savitalote2021@bolgger.com

मराठी लेख मराठी कविता दिली साहित्य मराठी साहित्य चारोळी मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख मराठी कविता दिली साहित्य मराठी साहित्य चारोळी मराठी कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

पहिले प्रेम

" पहिले प्रेम "

अबोलीच्या शब्दांनी थरथरत्या मनाने 
           व्याकूळ हृदयाने....!!

      प्रेमाच्या वाटेवर रंग भारी असतात. दोघांच्या नजरामध्ये बोलकेपणाची चाहूल असते. धाडस जिव्हाळा उमलत्या भावनेला बोलकेपणाची हितगुज असते.
       आठवणींची साठवण असते. क्षण विसरून जातात आठवणी गोळा करता - करता. जळमट नसलेली भावना सुंदर वळणावर आयुष्याच्या नवीन पहाट घेऊन येतात. उगाच वाटत पंखाना बळ आले..... आकाश रंगविण्यासाठी..!!                  जोडलेल्या दाट स्तब्ध आठवणींना रडता ही येत नाही आणि जवळही ठेवता येत नाही. फक्त रमते हसऱ्या गोजिरवाण्या फुलासारखे भरलेल्या अंगणांसारखे. वाफवलेल्या पाण्याच्या वाफेसारखे.
        सुखदुःखाची किनारे हरवलेले तरीपण पिंजऱ्यात नसण्याची भावना मनात दाटून येते. शब्दांची गरज का वाटत नाही वेदनेची जाणीव होत नाही सोन्यासारख्या मनाला फक्त धावणाऱ्या पाखरांची तितकी आठवण असते. 

        प्रेम ही किती नाजूक भावना आहे हे कळते. आपली नाते दाट हसऱ्या फुलांसारखे असावे. 
       खोट्या शब्दांची चाहूल नसावी. फक्त हसऱ्या गालावर हसऱ्या प्रीतीची चाहूल असावी  परिपूर्णता काय असते,माहीत नसलेल्या मनाला उन्हातही सावली शोधावी लागत नाही कारण प्रेमच सावली असते.
         पहिले प्रेम म्हणजे मनाचा कोऱ्या पानावर नवीन शब्द भावना संवेदना निर्माण करणारी जाणीव असते. कोऱ्या मनावर कौतुकाची छाप असते.
         सौंदर्याने सजलेल्या मनावर प्रकाशाची चाहूल असते. सौंदर्य मनाचे विश्वासाने भरलेले पहिले प्रेम ...!! हृदयामध्ये श्वासामध्ये नवीन ऊर्जा निर्माण करते.
       आई-वडिलांनी जीवापाड जपलेल्या आपल्या मनावर कुणीतरी अधिराज्य निर्माण करीत असते. नवीन शब्द नवीन भावना नवीन स्पंदने नवीन सुहास नवीन शब्दांची एक सुरेख मैफिल आठवणींच्या स्वरूपात अभ्यासासोबत येत असते.
       रंगबावऱ्या मनाला फुललेले झाड आणि मनसोक्त आपल्याच हसऱ्या मनाला नवविश्वास घेऊन येते. 
     पहिल प्रेम विसरणे त्यामुळेच कठीण जात असावे. हृदयाच्या एका कोपऱ्यात नवसाचा पणती सारखे अखंड जळत राहते आठवणींच्या स्वरूपात...!!

      कधी कधी लिहिताना माझ्याही मनातल्या काही आठवणी त्या आता विसरल्या गेल्या आहे तरी त्या डोकावून पाहतात.
       प्रेम आनंदी मनाला आनंदित करून जाते. प्रेमाची भाषा न कळता वयात पहिले प्रेम होते. मनातल्या भावना काय असतात हेही माहीत नसणाऱ्या आपल्या भावनांना गुलाबी नवीन पहाट काय माहित असेल.
      अशा वयात पहिले प्रेम जीवनात येते. नात्यात घट्ट बांधून ठेवते आणि मनातील भावनेला उगवता सूर्यासारखा रंगीबेरंगी करून जाते. मावळतीच्या सूर्याचा प्रकाश समुद्राच्या लाटा सारखा बेभान करून जाते.
      पहिल प्रेम म्हणजे ती सवय आयुष्याच्या शेवटी ही आपल्या सोबत असते पहिल प्रेम मनाच्या मैफिलीत सुरेल सप्तस्वर...!❤

