savitalote2021@bolgger.com

सकारात्मक कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सकारात्मक कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

प्रश्न

प्रश्न 
एक एक प्रश्नचिन्ह 
उभे राहतात 
आवासून...

वास्तवतेत  
कागदाची घडी करावी 
तशी चौपट होत जात
प्रश्न चिन्हांची साखळी 
आवासून...

अपेक्षांचे डोंगर 
वसंताचा बहर 
आसवांची मनगळती
आठवफुलांची तक्रार  
गुरफटून टाकतात
आवासून...

मानगुटीला 
प्रश्न चिन्हांची शांत जळत 
असलेली सहवेदना 
सूर्यास्त सूर्योदयाच्या 
पहिल्या किरणांच्या
उत्तर साखळीने

       सविता तुकाराम लोटे 



माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...