........World Environment Day......
"जागतिक पर्यावरण दिनाच्या हरित शुभेच्छा"
माणसाने झाडे तोडली त्या जागेवर आपली वस्ती तयार केली पण जंगलातील प्राणी स्वतःच्या हक्काच्या जागेपासून वंचित राहिले त्या प्राण्यांचे मनोगत या कवितेत व्यक्त करण्याचा हा प्रयत्न
केलेले आहे....
*** जंगलात *****
तोडली जंगले
झाली ओसाड
माणसांच्या गर्दीत
आले वनजीव
झाली शिकार
कोंबड्या कुत्र्यांची मांजरांची
माणसांची सोबत
विचारांची
सिमेंटच्या जंगलात
वावर आता
भक्षक आणि माणसांच्या
हातात हात न घेता
आपल्या जीवाचा प्राण ज्योतीचा!!
सांगे आम्हा
आम्ही असेच राहतो
हातात हात घेऊन
जंगलात...
आम्हाचा हक्काच्या जागेवर
लचके तोडली जातात
आम्हांचीही बंदुकीच्या जोरावर
दडलेले जीव आम्ही
निसर्ग माझा सखा
पण तुम्ही तोडली
निसर्गसंपत्ती आम्ही
तोडू तुम्हाची प्राणज्योत
आम्हाचा प्राणज्योतीसाठी
असे नाही ...
आम्ही पोटभरू
जाऊ आम्हाचा वस्तीत
ओसाड...
तोडलेल्या जंगलात !!!!
✍️©️सविता तुकाराम लोटे
*** ©️✍️🏻Savita Tukaram Lote***
***********@@@@@@@@@************
World Environment Day.......
----------------------------------