savitalote2021@bolgger.com

Diary case one 1. In a pleasant leafy life डायरीप्रकरण एक1.सुखद पानगळ आयुष्यातील लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Diary case one 1. In a pleasant leafy life डायरीप्रकरण एक1.सुखद पानगळ आयुष्यातील लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

डायरी प्रकरण एक1.सुखद पानगळ आयुष्यातील

        डायरी प्रकरण एक

1.सुखद पानगळ आयुष्यातील

        खिडकीतून बाहेर पाहताना, नेहमीसारखे आज वाटत नव्हते. हिरवळ हिरवळ दिसत नव्हती. पानगळीमुळे झाडांचे सौंदर्य कमी झाले होते. वातावरणात हवेचे साम्राज्य होते. सोबत धूळ, सर्वीकडे पसरलेली होती.

         हलकीच उन्ह, पण चटके देणारी. हसरी गालातल्या गालात हसणारी झाडांच्या सोबतीने वर चढणारी वेली..!!! आज किंचितच नाराज वाटत होती. माहित नाही, पण ती नाराज असावी. कारण ती नेहमीसारखी फुललेली नव्हती. आपल्याच विचारात असावी जणू ती अशी वाटत होती.

           पण प्रश्न पडतो ती तशी का असावी बदलत्या वातावरणामुळे की पानगळीमुळे...! बदललेल्या झाडांच्या आरोपामुळे कि ती ही त्या झाडाच्या बदलत्या रूपामुळे असावी जणू.

        असो, पण एक खर; आज वेली नाराज होती. न फुललेली... आधाराला आधार घ्यावा असे वाटत होते पण ती ते देऊ शकत नव्हती. कितीही इच्छा असली तरी..!!

            कारण पानगळ म्हणजे संपूर्ण स्वतःला बदलणे आणि नवीन रूपाचे स्वागत करणे. पण वेलीला हे चक्र माहीत असले तरी सुद्धा त्यांचा एक भाग आहे तरी सुद्धा ती नाराज होत होती. बदललेल्या वातावरणावर आपल्याच विश्वात रमलेली कोमेजून जात. 


         खरंच खिडकीतून हे चित्र पाहताना एक सत्य मात्र समोर आले. बदलता परिस्थिती बरोबर झाडे वेली पाने बदलत जातात.. पानगळी आधी असलेल्या सौंदर्य आज नव्हते. तसेच ऋतूचक्रा प्रमाणे ते परत येतील. नवपावलीची चाहूल परत येईल परत फुलांचा बहर परत फळांचे बहरलेले झाड खाण्यासाठी चिमण्यांचा किलबिलाट विविध प्रकारचे पक्षी झाडांवर येतील.

        परत झाड हसेल, फुलेल आणि स्वतःच्या सौंदर्यावर स्वतः च हसेल. त्याचा आस्वाद वेली वाचली तर घेईल.... पण ती वाचली नाही तर???  पानगळीचे चटकेदार ऊन सहन झाली नाही तर..!!! कसे होईल..! तिचे अस्तित्व पणाला लावलेले आहे. आता या पानगळी मध्ये.

          ऋतूचक्राने तिच्यासाठी उपाय योजना केल्या असतील हे खरे पण ती कोमेजून जाईल. फक्त आणि फक्त तिला तिच्या अस्तित्वाचे प्रश्न चिन्ह आता उभे आहे. या पानगळीमध्ये  कदाचित असे वाटते पण ही पानगळ दरवर्षी येेत तिच्या आयुष्यात.

         इतके वर्ष झाली, मी तिला खिडकीतून पहात असते. तिने तिचे अस्तित्व कायम ठेवले आहे. कितीही चटके सहन केले तरी, ....तरी हसली. एका क्षणानंतर... एका वेळेनंतर तरी आज तिचे अस्तित्वपणाला आहे हे नक्की.

         पण ती हसणार नाही... हरणार नाही जिंकणार त्या झाडाचा आधार घेत वाटेत फुलायला. कोमेजलेली असली तरी. ते झाड आधार देईल तिला..! कारण तिच्याशिवाय त्या झाडाला अस्तित्व नाही सौंदर्याचे आणि तिला सुद्धा.

