समाजामध्ये अनेक प्रकारचे अनेक स्वभावाची माणसे राहत असतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात रेशीमबंध असते. काही ऋणानुबंध असतात. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर कुणीतरी येण्याची वाट पाहत असते. मनामध्ये एक आकार एक स्वप्न निर्माण होते. स्वप्नातील एक हलकीशी चाहूलही कशी मने फुलतात अंतःकरणाच्या कोवळ्या वेलीवर संदर्भातील भाव फुले स्वप्न फुले फुलून आनंदी करतात पण तेवढ्यात एक स्वप्न पूर्ण होऊन वास्तवाच्या जगात रमत असते तरी ते स्वप्न न विसरता ती काळी पांढरी सावली पाठलाग करीत असते ते भावफुल आणि स्वप्न फुल एका कोपऱ्यामध्ये पक्के बसून राहते कुणाच्यातरी दिसण्याचे स्वप्न अस्तित्वाचा आणायचे ती काळी पांढरी सावली स्वतः स्वतः भोवती फिरत राहते.
निळाभोर आकाशाखाली वावरू लागते आपल्या सोबत स्वप्न चिमणी पाखरांची ती चिवचिवाट मनाला स्पर्श करून जाते आणि डोळ्याभोवती उभी राहते ती काळी पांढरी सावली हाताच्या ओंजळीमध्ये चांदणे गोळा करून देत असते ती सावली मने निशिगंधा सारखे फुले तसेच मनातील कोपरा न कोपरा त्या अबोल संभाषणा बरोबर चालत असते आणि अचानक डोळे सताड उघडे होतात आणि विचार करू लागते.
मनातील ती काळी पांढरी सावली होती की कल्पतरू होते ते! जसे काचेचा आरशाला मारला तर तुटून जाते प्रतिबिंब नष्ट होते तसे झाले. मनातील शब्दाने खेळ खेळला सुसाट वादळाने झाडे मुळापासून उपटून टाकले तेव्हा झाडांनी काय करावे तसे केले त्या काळा पांढरा सावलीने माझे अस्तित्व नष्ट केलं रक्तबंबाळ केले मन सागराला!
कोणतीही भावना त्यासमोर फिक्की पडत होती हृदयाच्या कोपरा न कोपरा त्या आठवणीने घायाळ झाला होता रक्ताच्या प्रत्येक थेंबाने वर ती सावली हक्क सांगत होती हेवा करीत होते मन मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. मन रिकामे झाल्यास ते बुद्धी विचार करीत नव्हते माझी व्यथा ऐकत नव्हते.
तुटलेल्या स्वप्नांची रडगाणी गोळा करीत होते. झडलेली सगळी पिवळी पाने अंतरंगातील व्यथा पापणी मध्ये साठवीत होती. दाट ढगातून मला मिळत नव्हती ते खुल्या पापण्यान मधून कितीतरी वेळा त्या सावलीने देऊन दिले होते आणि दवबिंदू साठवीत होती हिरव्या हिरव्या तृणफूलातून स्पर्श करून जात होती पुन्हा तुटलेला काचेवरून मन बेभान नाचू लागले होते ती सावली ज्या वेळी अस्तित्वात माझ्या समोर आले तेव्हा आनंदाने भरून गेलेले मन अचानक घार पक्षी सारखे पडू लागले पाण्यातून मासाला बाहेर काढावे आणि जगाला लावावे त्याला या भूतलावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करायला लावावे त्याला जरी माहीत असले तरी त्याची जीवन नाही तेथे तसेच झाले.
विचार करू लागले माणसांच्या गर्दीत हरवून गेले पुन्हा ती सावली मला आपल्याकडे खेचत असते. माझ्या स्वप्नातील काळी पांढरी सावली तेथे जशी मी त्याला पाहण्याचा प्रयत्न करीत होते तसेच आधी पाहात होते तशीच तेव्हाही केले पण ती सावली माझ्याकडे येत होते. सर्व भावांनी मध्ये आणि अगदी जवळ येऊन त्या भावनेला अर्थ देण्याचा प्रयत्न करीत होते पण तितकेच दूर जात होते भीतीने हदयात एक अनामिक निर्माण होत होती तिने कधी मला गुंतविले नव्हते.
शरीरातील शक्ती नष्ट करीत भावनाशून्य करीत होते तरी वटवृक्षाप्रमाणे उभी होती एकटी संघर्ष करीत.
24.1.2004
सविता तुकाराम लोटे
_---_------------------------