याचा प्रयत्न सतत करीत राहतो. अंधार प्रकाशाकडे जाणारा आणि प्रकाश तेजस्वी रूपात आपल्यासमोर सत्य घेऊन येते.
मनाला अंधाऱ्या खोलीत जाताना बघताना मन जखमी होत जाते. मनात चित्रविचित्र भावना निर्माण होतात मग काहीही विचार करीत नाही. मनाचे चैतन्य नाहीशी होते. मनाला काहीही सौंदर्य राहत नाही म्हणजे मनविचारशृंखला... शब्द माहीत नसते ती फक्त कुठल्यातरी विचारात एकटाच मग्न असतो... मेंदूला मुंग्या येत पर्यंत..!!!
मनअंधार नक्की वाईटच पण तो आला तर काय करावे परिस्थिती परिस्थिती बदलू देत नाही. कितीही प्रयत्न केले तरी तिळमात्र बदल होत नाही. सतत नियती समोर हात जोडावेच लागते. तरीही प्रकाशाची वाट आपली वाट पाहत असावे... असे; सतत वाटत राहते... अंधारा संस्कारांमध्ये!!
कळलेच नाही या वेळेसाठी अंधार आहे. की प्रकाशाच्या वाटेवर नयन ओले करून वाट पाहणारा अंधार बदलेल त्यावेळेसाठी आहे. अंधारानंतर प्रकाश येतो असे म्हणतात तर प्रकाशाची चाहूल का नाही?? प्रकाशाची चाहूल मग चैतन्य असेल तर ते चैतन्य कुठे गेले??
अंधारात की अंधारात मनसौंदर्यात कळत नाही. तरीपण अंधारकोठडी प्रकाशाची चाहूल शोधतच असते आणि शोधत राहील. कारण अंधार हा चिरकाल टिकणारा नसतो. मनसंस्कार तो टिकू देत नाही. प्रकाश किरणे अंधाऱ्या कोठडीत कुठून तर येणारच ..हे नक्की...!!
पण एक खरं नियतीचा खेळ संपला नाही आठवणींच्या बाजारात चैतन्य नावाचे सुंदर मेकअप किट आहे ते कधीही मनाला अंधारकोठडीत ठेवत नाही. अंधार संस्कार हे फक्त डोळ्यावर काळी पट्टी बाधांसारखे आहे. पट्टी कधीही सोडले जाऊ शकते. कोणी कितीही प्रयत्न केला तरी आपण सतत अंधार संस्कारात राहू शकत नाही.
कारण प्रकाश अंधाराचे दुसरे रूप आहे. म्हणून सतत अंधारानंतर प्रकाश आणि प्रकाशा नंतर अंधार हा निसर्ग नियम प्रत्येकांच्या आयुष्याला लागू आहे. अंधार संस्कार कधीही मनावर करू नका. अंधाराची वाट नकारात्मक... प्रकाशाची वाट सकारात्मक... सतत ही भावना मनसौंदर्यावर.. मन चैतन्यावर.. स्वतःच्या संस्कारित विचारभाषेवर सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा.
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- अंधार संस्कार फक्त माझे
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका..!!!!!
Thank you..!!