"प्रश्न काही
अनुत्तरितच????"
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही प्रश्न असे असतात, कि ते असावे की नाही? या प्रश्नातच गुरफटलेले असतात. प्रश्नांचे उत्तर मिळणे इतके महत्वाचे का असते??माहित नाही. जीवनात अनेक प्रश्न पावलोपावली पडत राहतात. प्रश्नांचा एक बाजार आणि त्याही पुढे जाऊन म्हणावे लागेल; प्रश्नांची बाजारपेठच असते. तिथे प्रश्नांचा बाजारच भरलेला असतो. आणि ती जागा असतो आपला मेंदू, आपली मानसिकता आणि आपले विचार..!!
आयुष्याच्या गणितात काही प्रश्न हे सहज घेऊन जातात.त्या प्रश्नाचे उत्तर ही सहज मिळतात. पण काही प्रश्न असे असतात कि ते प्रश्न आपले नसतात!! तरीही ते प्रश्न सतत सतत त्या बाजारपेठेमध्ये येत राहते. त्या बाजारपेठेत त्याला काहीही किंमत नसते. तरी सतत आपले अस्तित्व निर्माण करीत राहतात.
आयुष्यात कधी कधी एकदम अशक्य वाटून जाते; त्या प्रश्नांमुळे जाणवत राहते त्या प्रश्न मागचे अस्तित्व शब्दांसोबत आणि शब्दांशिवाय...! आयुष्याचे गणित उगीचच अगतिकतेकडे घेऊन जाते.
प्रश्नांची उत्तरे सापडत नाही आणि उत्तरे सापडली तर प्रश्नांचे अस्तित्व वास्तवात सापडत नाही. पाऊलवाटच गुरफटलेल्या असतात. त्या प्रश्न आणि उत्तर यांच्या शृंखला मध्ये..!! नियमित एक प्रश्न आणि नियमित एक उत्तर.
प्रश्न आणि उत्तरे एका धागामध्ये घट्ट विणले जातात. ते जर आपले असेल.... आपल्या आयुष्याच्या गणितातील असेल.... तर ते प्रश्न उत्तरे सहज आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो, जपून ठेवू शकतो.... नात्यांमध्ये घट्ट रेशीमबंधामध्ये त्यांना मानाचे स्थान देऊ शकतो पण तसे होतच नाही.
काही प्रश्नांची उत्तरे मिळणे हे मानसिक शांतीसाठी खूप महत्त्वाचे असतात. प्रश्न फक्त हाच आहे की, त्या प्रश्नाचे स्वरूप कसे आहे. ते आपल्या जीवनातील कोणत्या जीवन प्रसंगाशी संबंधित आहे. त्या प्रश्नांच्या उत्तरामुळे आपल्या आयुष्यात काय बदल होणार आहे.
आपली प्रत्येक वाट चुकलेल्या अवस्थेत आहे का? ती उलगडणे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्वाचे असते काही प्रश्नांची उत्तरे! जीवनात वादळ येतील, म्हणून प्रत्येक वेळी वादळांना समोर जाण्यासाठी तयार व्हायचे का? जीवन खुप सुंदर आहे. जर आपण स्वतःला त्या वादळाला समोर जाण्यासाठी तयार करीत राहात असू तर आयुष्य कधी जगायचे... सहज सुंदर!!आपले स्वतःच्या अस्तित्वाचे.
हा प्रश्न नेहमी उपस्थित होते. वादळे येतील ...वादळे जातीलही.... वादळे आली गेली तरी शेवटी प्रश्नचिन्ह रहातो. ते वादळ का आले??? या प्रश्न मागे आपली बाजारपेठ कामाला लागेल आणि स्वतःला रीत करून टाकते प्रश्नांच्या त्या बाजारपेठेत..!!
आयुष्याच्या वाळवंटात काही प्रश्न असे असतात की मुळातच त्या प्रश्नांना काहीही अस्तित्व नसते. त्यांची उत्तरे मिळाली तरी गरजेची नसते आणि नाही मिळाले तर मनाला कुणकुण लागून राहते. असे का? तसे का?कशाला? कशासाठी??? प्रश्नचिन्ह बाजारपेठेमध्ये येऊन जाते. तर आयुष्याच्या वाळवंटात काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे मिळणे खूप गरजेचे असते ते न मिळाल्यास मनातील कटुता वाढत जाते.
रित मनाला वाट चुकलेल्या वाटसरू सारखे वाटते.प्रश्न आणि फक्त प्रश्न उत्तरही नाही आणि प्रश्नांची शृंखला खूप मोठी होत जाते. प्रश्नांसोबत स्वतः सुद्धा एकटाच चालत राहतो. कुणाची वाट पाहत नाही. कुणाकडून उत्तरांची अपेक्षा करत नाही. मन हळवे होत जाते. हळवे मन अधिकच हळवे होत जाते. जेव्हा त्यांना त्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. तेही कठोर ..!!म्हणून मनाच्या साथीने नेहमी न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधू नका आणि तो प्रश्न आयुष्याच्या जगण्या वाचण्याचा प्रश्न असेल तर मुळीच शोधू नेका.
आयुष्यात गरजेचे काहीच नाही आणि आयुष्यात खूप गोष्टी गरजेचा आहे. जर आपले अस्तित्व वास्तव आणि जिवंतपणा असेल तरच. म्हणून प्रश्नांच्या वादळामध्ये स्वतःला हरवून नेका. जीवन हे वाळवंटासारखे आहे.... जीवन हे वादळासारखे आहे ...जीवन हे हळव्या जाणिवेने भरलेले आहे ....जीवन हे पानगळीचा ऋतू सारखे आहे..... जीवन हे एकटे चालणे आहे पण सोबत सर्वांना घेऊन!! जीवन हे जपण्याची गोष्ट आहे ....जपून ठेवण्याची गोष्ट आहे ....जीवन हे वास्तवाला स्वीकार करून दृढनिश्चयाने चालण्याची गोष्ट आहे.... जीवन हे एक प्रश्नचिन्ह आहे....