        लिहिता लिहिता काही आठवणी अशा डोळ्यांसमोर येऊन गेल्या. विश्वासाच्या नात्यावर प्रेम अवलंबून असते, अशी म्हणणारी मी आता पहिला प्रेमाबद्दल लिहिताना पहिला प्रेमात विश्वास अविश्वास यासारखे काही नसते असे वाटते.
      पहिल प्रेम म्हणजे वेड असावे. मनात विचारांची गर्दी नसते. हुरहुर नसते. स्पंदने नसतात. श्वासही आपला पुरताच असतो आणि मिठी आई पुरती...❤!
          त्यामुळे ज्या वयात पहिल प्रेम होत ते फक्त एक आकर्षण असते. त्या जवळीक नसते. दुरावा नसते. तरी पण ते  प्रेम असते आणि विशेष म्हणजे ते पहिल प्रेम असते...!❤❤               फुलत जातो.... हसत जातो.... मैत्रीची नवी भाषा कळते. आनंदाची नवीन भाषा कळते. मैत्री फुलली जाते. आयुष्याचे चित्र रेखाटले जाते. त्या पहिल्या प्रेमामुळे आणि असाच हळव प्रेम प्रत्येकांच्या अजाणत्या वयात त्यांच्यासोबत येते.
    पहिल प्रेम म्हणजे आकाशातील चंद्र तारे ओंजळीत आणून देणारे.  पहिल प्रेम म्हणजे लांब वरून बघताना गालावर आलेले हसू...... कोऱ्या मनावर बंदिस्त शब्दांचे चाहूल..... फक्त स्वतःसाठी त्यात मिलन नसते.... त्यात आपलेपणा नसतो......त्यात शांतताही नसते..... त्यात गार वाराही नसतो..... आणि त्यात उगवत्या सूर्यासारखा रंगीबेरंगी जगण्याची कल्पनाही नसते.... 
        तरीपण पहिल प्रेम दर्पण असते. आपल्या संस्काराचे पहिले प्रेम आरसा असतो. आपल्या जाणिवेचे पण पहिल प्रेम ओल्या आठवणीचा ओला सुगंध असतो. पहिल प्रेम अबोली असताना अंगणातली...!❤❤
        आयुष्याचा प्रवास चालू करणारी पहिली पायवाट असते असे मला वाटून जाते. कारण पहिल प्रेम प्रत्येकांच्या आयुष्यात येते आणि ते कसे असेल यावर आपले समोरचे आयुष्य ठरत असते.
        मुली फ्रॉग मधून ड्रेस मध्ये येत असताना भावनांची चलबिचल नैसर्गिक रित्या होत असते. मुले ही ना लहान असतात ना तरुण. आणि त्या भावनांवर प्रभुत्व मिळविणे एवढीच बुद्धिमत्ता आपल्याजवळ असते. आई सांगेल ते विश्व असणाऱ्या त्या वयात पहिला प्रेम होते. 
       अशा क्षणाला जर वारा निघून गेला; भावनेच्या भरात तर पाखरांना घरट मिळतच नाही पवित्र भावनेचे...!
        म्हणून पहिला प्रेमासाठी खूप सांभाळावे लागते. मनाला भावनेला उत्तेजनाला केविलवाण्या मनाला उभ्या असलेला आयुष्यातील सांजवेळेला आणि फांदी जाऊ नये निसर्गचक्राचे म्हणून घेतले जाणारे प्रयत्न, त्यात पहिले प्रेम होते .. !
         सांगा किती संघर्ष असतो, पहिला प्रेमासाठी !!किती भावनेच्या गणितांमधून जावे लागते. हे त्या व्यक्तीलाच माहीत असते. 
       पहिल प्रेम आठवणींच्या त्या कप्प्यात साठले जाते तिथे कोणीही जाऊ शकत नाही. कुणीही त्या आठवणी पुसू शकत नाही. पहिल प्रेम आकाशात भरारी घेणाऱ्या त्या पिलांसारख असते  ते पहिल्यांदाच आकाशात भरारी घेत असते. न त्याला या जगाचा रंग माहीत असतो ना त्याला तुटलेली फांदी माहिती असते.
        नात्याला उन्हाची चाहूल माहित असते फक्त त्याला ओढ असते उडण्याची उंच भरारी घेण्याची ...!

