अंगण म्हणजे घरची ती जागा तिथे आठवणीचा पाऊस असतो. आठवणीच्या या ग्रंथगाथत अंगण खूप महत्त्वाची भूमिका निभावत असते. अंगणातील तुळशी वृंदावन अंगणाला सुरेख रूप देत जाते. अंगण मायेची जागा ,अंगण विसाव्याची जागा, अंगण पहिला पावसाच्या सुगंध, अंगण आठवण सुखदुःखाच्या सुरेख रंगबिरंगी रांगोळी.
प्रत्येक टिपक्यांना रेषा सारखा. अंगण म्हणजे पहिले माहेर आणि घराचा उंबरठ्याच्या आत दुसरे माहेर. अंगण मायेच्या ओलाव्याने आपल्याला जोडून ठेवते. आजूबाजूच्या हिरव्यागार रूपाने मावळतीची सांजदीप अंगणाला नवचैतन्य देऊन जाते. ❤
अंगण तुळशी आणि सांस्कृतिक याची माहेर असतेघर. प्रेमाचा सुगंध प्रकाशाच्या जोडीने चोहीकडे आपले अस्तित्व सांगत असते. वास्तवाची कल्पना देत असते. खरे काय खोटे काय यापेक्षा आपले अस्तित्व काय हे ते अंगण सांगते.
शेणांनी सारवलेले अंगण किंवा स्टायलिस्ट झालेले आजच्या दोघांमध्ये फरक इतकाच की शेणाच्या आता वास येत नाही आणि स्टायलिश अंगणात तुळस रांगोळी राहत नाही. फक्त इतकाच फरक आयुष्यातही असेच काहीसे होऊन गेले आहे.
मनुष्याच्या आयुष्याच्या प्रत्येक आठवणी आता जुन्या होत चालले आहे. अंगण हद्दपार झाले आहे. इमारतीच्या जंगलात आणि जंगल तर ते कोणते सिमेंट..! काँक्रीटचे वास्तव इतकेच की आता अंगण हरवत चालले आहे. अंगणातील कोपरा नी कोपरा जीवन ओल्या आठवणी अधिक जिवंत करीत असते. सुखाचा पाऊस धाराही अशाच आणि दुःखाच्या पाऊस धारा ही अशाच ...!❤❤
कारण अंगण कधी कोणत्या मंडपाने सजेल माहित नसते. घराला जिवंतपणा देणारी हक्काची जागा म्हणजे अंगण. लेकराच्या खेळण्याची जागा अंगण घरातील अंगणात लागलेला प्राजक्ता गुलाब रात्र
रातराणीआणि उंबरा हिरवीगार मेंदी गोड लिंब शेजारीच असलेली अबोली अंगणाचे रूप सौंदर्य अधिक फुलवीत जाते.
आजच्या पिढीला हे अंगण क्वचित दिसते. महानगरात तर अंगण दिसतच नाही. पारिजातकाच्या सकाळची दृश्य अधिक मोहक असते. फुलांचा गालिचा अंगणाला अधिक सौंदर्य भर घालत राहते. झाडावरची सकाळची पक्षांची चिव चिवट कोकिळेचे मधुर गाणी वेगवेगळ्या पक्ष्यांची गाणी पोपटाची हितगुज मुंगी ताईंचे सरसर चालणे.
खारुताईचे झाडावर चढणे गाईचे येणे भटक्या कुत्र्यांचा आवाज आणि पोळीसाठी दिलेले आवाज हे सगळं अंगणातच घडते. या सर्व निसर्गलीला महानाट्य सर्व अंगणातच घडत असते .
उन्हाळ्यात अंगणात आलेली चिऊताई पाण्यासाठी हक्काने खिडकीजवळ जोरजोरात आवाज देणारी .....दाण्यासाठी हक्काने संपूर्ण अंगण डोक्यावर घेणारी.... सर्व मनासारख होईपर्यंत फक्त एक प्रकारचा सुरेल लयात आपल्या अधिकार त्या अंगणातून आपल्याला दाखवीत असते.❤❤❤
अंगण म्हणजे त्यांच !माहेर त्यांची हक्काची जागा ! त्यांचे बालपण त्याही कुठेतरी त्या अंगणा लगत असलेल्या मोठ्या झाडाच्या घरटात जन्मलेला आडोशाला लपून छपून राहणाऱ्या पंख फुटले की तिथेच अंगणात चिव चिवट चालू ..!
