savitalote2021@bolgger.com

मंगळवार, १४ मार्च, २०२३

*** जीवन **** jeevan*** Life **

**** जीवन  ****
       jeevan
*** Life  ****

          श्वास चालू आहे म्हणून आयुष्य चालू आहे. कदाचित, त्याला जीवन म्हणतात!
          जीवनाची व्याख्या करता येत नाही. जीवन म्हणजे काय हे सांगता येत नाही कारण अनुभव तितका नाही पण जीवनाची एक गोष्ट मात्र नक्की जीवन चालत असते. स्वतःच्या मर्जीत. वेळेलाही सोबत न करता.❤
                फक्त चालत राहतो येणाऱ्या वाटेवर. येणाऱ्या अनुभवांवर ...! येणाऱ्या शब्दांवर. सरळ मार्गाने कारण त्यांना माहीत असावे; आपण जीवन आहे जोपर्यंत चालू तोपर्यंत जिवंत आहे.
                ' जीवनाची हीच गोष्ट कदाचित जीवन आहे'.एखादी गोष्ट ज्यावेळी मागे सोडून जाते.  त्यावेळी त्या गोष्टींची किंमत कळते. कदाचित कळलेही असेल त्यावेळी पण जीवन त्या अनुभवा सोबत चाललेले असते. त्या कारणाने ते त्याला कळलेही नसेल.
         जीवन म्हणजे जिवंतपणा. जीवन म्हणजे आपलेपणा. आपल्या आजूबाजूला असलेला श्वास म्हणजे जीवन.



           म्हणून  तो आपल्याच मर्जी चालत राहतो. वेळेला मागे सोडत. प्रसंगाना मागे सोडत. प्रसंगी स्वतःची परवा न करता फक्त चालत असतो.
           चैत्राच्या सौंदर्यासाठी...!! पानगळ सोसावीच लागते. पानगळीचा निरोप झाला की फुललेले जीवन फुलत राहते फळत राहते आणि परत वेळेला मागे सोडत सरळ मार्गाने चालत राहते.❤❤
                 हे सर्व केव्हा होईल जेव्हा आपला श्वास चालू राहील. महत्त्वाची गोष्ट हीच की आपण असणे महत्त्वाचे. तेव्हा सर्व काही आपले. जीवन हे सांगत असावे.सरळ मार्गाने चालताना मी आहे म्हणून सर्व माझे आहे.
                वेळ माझ्यासोबत आहे. वर्तमान माझ्यासोबत आहे. भविष्य माझ्यासोबत आहे. जीवन कदाचित हेच असावे. 
                  अनुभवाची सांगड म्हणजे जीवन असावे. जीवनाची परिपक्वता येणाऱ्या अनुभवांवर अवलंबून असते. परिपक्वता होय परिपक्वता ..!जीवनात परिपक्वता खूप महत्त्वाची.
             मनाला आनंद देणारी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिपक्वता.
              कागदावर रेषा ओढणे आणि त्या रेषेत एखादी चित्र तयार करणे यामध्ये जितका फरक आहे, तितकाच फरक जीवनात परिपक्वता आल्यावर जीवन जगताना आहे. म्हणूनच जीवन हे सरळ मार्गाने चालत असावे.
          कधी कधी वाटून जाते , जीवन मार्गावर चालताना आपण खूप आर्ट ऑफ लिविंग ऐकत असतो. मेडिटेशन करीत असतो. कौन्सिलिंग  सुद्धा करून घेतो पण या सर्वांची गरज आहे का?❤❤❤
              जीवन सरळ मार्गावर चालत असतात ना तर या प्रश्नाचे उत्तर नाहीच येते कारण जो व्यक्ती सरळ चालतो तो चालतच असतो पर या प्रश्नाचे उत्तर हो आले तर आपण कुठेतरी इतरांच्या आत्मविश्वासावर आपला आत्मविश्वास तपासात असावे.
             कदाचित म्हणून या सर्व गोष्टीची आवश्यकता असावी. स्पर्धात्मक युगात जीवन जगणे ही स्पर्धा झाली आहे. ही स्पर्धा जिंकणे हेच एक ध्येय झाले आहे.
       असो, जीवन हे सरळ मार्गांनी चालणारे एक खूप सुंदर सुरेख व्यक्तिमत्व आहे. ते तोपर्यंत चालते जोपर्यंत तुमचा श्वास चालू आहे म्हणून स्पर्धेत चालताना सुद्धा ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
             तुम्ही आहात म्हणून सर्व आहे.  सर्व आहात म्हणून जीवनाची व्याख्या करता येत नाही. जीवनाची संकल्पना मांडता येत नाही. जीवनाला आर्ट ऑफ लिविंग मध्ये बंदिस्त करता येत नाही.              
            जीवन सरळ मार्गाने वेळेला मागे सोडत फक्त चालत असतो आणि आपापल्या परीने होईल तितका प्रवास या जीवन मार्गावर करीत असतो श्वास असेपर्यंत ...!!
   जीवन हे शोधण्याचे तंत्र नाही 
   जीवन हे संशोधन आहे ध्येयप्राप्तीचे 

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

            ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

=============================

**** life ****
 Jeevan
 *** Life ****

 Life goes on as breath goes on.  Maybe, it's called life!
 Life cannot be defined.  It is not possible to say what life is because the experience is not so much but one thing of life is definitely life going on.  for its own sake.  Without accompanying time.❤
 Just keep walking on the way.  On coming experiences...!  On coming words.  In a straightforward way because they should know;  You are alive as long as you have life.
 'That thing of life is perhaps life'. A thing that is left behind.  At that time the value of those things is known.  It may have been known at that time but life goes along with those experiences.  That's why he didn't even know it.

Life is aliveness.  Life is belonging.  The breath around us is life.
 So he continues on his own accord.  Leaving time behind.  Leaving the situation behind.  Sometimes he just walks without caring about himself.
 For the beauty of Chaitra...!!  The leaves have to be absorbed.  Once the leaf leaves, the blossoming life continues to blossom and bear fruit and continues to walk on the straight path, leaving time behind.❤❤
 All this will happen when we continue to breathe.  What matters is that you matter.  Then everything is yours.  Life must be saying this. All is mine as I am walking the straight path.
 Time is with me.  The present is with me.  The future is with me.  Maybe this is what life is all about.
 Life should be a combination of experience.  Maturity of life depends on coming experiences.  Maturity Yes Maturity ..!Maturity is very important in life.
Heartwarming.  The most important thing is maturity.
 The difference between drawing a line on paper and creating a picture within that line is the difference between living life as you mature.  That's why life should be a straight path.
 Sometimes it feels like we are listening to a lot of Art of Living as we walk the path of life.  Doing meditation.  Counseling is also done but is all this necessary?❤❤❤
The answer to this question is not whether lives are going on a straight path, because the person who walks straight is still walking, but if the answer to this question is yes, then we should somewhere check our confidence on the confidence of others.
 Maybe that's why all this is needed.  Living in a competitive age has become a competition.  Winning this competition has become a goal.
 Anyway, life is a very beautiful personality with straight paths.  It lasts as long as you are breathing so keep this in mind even when running in competition.
 All is as you are.  Life cannot be defined as being all.  Life cannot be conceptualized.  Life cannot be confined to Art of Living.
 Life is just walking on a straight path leaving time behind and traveling as much as possible on this life path till there is breath...!!
 Life is not a technique to discover
 Life is a search for a goal

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
 The poem is handwritten and composed.  Don't forget to like and share if you like.
 Be sure to share your thoughts in the comment box, your suggestions in both sweet and bitter words and give words to your thoughts..!❤

=============================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...