          पहिल प्रेम खरच अलौकिक भावना. गंमत - जंमत फक्त शब्दाविनाच. आयुष्यात पहिले प्रेम आले आणि आयुष्याला नवीन वळण आले माहित नाही त्याला पहिलं प्रेम म्हणायचे की नाही पण सकाळच्या सूर्यप्रकाशात बरोबर ते आले झोपेतून उठलेल्या त्या चेहऱ्यासोबत आले.       
       गोड गोड आठवणींचा खजिना देऊन गेले. प्रेमाची पहिली लाट येऊन गेली.... गुंतून गेली..... फुलवून गेली. सूर्यप्रकाशाच्या शांत वातावरणात भीतीचे सावट मागे ठेवून गेली.
         पण पहिला प्रेमात गुंतणे असे झालेच नाही. प्रेम होते त्या उमलत्या भावना होता त्या अजाणत्या वयात पण त्यात गुंतले झालेच नाही माहीत असताना हे समोरचा व्यक्ती जिवापाड गुंतलेला असताना खूप कठीण वेळ होती ती आरसा सारखा स्वच्छ हृदयाला नाजूक कोरीव काम त्यामुळे मोकळ्या मनाने केला.
          आज जुन्या आठवणी ताज्या झाल्या. मनालाही त्या आठवणीत न रमू देणारे मी पहिल प्रेम लिहिताना ते प्रेम आटून गेले आता अस वाटत. माझी सावली मला हसत असावी कारण पहिल प्रेम त्या सावली सारख होत.
       कधी मागे तर कधी समोर अखेर संपलेल पानगळीसारख न परत उगवलेला न परत सुगंध मनात दळवळणार. त्याच हसू फक्त तितका आता लक्षात आहे. पण ते हसू आता हे मनाला प्रफुल्लित करून जाते. पहिला पावसाचा सुगंध मनात ओला होऊन जातो.
      ढगाळलेले वातावरण आता नयनात आणि मोकळा झालेल्या आठवणी मनाला टोचतात तरी पण मन फुलतात कळीसारखं फुलत गेले कारण ती पहिलं प्रेम होत ना! ओलांडलेल्या मर्यादा आणि सावलीची किंमत त्या पहिल्या प्रेमामुळे आपल्याला कळते हे विशेष.
        अभ्यासाची ओढ आणि लिखाणाची ओढ पहिला प्रेमामुळे मनात निर्माण झाली. माझा प्रत्येक शब्द निशब्द त्या पहिल्या प्रेमाची आठवण असते. कारण माझ शब्दच त्या विरहात निर्माण झालेल्या आहे. ते कधीही मी स्वतः स्वतःला मान्य केलेले नाही.
      प्रेम ही भावना फक्त शब्द पुरती मर्यादित नसते तर प्रेम हे भावना घट्ट आनंद झाला की मिठी मारलेला त्या क्षणासारखे असते पहिल प्रेम. 

हिरवळ पहिल प्रेम .....
सबुरी पहिल प्रेम.... 
मोरपीस पहिल प्रेम.... 
मोहक फुल पहिल प्रेम.... 
गवताची पाती पहिल प्रेम...... 
सजलेली पायवाट पहिल प्रेम.....  
हरवलेला विरह पहिल प्रेम.... 

           शिदोरी हळव्या भावनेशी पहिल प्रेम विखुरलेल्या आठवणींची पहिल प्रेम ❤💕!!

         ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
        लेख स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
       कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आपल्या सूचना गोड- कडू दोन्हीही शब्दात नक्की कळवा आणि मनातील विचारांना शब्द द्या..!❤

============💔💔💔💔❤❤❤❤💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...