savitalote2021@bolgger.com
शनिवार, १८ डिसेंबर, २०२१
आठवमोगरा
** माई एक वादळच.....सिंधुताई सपकाळ..!!!!
हरवलेल्या पावलांना चालायला शिकविले. अंधारात प्रेमाचा दिवा लावला. दुःखाने कोसळून जाणाऱ्या अनाथ मुलांना मायेचा आधार दिला. पायाखालील काट्यांना त्यांनी काटे न समजता एक नवीन पायवाट निर्माण केली. त्या हरला नाही त्यांच्याच भाषेत सांगायचे तर,"हरले असते तर सरले असते." अशा आपल्या माई म्हणजे सिंधुताई सपकाळ...!!!
आपल्या कार्याचा ठसा जनमाणसात उमटविणाऱ्या सिंधुताई म्हणजेच माई. त्यांचे नाव आदराने घेतले जाते. एक प्रेरणादायी उदाहरण.... एक अलौकिक ऊर्जाशक्ति....त्या ऊर्जेने," चिंधी पासून चालू झालेला प्रवास सिंधुताई पर्यंतचा प्रवास खूप खडतर दुःखाने भरलेला होता." आणि "सिंधूताई पासून ते माई पर्यंतचा प्रवास हा त्याहीपेक्षा खडतर होता."
सिंधुताई सपकाळ म्हणजे असे एक वादळ!! अनाथांना आपल्या पदराखाली घेतले. पोरके झालेल्या लेकरांची आस बनला. प्रेमाला पोरके झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने आपलेसे करून घेतले. समाजातील वंचित उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी सतत त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या अशा या वादळाची प्रेरणादायी कार्य आपल्या आयुष्याला नवीन कलाटणी देऊन जाते.
सार्वजनिक व्यासपीठावर त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे. सिंधुताई सपकाळ एक विद्यापीठ आहे.... दुःखातून स्वतःला कसे सावरण्याचे हे सांगणारे..!!!
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर इ.स.1947 मध्ये महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. वर्धा जिल्ह्यातील नवरगाव हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वळायचे काम करायचे. आई-वडिलांना मुलगा हवा होता पण मुलगी झाल्यामुळे तिचे नाव "चिंधी ",ठेवले गेले. आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली. गाव लहान असल्यामुळे गावात सुविधांचा अभाव होता. घरची गुरे राखायला रोज सकाळी बाहेर पाठवायचे आणि त्या शाळेत जाऊन बसायच्या. सिंधुताई हुशार होता पण त्यांचे शिक्षण जमतेम झाले. बालपणीच त्यांचा पदरी संघर्ष चालू झाला.आईकडून सतत अवहेलना पदरी आला. नकोशी असल्याचे दुःख झेलत आयुष्याचा प्रवास केला.
सिंधुताई यांचा प्रवास चिंधी पासून ते सिंधुताई सपकाळ हा खडतर आणि संघर्षाने भरलेला आहे. पावलोपावली त्यांना फक्त संघर्ष मिळाला. परिस्थितीने घाव घातला तसेच नियतीनेही घाव घातला.
शिक्षणाची भारी आवड असतानाही त्यांच्या वाटेला जेमतेम चौथीपर्यंतचे शिक्षण आले तेही त्यांच्या वडिलांनीमुळे..!! वयाच्या अकराव्या वर्षी तीस वर्षाच्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला. बालपण हरवले... सोबत इच्छा आशा-आकांक्षा स्वप्ने तेही हरवली. आईकडून सतत दुसवास आणि अवहेलना झेलत मोठी झालेली चिंधी आता सासरी आल्यावर त्या संघर्षाला सामोरे जावे लागले.
त्यांचा पहिला संघर्ष म्हणजे गावातील उचलणाऱ्या स्त्रिया गावातील जनावराचे शेण उचलण्याचा मोबदला मिळण्याकरता त्यांनी बंड पुकारला आणि गावातील स्त्रियांना न्याय सुद्धा मिळून दिला. जमीनदाराच्या अहंकार दुखावला गेला. आपला अपमानाचा सूड घेण्यासाठी गावात नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या सिंधुताई त्यांच्या पोटातील बाळ त्याचे असल्याचे त्याने गावभर सांगितले.... नवऱ्याला सांगितले.
