savitalote2021@bolgger.com

स्त्री कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
स्त्री कविता सामाजिक कविता प्रासंगिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

सावरावे त्याने

             सावरावे त्याने
सावरावे त्याने माझ्या मनाला 
कान डोळे तृप्त करावे प्रेमळ 
शब्दाने...
शहाण्यासारखे वागावे प्रश्न 
न विचारताच, उत्तरच प्रश्न 
असावे ...थंडगार पाण्यासारखे 
तडतड नसावी माझ्या चुकीला 
पावसाविना मातीला सुगंध यावा 
नवनिर्मितीचे... नाद न करता 
हसत भांडण शब्द विसरावे
सकाळी -सकाळी गुलाब द्यावा 
हसऱ्या नयनाने कधीतरीच 
चाकोरीबद्ध दैनंदिन सोडून 
रुसली कि सांगावे माझे 
हसत कायम तू माझी 
               यशमाळेत...
लपाछपीच्या संसार खेळात 
सावरावे त्याने
        सविता तुकाराम लोटे 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...