savitalote2021@bolgger.com

शनिवार, १ मे, २०२१

प्रीत

------प्रीत -----
प्रीत माझी तुझी 
काही वेगळीच 
जीवनात फुललेली
आणि उजळलेली
प्रीत माझी तुझी 
हसऱ्या एकत्र क्षणांची 
न संपणारा शब्द साखळींची 
भरकटलेल्या स्वप्नांची
प्रीत माझी तुझी 
अबोल शब्द ओठांचे
मनमोकळा हदयाची 
भाषा.... आयुष्याची 
प्रीत माझी तुझी 
वचनबध्द मर्यादेची 
बघू जमतंय का? बोलण्याची 
आणि हळूच 
तुझ्या मिठीत शिरण्याची
प्रीत माझी तुझी
भिजलेल्या धूंद प्रेमाची 
आस देणाऱ्या जगण्याची 
उजळलेल्या स्वप्नांची 
प्रीत माझी तुझी 
   काही वेगळीच!!!
           सविता तुकाराम लोटे 
      -------------------------

सांज गेली

-------सांज गेली -------
सांज होती 
मी बसले होते 
सागर किनारी... तुझाच 
हात - हातात माझ्या 
...मोबाईल सोबत 
अलगद,
अश्रुधारा नयनात 
निशब्द, सगळ्या 
भांडकुदळ भावना 
आता 
जाणवू लागला 
वेदना ...सरसकट
वा-यांचा सोबतीने
मनापासून! 
पायाखालील 
वाळू...  सरकलेली 
अधिक सांज आली  
रुसलेल्या प्रेमाची 
हसणाऱ्या ओठांची
कोसळणाऱ्या लाटांची 
भिजलेल्या पापण्यांची
अलगद 
तुझे हात बाजूला करून 
अमावस्येच्या रात्रीसारखे 
मन हरवून.... 
दूर कुठेतरी बघत!
हात हातात घेऊन
हात सोड ना !
नको राहू दे 
मनात गुंतलेला... 
नेहमी स्वच्छ आठवणीसंग
पण; 
ढगाळलेले क्षण ठेवून ज्या
शांत लाटेसारखे... मुके 
आणि 
हळूच सांज गेली
हाता -हातात ठेऊन
मनमोकळा मनाने! 
      सविता तुकाराम लोटे 
    


---------------------------------

पैंजण



--------पैंजण------------- 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदलला तरी 
सौंदर्यात भर टाकली जेव्हा तो 
बोलून गेला... पैंजण आवाज छान 
चुकला नजरेने पण हसऱ्या शब्दांनी 
गोंधळत... हलक्या आवाजात मोहून टाकले  चोहीकडे परिसर... मनातील श्रावण 
चालत राहा अशीच ...पैंजण आवाजात
पोहोचले शब्द... तुझे सुखात 
फॅशनच्या कोणत्याही रूपात ये 
माझ्यासमोर ...
प्रसिद्धीच्या कोणत्याही माध्यमातून ये माझ्याकडे...
मी ओळखेल! अनोळखी झालो तरी, गर्दीत 
पैंजण आवाज परिपूर्ण झालेल्या भूमिकेत 
पायातील पैंजण वाटली नाही 
कधीच बेडी... भूमिका बदला तरी 
कितीही
                   सविता तुकाराम लोटे 
-----------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...