savitalote2021@bolgger.com

निसर्ग कविता Nature poem in life kavita Marathi Prem kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निसर्ग कविता Nature poem in life kavita Marathi Prem kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १९ जून, २०२१

सुगंधी फुलपाखरू

    

             रातराणी चे झाड फुलते आणि त्याच्या सुगंधाने वेडावलेले फुलपाखरू फुलांना स्पर्श करतो त्यावर सुचलेली हि स्वलिखित कविता...

     ***  सुगंधी फुलपाखरू  ***


हतबल करीती फुलपाखरांना 
सुगंधाने ...रातराणी 
गळून पडे, अलगद स्पर्शाने 
फुलपाखरांच्या पांढराशुभ्र 
रातराणीचा प्रवास 
फुललेल्या चांदण्यात हळूच 
उजेडात....
ओसरतो मन गंध 
बहर धुंदी 
उरतो ...फक्त पाकळ्यांची 
सुबक रांगोळी 
धरणीवरती 
थकलेली गंधहीन
प्रवासाची.... 
बेधुंद निशा

           ✍️🏻©️सविता तुकाराम लोटे 

 ©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  सुगंधी फुलपाखरू 
अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा 
Thank you
  

*************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...