savitalote2021@bolgger.com

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०२३

माहीत असते तरी💔***

        कधी कधी काही गोष्टी माहित असतानाही आपण अपेक्षा करीत असतो. ती अपेक्षा का करतो ,माहित नसते असते अशाच द्वि मनस्थितीच्या एका व्यक्तीच्या भावा विश्वातील ही कविता ..!!
      कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत नक्की कळवा. तुम्हाला कविता आवडल्यास शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद...!!❤

*** माहीत असते तरी💔***

एखादी गोष्ट माहीत असते 
आपल्याला ...
तरीही ती गोष्ट शोधत असतो 
कधीतरी वाटते आता बदलेल 
परत काही दिवस जातात 
परत काही क्षण जातात 
परत काही शब्द जातात 
पण बदल होतच नाही 
पण का...? 
या प्रश्नाचे उत्तरही माहीत असते 
तरीही काहीतरी शोधत असते 
निरर्थक उसवलेल्या मनाला 
शिवण्याचा प्रयत्न असतो 
प्रतीक्षेनेच

आपणच बोलवलेला या क्षणाला 
आपलीच किंमत माहित असते 
तरीही शोधत असते उंबरा पलीकडे 
आपले अस्तित्व की त्या शब्दांमध्ये 
आपले अस्तित्व 
कळते पण वळत नाही वळत नाही 
म्हणजे काय असते माहित नाही 
तरीही शोधत असते 
ओलावलेल्या क्षणांबरोबर 
बोलवलेल्या क्षणांचे शब्द 

अजूनही वाटत चूक कुणाची 
वाट कुणाची अपेक्षा कुणाकडून 
कोणत्या शब्दांकडून 
कोणत्या व्यक्तींकडून 
कोणत्या नात्यांकडून 
कोणत्या हसऱ्या बोलक्या शब्दांकडून 
जे शब्द नजरआड करून 
बोलले जातात 
त्या शब्दांकडून 
ही गोष्ट शोधत असते 
दूर कुठेतरी कुठल्यातरी 
क्षणात त्या काळोखात 

लख्ख प्रकाशाच्या उजेडात 
चमचमणाऱ्या त्या चांदणी क्षणात 
गोष्ट शोधत असते 
माहित असतानाही 
क्षणाक्षणांच्या गोष्टींमुळे 
चालते मी 
तरीही त्या वाटेवर 
कधीतरी त्या अप शब्दांच्या 
सहनशीलतेला 
सहनशीलता काय असते 
हे माहीत करण्यासाठी 

ते हसू ते शब्द त्यापलीकडील 
भाषा मागची भाषा शोधत असते 
माहीत असतानाही 
तरीही शोधत राहते 
कुठेतरी 
आपुलकी हृदयाचा तो 
ओलावलेला कोपरा शोधत राहतो 
माझ्यातच माझ्यातील चुका 
त्या चुका माझ्याच असतात 
बदल हा नसतोच मुळात 
बदल फक्त असलेल्या क्षणात 
तरीही शोधत राहते मी 
माझ्यातील चुका 

मी शोध कोरड्या नयनांनी 
सुकल्या शब्दांनी 
नजरेआड केलेल्या चोर नजरेने 
शोधत राहतो एखादी गोष्ट 
माहीत असते तरी 
एखादी गोष्ट माहीत 
असते तरी...!!💔

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

(picture google) 

--------------------------------------------------------------------------

**** चालते ****

आयुष्यात अशाही भाव संवेदना असतात त्या संवेदना ते विश्व ते शब्द त्या नात्याला किंवा त्या शब्दांना कोणत्याही शब्दात एकत्रित बांधून शकत नाही.
       कारण ते नाते कोणत्याच भाव विश्वातले नसते. तरीही काहीतरी नाते असते.... अतूट !!माहित असते तरीही ते नाते हृदयाच्या कोणत्यातरी कोपऱ्यामध्ये ओलावा निर्माण करते. समोरचा कोरडा असला तरी,त्याच भाव विश्वातली ही कविता..." चालते ",
       कविता स्वरचित व  स्वलिखित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
 धन्यवाद...!!

**** चालते  ****

वळणवळणावर चालताना 
माहित नाही कोणत्या 
उंबरठ्यावर काय आले 
माहित नाही तरीही 
चालत राहते 
कुठेतरी काहीतरी शोधात 
पण काय माहित नाही 
जगण्याच्या गुलाब फुलावर 
काटांचे अत्तर आले 
का आले???? माहित नाही 
तरीही वळणा वळणावर 
नवीन आशेची किरण घेत 
ओलावलेल्या क्षणांसोबत 
ओलावून चालत राहते 
वळणा वळणावर 
कुठेतरी थांबावे वाटते 
पण थांबले तर संपेल 
त्या क्षणात 
म्हणून वाऱ्यासोबत पायाला 
भिंगरी घालून 
धावत राहते 
त्या रस्त्यावर जिथे 
रस्ताच नाहीशा झाला आहे 
तरीही पायवाट तयार करते 
माहीत असतानाही 
काय माहीत असते 
माहित नाही 
तरीही चालत राहते 
वळणा वळणावर 
का चालते माहित नाही 
का चालते माहित नाही

         ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



(picture google) 


**********💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔*************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...