नवऱ्याचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांना मारझोड करून अर्धमेल्या अवस्थेत गुरांच्या गोठ्यात टाकून दिले. गुरांच्या लाथा बसून मरेल पण त्याही अवस्थेत त्यांनी एका मुलीला जन्म दिला आणि स्वतः स्वतःची नाळ कापली. सिंधुताई या घटनेला शब्दबद्ध करताना म्हणतात ,"मला आज देखील आठवते मी त्यावेळेवर दगडाने सोळा वार केले तेव्हा ती नाळ कापल्या गेली होती".
खरंच शब्दही "निशब्द," होतात. डोळ्यातले अश्रु गालावर येतात... फक्त!! स्त्री म्हणून आलेले मातृत्व जगातील सर्वात मोठे दान असते आणि तेच दान त्यांना इतक्या मोठ्या प्रसंगातून जावे लागले. त्यांच्यामध्ये निर्भीडपणा होता. आत्मविश्वास होता.... आहे. त्या परिस्थितीत जगण्याचे गणित त्या मांडत होत्या. त्या जगला आणि त्या मुलीला ही जगवले पण नवऱ्याने घरातून हाकलून दिले. त्यानंतर गावकऱ्यांनी ही त्यांना गावातून हाकलून दिले. आईने घरात घेतले नाही. अशा अवस्थेत सिंधूताई सर्वीकडे भटकत होत्या.
अशा अवस्थेत त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी त्यांचा संघर्ष चालूच ठेवला. सिंधुताईंनी परभणी नांदेड मनमाड रेल्वे स्टेशन वर भीक मागत फिरायचा त्यावर जीवन जगत होत्या.
एकामागून एक दिवस जात होते. दुःख संपत नव्हते. येणार्या प्रत्येक वाट हे फक्त दुःख घेऊन येत होते आणि ते दुःख कुठेतरी संपवावे म्हणून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पण ,"लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल म्हणून मागे फिरल्या", पुन्हा तीच वाट रेल्वे स्टेशन वर भिक मागायचे आजूबाजूच्या मुलांना गोळा करून मिळेल ते वाटून खायचे. असे दिवस काढत होता. आपला भोवती सुरक्षाकवच त्यांनी अशाप्रकारे तयार केले. कधी कधी त्यांना भिक मिळत नसे. उपाशीतापाशी दिवस काढावे लागत असे. अशातच त्यांनी स्मशानभुमीचा आधार घेतला.
सिंधुताई म्हणतात," पोटाच्या भुकेला कोणतीही जागा अपवित्र नाही. त्यावेळी फक्त पोट भरणे एवढाच एक पर्याय आपल्यासमोर असतो. जो मला मिळाला तो मी घेतला. जगली ...जगवल स्वतःला आणि या प्रकारचे आयुष्य कुणाच्याही वाटेवर येऊ नये म्हणून अनाथांची माई झाली."
कारण ते दुःख मी खूप जवळून पाहिले होते...ते अनुभवले होते आणि त्या दुःखाची परिसीमा कुठे समजते हे कळायच्या आतच दुसऱ्या दुःखाची पायवाट चालू होते.
सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्याचा संपूर्ण प्रवास हा संघर्षात घालविला. अनाथ मुलांना सांभाळून त्यांनी त्यांच्या जीवनाला दिशा दिली. 1994 मध्ये पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात," ममता बाल सदन संस्था", ही संस्था सुरू झाली. स्वतःच्या पोटच्या मुलीला त्यांनी दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी ठेवले आणि त्या अनाथांच्या माई झाला. त्यांना आधार दिला... शिक्षण दिले...जेवण कपडे आणि अन्य सुविधा त्या संस्थेमार्फत त्यांना दिल्या देत आहे. त्यांना स्वावलंबी बनवण्याचे सर्व काम संस्थेमार्फत केले जातात.
योग्य प्रकारे मार्गदर्शन दिले जाते. मुला मुलींचे विवाह केले जातात. संस्था जितके होईल तितके काम अनाथ मुलांसाठी करते. त्यांच्या कामाला कुठेही मर्यादा नाही व कुठेही मोठेपणा नाही. ही आपली जबाबदारी आहे... हे आपले कर्तव्य आहे... असे संस्थेला वाटत नाही तर ते सर्व माझे मुल आहे असे माई म्हणतात.