जीवनाच्या प्रत्येक पावलांवर एक प्रश्न आहे..... जीवन हे निखाऱ्यावर चालणारी गोष्ट आहे ....जीवन हे हळव्या मनाला जपून संघर्षाच्या पावलांवर चालण्याची गोष्ट आहे...... प्रश्न येतील प्रश्नांची उत्तरे ही मिळतील. काही प्रश्न अनुत्तरीत राहतील.....अनुत्तरीत राहतील म्हणून मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे म्हणजे जीवन नाही आणि उत्तरे न मिळालेल्या प्रश्नांमध्ये स्वतः ला गुंतवून ठेवणेही नाही.
शब्द आपले असतात. उत्तरे आपले असतात. पण प्रश्न मात्र इतर व्यक्ती आपल्या बाजारपेठेमध्ये टाकून जाते. देऊन जाते. घट्ट विणलेल्या दोरीसारखे कोणी ती दोरी स्वतःजवळ ठेवतच नाही आणि कुणी मात्र ती दोरी स्वतःच्या जीवनातील अतिशय महत्त्वपूर्ण अंग असल्यासारखे त्यामध्ये स्वतःला गुरफटून टाकतात. तिथेच प्रश्न अनुत्तरित होतात. प्रश्न मागचे उत्तरे आणि उत्तरे मागचे प्रश्न त्यामुळे कायम चालू राहतो म्हणून प्रश्न आले तर प्रश्नांची उत्तरे सहज मिळत असेल तर किंवा थोडे प्रयत्न करून मिळत असेल तर त्यांची उत्तरे नक्की शोधा पण जर जीवनात असे काही प्रश्न असतात त्यांची उत्तरे कधीच मिळत नाही त्या प्रश्नांच्या बाजूला जाऊन ते शोधत बसू नका.
वास्तव आयुष्य खूप कठीण होऊन जाते. आपल्या बाजारपेठेला अशा चिखलामध्ये घेऊन जाते तिथून निघणे फार कठीण असते. निघाल्यास आपले अस्तित्वपणाला लागलेले असते. म्हणून काही प्रश्न अनुत्तरित रहात असेल तर राहू द्या ..!!!
काही क्षणासाठी मनाचा वैताग होईल. मनामध्ये नको नको ते शब्द येतील. मनातूनही आणि समोर असलेल्या वास्तव जगातूनही. म्हणून खंबीर व्हा...!!
काही नाते घट्ट असतात ते कधीही तुटत नाही तुटू देत नाही. परिस्थिती आपल्या विरुद्ध बाजूने जात असले तरी आणि परिस्थिती आपल्या बाजूने असली तरी. म्हणून प्रश्नांच्या बाजारपेठेमध्ये स्वत:ला हरवून जाऊ नका. प्रश्न आले तर उत्तर येणारच आणि उत्तरे मिळाली तर तो प्रश्न संपेल असे ही नाही.
कारण तो प्रश्न नवीन स्वरूपात आपल्यासमोर परत उभा राहू शकतो म्हणून उत्तरांच्या शोधामध्ये स्वतःचे भवितव्य गुंडाळून ठेवण्यापेक्षा प्रश्न उत्तराच्या नात्यातील ताण सैल करा. प्रश्नांच्या बाजारपेठेमध्ये हसत मुखाने आपल्या अस्तित्वाचे गणित सोडवत चला. मनसोक्त हसा ...मनसोक्त आयुष्य जगा आणि मनसोक्त निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर करून घ्या...!!कारण आयुष्य खूप सुंदर आहे....आयुष्य खूप सुंदर आहे... काही प्रश्न अनुत्तरीत राहिले तरी आयुष्य खूप सुंदर आहे.
प्रश्नांचे वादळ
प्रश्नांचे उत्तरे
अनुत्तरीत क्षणांचे
अनुत्तरित उत्तरे
वास्तव जगण्याची
वाट मोकळी...!!
प्रश्न काही अनुत्तरितच राहतात असे जरी मान्य केले तरी कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतातच. कारण अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही, कि ती शक्य होणार नाही. शेवटी महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर असतो. आपल्या अस्तित्वाचा आणि ते अस्तित्व आपण त्या प्रश्नांच्या बाजार पेठेसोबत स्वीकार करून प्रत्येक गोष्टीचा दोन्ही म्हणजे अलीकडे आणि पलीकडे, सकारात्मक नकारात्मक किंवा हो की नाही आणि त्याही समोर जाऊन म्हणावे लागेल,आपल्या अस्तित्वाचे वास्तव उत्तर म्हणजे आपले जगणे.
म्हणून जगण्याच्या वाटेवर प्रश्न थोडे बाजूला ठेवला. उत्तरे थोडे बाजूला ठेवा आणि फक्त मनसोक्त जगा आणि जगू द्या..!! कारण जे प्रश्न आपल्याला पडतात तेच प्रश्न आपल्या आजूबाजूला निसर्गाने जे जग निर्माण केले आहे त्यातील असंख्य व्यक्तींना पडत असतात. म्हणून च प्रश्नांची बाजारपेठ आपल्या मेंदूमधून मानसिकतेमधून आणि त्या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे काळोखात हरवत चाललेला मनाला बाहेर काढा आणि जगा जगू द्या मनमोकळेपणाने मनाला..!!
✍️©️®️#सविता तुकाराम लोटे
©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- प्रश्न काही
अनुत्तरितच????"
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चूक आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद.
===========================