savitalote2021@bolgger.com

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्यआणि कविताविद्रोही कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्यआणि कविताविद्रोही कविता सामाजिक कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

जगण्याच्या महामार्ग आहे.. .

        डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमच्या गळ्यातील ताईत का आहेत.... हा सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न.
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चूक आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..!!
       कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.

....जगण्याच्या महामार्ग आहे..  .


आम्ही आता चालत आहो
तुम्ही जबाबदारी घेत 
राहिले म्हणून 
तुम्ही इतिहास बदलला 
आम्ही तो इतिहास 
बदलू नये म्हणून प्रयत्न 
करत आहो 
कहानी तुमची संघर्षाची 
कहानी आमची त्या 
संघर्षाला जागे ठेवण्याची 
फक्त आम्हासाठी आम्ही कोण 
आहोत हे न विसरण्यासाठी    
धुळीतील कणाही नव्हतो 
आम्ही 
आज तुझ्यामुळे 
घरदार गाडी बंगले झाले 
शिक्षणाचे नवनवीन दार 
उघडले पुस्तकांच्या अक्षरांबरोबर 
मैत्री केली 
तुम्ही आमचा
स्वाभिमान आहे 
अभिमान आहे 
सन्मान आहे 
वादळाला रोखणारी शक्तिशाली 
आवाज आहे 
जगण्याच्या मार्गावरील 
महामार्ग आहे 
जगण्याच्या महामार्ग आहे


©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :-  ...... जगण्याच्या महामार्ग आहे.....

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


==========================================================

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...