सिंधुताई म्हणतात देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस." सिंधुताई त्यांचा प्रवास हा फक्त येथे थांबलेला नाही. त्यांनी आदिवासींच्या हक्कासाठी लढा दिला. आदिवासींच्या मागण्यांसाठी इंदिरा गांधी पर्यंत त्यांनी त्यांचे प्रश्न पोचविले मांडले.
सिंधुताई जनसामान्यांच्या जगात डोळस चेहरा बनलेला.... आपलेपणाचा चेहरा बनला.... विश्वासू व्यक्तीमत्व बनले... प्रामाणिक व्यक्तिमत्व बनले. हळूहळू लोक त्यांना 'माई' म्हणून ओळखू लागले आणि स्वतःहून पुढे येऊन त्यांच्याकडे असलेले अनाथ मुले मायेच्या पदरात देऊ लागले.
त्यांचे कार्य जनसामान्यांच्या मनामध्ये घर करीत अनाथांची आई अनाथांची माई अनाथांच्या डोक्यावर मायेची छप्पर देणारी व्यक्ती म्हणजे माई. अनाथाश्रमातील मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलीला ममता दुसऱ्या संस्थेत ठेवले आणि ती ही फार समजूतदार होती. तीसुद्धा आईच्या या कार्याला सतत प्रोत्साहन दिले. पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्या एकटीची आई होण्यापेक्षा अनाथांची माई झालेली मला आवडेल. तिने प्रत्येक निर्णयामध्ये आईला सोबत केली.
एकदा पुण्यात रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला त्याला त्यांचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते सिंधुताईंनी दीपकच्या घरचा पत्ता मिळविण्यासाठी खूप प्रयत्न केला पोलीस घातले त्याचा काही फायदा झाला नाही म्हणून सिंधुताईंनी दीपकला आपल्याजवळ ठेवले.
दीपक पासून चालू झालेला प्रवास हा आज हजारांच्या घरात आला.सिंधुताई आई झाल्या नाही तर माई झाल्या." दुःख पर्यंत येते ती आई, वेदना पदरात घेते ती माई."
सिंधुताई यांच्याकडे उत्तम वक्तृत्व कला आहे. त्यांचे शब्द साधे सरळ आहे. पण काळजाला भिडणारे आहे. यांचे भजन आणि भाषणे फार प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांच्या भाषणाचे कौतुक केले जाते.
कवितांची आवड असलेल्या सिंधूताई सपकाळ म्हणतात ,“लकीर की फकीर हुं मै, उसका कोई गम नही, नही धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नही!”
सिंधुताई सपकाळ यांना 750 पेक्षा अधिक पुरस्काराने सन्मानित झाल्या आहे आणि अजूनही त्यांच्या कार्यावर पुरस्कारांचा वर्षाव होतच आहे.सिंधुताईंच्या प्रवास चिंधी पासून ते माई पर्यंतच निर्माता-दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी “मी सिंधुताई सपकाळ” नावाचा चित्रपट तयार केला आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. 54 व्या लंडन फिल्म फेस्टिवल मध्ये देखील हा चित्रपट दाखवण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त त्यांचे आत्मचरित्र ‘मी वनवासी’आणि डॉक्युमेंट्री फिल्म ‘अनाथांची यशोदा’देखील तयार करण्यात आलेली आहे.
सिंधुताई म्हणतात," दुःखाने कोसळून जावू नका. आनंदाने जगायला शिका. आपले पाय इतके मजबूत करा की ते कोणत्याही दुःखात कोलमडून जाणार नाही. दुसऱ्याच्या भुकेपर्यंत पोहोचा. रिकामा पोटायासारखे दुसरे दुःख या जगात नाही. अंधारात प्रेमाचा दिवा लावा... मूठभर दुःख वाटून घ्या."
**सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही
स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे**
1.बाल निकेतन हडपसर, पुणे
2.सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
3.अभिमान बाल भवन, वर्धा
4.गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
5.ममता बाल सदन, सासवड
6.सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
त्या या संस्थेमार्फत आपले कार्य करीत आहे.
सिंधुताईंना सपकाळ यांना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील काही पुरस्कार खालीलप्रमाणे...