जसे घरात लहान मुलं सगळ्या घरभर नाचत फिरतो. तशी चिऊताई संपूर्ण अंगणभर आपलेच राज्य असल्यासारखे बिनधास्त फिरत असते आणि सांगत असते पंख सगळ्यांनाच असते.
रांगोळी सूर्य दर्शनाने लाजून आपले रूप चमकवीत असते. फुललेला मोगरा गुलाब सोबत तीही खेळते. बालसख्या सोबत जिव्हाळ्याच्या या जागेवर इतकं प्रेम कदाचित घरातील एकाही कोपऱ्यावर आपण करत नाही.
घरातील उंबरठा ओलांडून फक्त कधी कधीही जाऊ शकतो ती जागा म्हणजे अंगण. रात्रीचा चांदण्या प्रकाश गप्पा मैफिली या ही अंगणातच होतात. पौर्णिमेचा चंद्र ही सेलिब्रेट केला जातो केला जातो. आता अंगणाची जागा घरातील टेरीसने घेतली आहे. ❤❤
लग्नाचा मंडपही या अंगणात सजला जातो. निर्मळ पवित्र मनाने याच अंगण विधी होता. सर्व आठवणी अंगणातच घडतात. डोळ्यासमोर येत आहे शितल प्रकाशात आजी आजोबांसोबत गोष्टींचा फड..!याच मनात रात्रभर गाजविला जायचं चिवडा पार्टी मस्ती गोंधळ हाणामारी अभ्यास कविता तोंड पाठ करणे. या छोट्या - छोट्या आठवणी आयुष्याला एक वळण देत जाते.
आताच्या या वास्तव जगात खेळता - खेळता पण किती मोठे होऊन जातो. हे आपल्यालाही कळत नाही. स्पर्धा युगात वावरतांना आपण लहानपणी घातलेला फ्रॉक आता आठवत नाही म्हणून तर आपण मोठे झालेले असतो. कदाचित यालाच मोठेपण म्हणतात.❤
" लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा ठेवा", असे म्हणत लहानपणाची गोडवे आपण गात राहतो. पण खरंच मोठे झाल्यावर कळते; अंगणातील मज्जा ते दिलखुलास हसणे स्पर्धा मुळात कशाचीच नव्हती. फक्त होती ती उमलण्याचे दिवस. उमलने म्हणजे इतकी स्पर्धा हे कधी कळलेच नाही.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एक एक पाकळी उगवत आपले आयुष्य टवटवीत चैतन्य भरलेले असावे. इतकीच इच्छा लहानपणी मनात मोठेपणाचे स्वप्न होते पण हातात वारा जसा पकडू शकत नाही तसे वेळ सुद्धा.
दाणे टिपण्यासाठी सकाळ संध्याकाळ पक्षांची शाळा भरते इतकच माहीत होते म्हणून त्यांना दाणे टाकायचे त्यांच्या शाळेचा भाग होण्यासाठी पण आता कळते अंगणात भरलेली शाळा ती शाळा नव्हतीच मुळी ती होती "जीवन जगण्याची कसरत," जिवंत राहण्याचा निसर्ग नियम गतकाळाच्या आठवणी. आपल्या भावनांना सावली देते.❤❤
उदास दुःखाच्या शून्य झालेल्या भावनेला ओलावा देते ते अंगणात. भिजलेले ते आपले रूप आता भिजलेले असताना तसे प्रफुल्लित होतच नाही. आता फक्त असते नाती जपण्याचा जीवघेणा खेळ. शून्य झाल तर बरे नाही तर नात्याची वीण कधी तुटेल माहित नसते.