              निसर्ग प्रत्येकाला स्वतःमध्ये एक अलौकिक शक्ती देत असते. तसेच त्या दोघांनाही मिळालेली आहे.पानगळीचे दुःख दोघांनाही सोबत सहन करावे लागत आहे. हे आता माझ्या लक्षात आले. ते कोमेजलेली नाही तर तीसुद्धा बदलत्या वातावरणाचा एक भाग आहे.

           ती ही फुलेल. झाडासारखीच आता पाने नसली तरी ती ही फुलेल. नवपालवीने कळीसोबत मनसोक्त गालातल्या गालात हसेल आकाशाशी स्पर्धा करीत..! वाटेत, झाडाच्या सोबतीने आणि स्वतःचे व झाडाचे सौंदर्य अधिक द्विगुणित करेल. 


        खरंच असे होईल. निसर्ग आपले रूप दाखवीत नाही पण सर्वांना त्या चक्रामधून जावे लागते. ती हसत गालातल्या गालातच माझ्याकडे बघत बोलून गेली. खिडकी बंद करावीत याच क्षणाला ती वेल हवेमुळे हलती झाली आणि तिच्यातील अडकलेली पाने खाली आली.

         परत ती हसली झाल्यासारखी वाटली. बघ ओझे कमी झाले की होते आपण परत त्याच वेळेनुसार हलके. आयुष्यात उणे असे काहीच नाही. हो,निसर्ग मानवाला सांगून समजून जातो. उणे असे काही नाही..., ती मरगळ नष्ट होणार आहे.  वाऱ्याच्या झुळकेप्रमाणे...

             नवपावलांच्या साक्षीने आणि हसऱ्या शब्दांनी निसर्गाचा हा नियम मानवी आयुष्याला खूप मोठी सकारात्मक देवी शक्तीचे रूप दाखवीत असते. म्हणून पानगळीची सुद्धा स्वागत करा. कधी हसरे बनवून तर कधी त्याकडे दुर्लक्ष करून. स्वतःला नवपावलांचे दान मात्र मिळणार आहे हे नेहमी लक्षात ठेवा...!! 


पानगळी  दुःख नको आता
फक्त सोबत हवी आता 
बदलता चक्राला मनसोक्त 
स्वतः मध्ये रुपांतरीत करतात 
आणि हसरा पावलांना स्वतःच्या कवेत घेण्यासाठी.....!!!


        पानगळ जाईल आयुष्य फुलेल आयुष्य बहरेल आणि आयुष्य नवीन क्षणासोबत नवीन आव्हाने सुद्धा निर्माण करील.


आव्हानांना समोर जावे लागेल 
पानगळीचे दुःख सोबत ठेवून 
कारण बदलत्या वेळेला 
बदलत्या शब्दांना आपले शब्द 
आपली आव्हाने कमी करेल 
पानगळ गेली की, 
आव्हान संपुष्टात येईल...



         मानवी आयुष्याचे हे चक्र असेच चालू राहील. फक्त त्या चक्रावरील गणिताचे गणित आयुष्याला त्या वेळेला समजून घ्यावे लागेल. तरच मानवी आयुष्य हे सुखी आनंद समाधानाचे आणि आव्हान संपुष्टात येणार असेल. म्हणून कोणत्याही संकटांना घाबरून जाऊ नेका. संकट जातील.... संकटांना घाबरून जाऊ नका संकटावर मात करता येते. हा निसर्गनियम आहे... ऋतूचक्रानुसार चालावेच लागेल.

         सुखाच्या पायवाटा आपल्यासोबत असेल फुले लेवेली प्रमाणे बदललेल्या झाडाच्या रूपा प्रमाणे झाडाचा आधार सोबत घ्यावा लागला तरी ती परत फुललेली हसली मनसोक्त गालातल्या गालात पानगळी सोबतही आणि पानगळ संपल्यानंतरही...!!