1.पद्मश्री पुरस्कार (२०२१)
2.महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
3.पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
4.महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
5.मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
6.आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
7.सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
8.राजाई पुरस्कार
9.शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
10.श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)
11.सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२)
12.२००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
13.प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
14.डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
15.पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार'
16.पद्मश्री पुरस्कार (२०२१)
17.प्रसारमाध्यमांतील चित्रणसंपादन करा
18.सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळहा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
19.सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.
सिंधुताई सपकाळ म्हणजे एक वादळ ते वादळ परिस्थितीसमोर हतबल होत नाही. स्वतःचा आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत तुटू देत नाही. प्रत्येक परिस्थितीत मार्ग काढता येते फक्त दुःखाला कवटाळून न बसता त्याच्याशी लढण्याची हिम्मत एकजूट करा. आनंदाने जगायला शिका आणि तो आनंद वाटून घ्यायला शिका.
दुःख वाटून घ्यायला शिका अंधारात स्वतःला हरवून जाऊ देऊ नका. अशा आपल्या माई जगण्यासाठी त्यांनी चितेवर भाकरी भाजली. स्मशानात ती खाऊन जगल्या आणि आपल्या आजूबाजूला असलेला अनाथ मुलांना मायेचा पदर दिला. घर दिले... आधार दिले... स्वतःचे नाव दिले... त्यांचे हे कार्य समोर जाण्यासाठी लोकांसमोर पदर पसरवला आणि त्यातून त्यांनी त्यांचे कार्य आज पर्यंत चालू ठेवले.
सिंधुताई सपकाळ एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे. जीवन जगण्याची कला आहे. अनुभव सर्वकाही शिकवितो त्या अनुभवातून शिकत गेला. आजूबाजूच्या लोकांना शिकवत गेल्या आणि त्यांनी त्यांचे कार्य चालू ठेवले. मायेचा गारवा दिल्या... माई आज अनेक मुले मुली आहेत. जवाई सुना आहे. ते शिकून मोठमोठ्या पदावर आपले कार्य करीत आहे आणि माईंच्या कार्यात हातभार लावीत आहे. त्यांचे कार्य अखंड चालू राहावे म्हणून ते सतत झटत असतात.
माई 80 वर्षाच्या झाल्या तरी त्यांचे कार्य अखंड आहे. राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत प्रवास शब्दात पूर्णपणे मांडता येत नाही. कारण त्यावेळेस जी परिस्थिती असेल त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला त्यातून त्यांनी त्यांची वाटचाल केली. हा खडतर प्रवास कोणत्याही शब्दात मांडता येत नाही... तरी हा थोडाफार प्रयत्न केलेला आहे.
आपल्या आयुष्याबद्दल सांगताना सिंधुताई सपकाळ म्हणजेच आपल्या माई म्हणतात," फुले होती पण गंध घेत आला नाही, पाऊस होता पण भिजता आले नाही, चांदणे होते पण न्हता आले नाही." त्यांनी त्यांचे आयुष्य किती साध्या सरळ भाषेमध्ये वर्णन केले आहे.
माझ्या शब्दात सिंधुताई सपकाळ त्यांच्या प्रवासाचे वर्णन करताना काही शब्द सुचले....
**माई एक वादळच**
कुठेही फेकून द्यावी ती म्हणजे चिंधी.... हृदयात साठवून ठेवावी ती म्हणजे सिंधू ..!!
स्मशानातल्या चितेला चूल केली....
शोषित समाज वर्गातील प्रश्नांना धारदार... शब्दांची जोड दिली...!!
अनाथांना मायेचा पदर दिला...
अंधार फार झाला चोहीकडे तिथे प्रकाशाची ज्योत दिली....
जखमा फार सोसल्या तरी बदलविले नाही आपले व्रत जखमा पायदळी तुडवून
माई झाली ...!!!
✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे
माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)
*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने अश्रूचे सोने झाले देहाचे मंदिर झाले सुकलेल्या शरीर...
-
थेंब विद्रोहाचा (काव्यसंग्रह) " संपला आहे माझ्यातला" Drops of Rebellion (Anthology) "I'm done" थेंब...
-
उजेडातील प्रकाश (काव्यसंग्रह) "एक विचारधारा समानतेची" Light in the Light (Anthology) "An Ideology of Equality"...
-
दीक्षा (काव्यसंग्रह) "एक आरंभ नव युगाचा" Deeksha " A beginning of the New Age" काव्यसंग्रह शीर्षक :- द...