savitalote2021@bolgger.com

मराठी लेख मराठी साहित्य सुविचार आयुष्य लेख सकारात्मक साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख मराठी साहित्य सुविचार आयुष्य लेख सकारात्मक साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०२४

जिंकले ते ( लेख )

!!...जिंकले ते.....!!

         काल एक लेख लिहिला त्यावर कोणीतरी बोलून गेल सागरातल्या पाण्यातून एक बादली पाणी काढल तर त्या सागराला काहीही होत नाही पण त्यांच्या मते सागरातून पाणी काढायच का? हा प्रश्न होता. खरं पाहिल तर सागरातून पाणी काढायचेच का हा प्रश्न मलाही त्यावेळी पडला होता त्यावेळी मनाने दिलेली उत्तर सहज सरळ होते. हे आयुष्य रंगमंच आहे कधी कोणत्या रंगमंचावर चेहऱ्यावर कोणते मेकअप करून लावायचे आणि वावरायच हे त्या व्यक्तीलाच ठरवावे लागते. कधी कधी न कळत कुणीतरी कोणाच्या प्रेमात पडतो आणि ती भावना मनात इतकी घर करून जाते की त्या भावनेला कधी इर्षा निर्माण होते हे त्या व्यक्तीलाही माहीत नसते. त्याच्यासाठी प्रेम हे सागर आहे त्या सागरातून एक बादली पाण्याने काढणे हे त्याच्या जिव्हारी लागते कदाचित एक थेंबही पाणी काढणे त्याच्या जिव्हारी लागते म्हणून केला जाणारा सर्व प्रयत्न आपण आहोत तर सर्व आहे ही भावनाच कदाचित त्या व्यक्तीला त्या व्यक्तीपासून दूर करत असते आणि एकतर्फी आकर्षण त्यामध्ये सर्वात मोठा भाग आहे.कधी कधी आपण विसरत जातो समोरची व्यक्ती ही स्त्री आहे फक्त आपल्याला आपल मनातील प्रेम भावनेसोबत प्रामाणिक राहावे असे वाटून जाते म्हणून चाललेला तो सर्व प्रयत्न पण एक गोष्ट विसरून जाते या मानसिकतेची व्यक्ती समोरची व्यक्ती कोण आहे ..?कशी आहे ?कायआहे?समोरच्या व्यक्तीचा व्यक्तिगत आयुष्य आपला काही संबंध नसताना गुंतत जाणे तेही मनाने आणि नंतर मेंदू ने भाव संवेदनेने हे कुठेतरी त्या व्यक्तीसाठी घातक असते म्हणून ती व्यक्ती आजूबाजूंनी नसली की त्या व्यक्तीसाठी त्या व्यक्तीने निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे खूप काही नुकसान करून जाते. ती गोष्ट त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीसोबत ही घडते तिला माहित सुद्धा नसते ,ती वेळ ही वेळ दोन्ही निघून जातात झालेले नुकसान त्या व्यक्तीच असते त्या आकर्षित मनाच नसते तो आपला आपल्या आयुष्यात खुश असतो त्याच्या अंगणात आनंदाचे झाड फळाफुलांनी बहरलेलं असत पण झालेलं नुकसान त्या व्यक्तीच नसते त्या व्यक्तीचा काही संबंध नुकसान झालेल्या व्यक्तीशी नसते म्हणून सागराला काही फरक पडत नाही एक बादली पाणी काढलं तर !!कारण त्याला माहीतच नसते तो सहज सहजतेने आपलं कार्य करीत असतो. कारण समर्पण त्या वाहत येणाऱ्या नदी सोबत असते पाण्यासोबत नाही तसंच तर पाणी खारट नसतं तसंच तर पाणी पिण्यायोग्य असतं पण तसं नाही नदी गोड आहे सागर खारट आहे समर्पण दोघाची आहे पण दोघांची भावना वेगवेगळी आहे. व्यक्तींच्या आयुष्यातही अशा समर्पणाच्या व्यक्ती येऊन जातात पण ते समर्पण आपण कुठे असते आपल्या पुरत असते नदीचे समर्पण कधीही विशिष्ट एका जागेसाठी नसते तिचं समर्पण तिची आपुलकी तिचा जिव्हाळा तिचे साधेपण पण खळखळत वाहणाऱ्या दगडांसोबत वाहत राहते कारण तिच समर्पण त्या सागराची असते तिच्या मनातली त्या एकनिष्ठ व्यक्तीशी असते त्यातलं कोणीही एक बादली पाणी काढलं म्हणून ते कमी होत नाही कमी होऊ शकत नाही कारण तिचं मन तिच्या भाव संवेदना प्रेमाने भरलेलं असतं प्रेम हे वेगवेगळे असू शकतं वेगवेगळ्या व्याख्याने सजलेलं असू शकत पण आकर्षण फक्त स्वार्थांनी भरलं असते जे आकर्षणाची व्यक्ती असते तिच्या नुकसानांनी भरलेलं असते असो जगण्याची वाट खडतडच आहे अजून थोडी खडतड असते अजून थोडी खडतड असेल पण अंगणात आयुष्याच्या कुठेतरी विसावाची जागा नक्की ठरलेली आहे ती जागा मिळाली नाही तर एक जागा तर आयुष्याने ठरवूनच दिली आहे जी जन्माने मिळाली आहे जन्माचा प्रवास हा शेवटचा प्रवासासोबतच संपतो म्हणून विसावा मिळणारच आहे कितीही खडतर आयुष्य असले तरी सर्वांनाच म्हणून आनंदी राहा जगत रहा हसत रहा दुःख सांगत रहा दुःख ऐकत रहा आनंद वाटत रहा हसू चोहिकडे पसरू द्या उद्धटपणाचा मान सन्मान कोणीही देऊन जातो पण हसूचा आहेर देण्यासाठी भावना जिवंत असावी लागते'"💕माणुसकीची💕"

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


------------------------------------ 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...