                ©️®️✍️सविता तकाराम लोटे 

©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- *****   डायरी प्रकरण एक
               1.सुखद पानगळ आयुष्यातील****

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 


----------------------------------

Diary case one

 1. In a pleasant leafy life

 Looking out the window, today did not feel like usual.  The green didn't look green.  The beauty of the trees was diminished by the leaves.  The atmosphere was a realm of air.  Along with the dust was spread everywhere.

 Light sun, but clicks.  Smiling cheeks, smiling cheeks, climbing vines .. !!!  Feeling we have 'Run out of gas' emotionally.  Don't know, but she must be upset.  Because she was not blooming as usual.  She must have been thinking to herself.

 But the question is why it should be like that due to the changing environment or because of the leaves ...!  The accusation of a changed tree may be due to the changing appearance of that tree.

 Anyway, but a fact;  Veli was upset today.  It didn't bloom ... I wanted to support Aadhaar but she couldn't give it.  No matter how much you wish .. !!


Because Pangal means to change the whole self and welcome a new look.  But even though Veli knew this cycle, even though it was a part of her, she was getting annoyed.  Going through a coma in our own universe on a changed environment.


 In fact, looking at this picture through the window, a truth came to light.  With the changing conditions, the leaves of the trees are changing. The beauty before the leaves was not there today.  They will also return like the seasons.  The New Year's Eve will return, the flowering will return, the fruit will bloom again

 The tree will smile again, bloom and laugh at its own beauty.  Will enjoy it if Veli reads it .... but if she doesn't read it ???  If you can't stand the sticky wool of the leaves .. !!!  How will it be ..!  Her very existence is at stake.  Now in this leaf.

 It is true that Rituchakra may have planned remedies for her but she will pass away.  The only and only question mark of her existence now stands for her.  It may seem like this in Pangali but this Pangali comes every year in her life.


After all these years, I used to look at her through the window.  She has maintained her existence.  No matter how many clicks she endured, she still laughed.  After a moment ... after a while, of course, she is alive today.

 But she won't laugh ... she won't lose, she won't win.  Although comatose.  That tree will support her ..!  Because without her, the tree would not exist, and so would she.

 Nature gives everyone a supernatural power within themselves.  Also, both of them have got it. Both of them have to bear the pain of bed together.  It dawned on me now.  It is not a coma but a part of the changing environment.

 It will bloom.  Like a tree, it no longer has leaves, but it will bloom.  Navpalvi competes with the sky with a smile on her cheeks ..!  Along the way, you will double the beauty of yourself and the tree.

It will really happen.  Nature does not show its form but everyone has to go through that cycle.  She smiled and looked at me and said.  At the moment when the window had to be closed, the vine was shaken by the wind and the leaves stuck in it came down.

 Back then she seemed to be laughing.  Look, if the burden is reduced, you will be light at the same time.  There is nothing wrong with life.  Yes, nature is understood by human beings.  There is nothing wrong with that ..., that mirage is going to be destroyed.  Like a gust of wind ...

 With the testimony of Navpaval and the words of laughter, this law of nature shows the form of a very positive divine power to human life.  So welcome to Pangali too.  Sometimes by making a smile and sometimes by ignoring it.  Always remember that you will get the gift of new steps ... !!


 Don't worry about the leaves now
 Just want to accompany now
 Like the changing cycle
 Transform into self
 And to take the smiling steps in your own hands ..... !!!


 Life will flourish and life will flourish and life will create new challenges along with new moments.

Challenges have to be faced
 Keeping the grief of the leaf with you
 Because of the changing times
 Your words to changing words
 Will reduce your challenges
 When the leaves are gone,
 The challenge will end ...



 This cycle of human life will continue.  Only the mathematical life of that math on that cycle has to be understood at that time.  Only then will human life be full of happiness, contentment and challenge.  So don't be afraid of any crisis.  Crisis will go away .... Don't be afraid of crisis Crisis can be overcome.  This is the law of nature ... we have to walk according to the seasons.

 The footsteps of happiness will be with you. You have to take the base of the tree with you, like the shape of a changed tree like Phule Leveli.


               ©️®️✍️Savita Takaram Lote

©️®️✍️Savita Tukaramji Lote
 Title: - ***** Diary case one
 1. Pleasant Pangal Life ****

 Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and like it.



 



 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...