ऊन - सावलीचा खेळ वासल्याची नाती जपावीच लागते. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले वळण नसले तरी उमललेली कळी पायदळी तुडवली जात असली तरी सुई धागा हातातच ठेवावा लागतो.
वेल जशी झाडावर चढते आधाराने फुलते सुगंध देते, फुलपाखरांचे येणे होते -जाणे होते, मधमाशी ही येऊन जाते. आपले अधिकार घेऊन जाते. जबाबदारीने ते साचून ठेवते आणि एक गोडवा तयार करून ठेवते तसेच नात्याचीही असावे म्हणून हातात नेहमी सुई दोरा ठेवावाच लागतो.❤❤❤
अंगण ते मायेची सावली आहे तिथे फक्त सुखाची सावली मिळते असे नाही तिथे फक्त दुःखाची सावली मिळते असे नाही पण काही आठवणी ह्या अंगणाशी निगडित असतात. आयुष्याचा शेवटचा क्षणाची शेवटची साक्षीदार ही अंगणच असते. तिथे सर्व विधी आटपल्या जातात. दुःखाचा महापूर तेच अंगण बघते. उदास शून्य झालेले डोळे एक व्यक्ती नसण्याचे दुःख आणि त्या अंगणात खुप आठवण येते त्या व्यक्तीच्या कोपरा कोपऱ्यातअसते.
त्या आठवणीच्या ऊन सावलीच्या खेळात माणूस शेवटच्या प्रवासाला निघतो. शेवटची आठवणीही त्याच अंगणात असते.
म्हणून घरातल अंगण जपून ठेवा. छोटस का होईना पण जपून ठेवा. आयुष्याला खूप आठवणी ते अंगण स्वतःसोबत जपून ठेवते. कदाचित आपल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तेच ते जपून ठेवते. त्या घराचे वास्तव असते तोपर्यंत ते अंगण त्या आठवणी जपून ठेवते.❤
प्राजक्ताच्या फुलांनी सजलेले अंगण शेवटच्या क्षणाचा निरोप घेतल्यानंतर सजलेले अंगण दोन्ही गोष्टी निरोपाच्या असतात पण त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला वेगवेगळा...! तसेच आयुष्यही आयुष्याच्या यशोगाथेत चोरी गेलेले अंगण परत निर्माण करू या !!
नव्या पिढीला नव्या नव्या विचारांना नव्या संस्कृतीला आपल्यामध्ये जोपासताना नव्या प्रकारचे अंगणही सजवू या !!अंगणाची मज्जा आजच्या नवीन पिढीला कळू द्या! लाडक्या मुलांचे बालपण अंगणात आठवणीच्या स्वरूपात घट्ट मातीशी त्या घराच्या जिव्हाळ्याशी राहू द्या.
घरट्यातून पाखरे उडाले की ते कधी परत येतील माहित नाही पण अंगणातील त्या आठवणी आपल्या आठवणींना सुखद अनुभव मात्र नक्की देईल अंगणात चिवचिव उद्या परत आपल्या घरट्याकडे वळेल थोडा विसावासाठी तरी अंगण त्या आठवणींच्या स्वरूपात घर करून राहील....!❤❤❤
"अंगण म्हणजे घराच्या जिवंतपणा
अंगण पावसाची पहिली सर
अंगण पावसाची शेवटची सर
अंगण सूर्यप्रकाशाची पहिली किरण
अंगण मावळतीचा शेवटचा सूर्यप्रकाश "
हद्दपार होत असलेले अंगण आयुष्यात परत निर्माण करा. गोड - कडू आठवणी सोबत आंबट तिखट तुरट अशा कितीतरी चवी आपल्या आयुष्यात येऊ द्या आणि त्या फक्त त्या एका छोट्याशा मायने ओलावून गेलेल्या कोपऱ्यामध्ये असते.
अंगण पहिल माहेर उंबरठा ओलांडल्यानंतर......
अंगण शेवटचे साक्षीदार उंबरठा ओलांडल्यानंतर!!