savitalote2021@bolgger.com

#प्रधानमंत्री पीक विमा योजना # मराठी लेख मराठी कविता # Pradhan Mantri Crop Insurance Scheme लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
#प्रधानमंत्री पीक विमा योजना # मराठी लेख मराठी कविता # Pradhan Mantri Crop Insurance Scheme लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १५ मार्च, २०२३

** प्रधानमंत्री पीक विमा योजना ***** Pradhan Mantri Crop Insurance Scheme ***

(( विविध योजनेच्या माहितीसाठी ब्लॉगला नक्की भेट द्या.))
(( Be sure to visit the blog for various scheme information ))
=============================

*** प्रधानमंत्री पीक विमा योजना ***

** Pradhan Mantri Crop Insurance Scheme ***

        भारत हा कृषिप्रधान देश आहे. हे आपण अभिमानाने सांगतो. कारण आपल्या भारतात 70 ते 80 टक्के जनता शेतीवर आपल्या उदरनिर्वाह करतात.
        सततच्या नैसर्गिक संकटामुळे आता शेती करणे कठीण झालेले आहे. नैसर्गिक लहरी मुळे शेतकरी आता शेतीचे नुकसान सहन करू शकत नाही.
        शेतकऱ्यांवर चारही बाजूने संकटांना आणि संघर्षांना समस्यांना समोर जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची अपरिमित हानी होते. अशा संकटातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना घेऊन आलेले आहेत.
       भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना घेऊन येतात. जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल आणि परत आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानी तितक्याच ताकतीने शेती करावी.
        भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री पिक विमा योजना या योजनेची माहिती या लेखात जाणून घेऊ या...!!

      प्रधानमंत्री पिक विमा योजना भारत सरकारने लागू केले. या योजनेमागील संकल्पना म्हणजे ,"एक देश एक योजना," ही होय.

        23 जानेवारी 2016 रोजी या योजनेची सुरुवात झाली. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरीप हंगामासाठी 2% तर रब्बी हंगामासाठी 1.2% प्रीमियम भरावे लागते.
       नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. त्यांना एक सुरक्षा कवच म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आली.
       सर्वप्रथम केंद्र शासनाने देशातील पहिली पिक विमा योजना सुरू केली.इ स 1985 मध्ये राजीव गांधी यांनी पण 1999 मध्ये एनडीए सरकारने ,"राष्ट्रीय कृषी विमा योजना" लागू केली.
        ही योजना नैसर्गिक आपत्ती पासून संरक्षणासाठी विमा काढण्यात येत असे.
        2004 नंतर काँग्रेस सरकारने हीच योजना काही बदल करून ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू ठेवले.

     " प्रधानमंत्री पिक विमा योजना देशभरातील शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणारी असेल." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
        त्यांनी पंतप्रधान पिक विमा योजना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकी ध्ये या नवीन पीक विमा योजनेला मंजुरी देण्यात आली.


** प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे उद्दिष्टे**

( Objectives of Pradhan Mantri Pik Bima Yojana )


1. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे.
2. शेतकऱ्यांचे मनोबल उंचावणे.
3. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे.
4. नवीन आधुनिक संशोधन पद्धतीचा प्रयोगात्मक शेती करणे.
5. उत्पादनात वाढ व्हावी म्हणून नवनवीन प्रायोगिक तत्त्वावरील शेती करणे.
6. कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे. शेतकऱ्यांना कीड रोगराई यापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी.
7. कृषी क्षेत्रात कर्जाची उपलब्धता निश्चित करणे.
8. प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ही योजना मदत करते.
अशी विविध उद्दिष्टे ठेवून ही योजना लागू करण्यात आली आहे.

** Objectives of Pradhan Mantri Pik Bima Yojana **
 (Objectives of Pradhan Mantri Pik Bima Yojana)


 1. To provide financial assistance to farmers during natural calamities.
 2. Raising the morale of farmers.
 3. To encourage farmers.
 4. Experimental cultivation of new modern research methods.
 5. Adoption of innovative farming practices to increase production.
 6. Use of agricultural technology.  Farmers to protect their crops from insect pests.
 7. To determine availability of credit in agriculture sector.
 8. This scheme helps to reach every farmer.
 This scheme has been implemented with such various objectives in mind.
(

**Features of Pradhan Mantri Pik Bima Yojana**
 (Features of Pradhan Mantri Pik Bima Yojana)

 1. This scheme is a voluntary scheme for farmers.
 2. Both borrower and non-borrower farmers can participate in this scheme.
 3. This scheme provides financial assistance to farmers in natural calamities.
 4. This scheme provides insurance cover to farmers.
 55. Less amount of insurance beneficial for farmers More than 90% burden is paid by the government.
 6. Every season is the same.  Therefore, there is a commonality throughout Maharashtra.
 7. Get full insurance coverage and claim amount is paid in full.
 8. 70 percent share has been fixed in case of crisis for all crops in Kharip.

 This scheme provides financial assistance to the farmers as the percentage of premium can be paid at home by all especially this scheme instills self-reliance in the farmers with confidence.



** प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे वैशिष्ट्ये **

(Features of Pradhan Mantri Pik Bima Yojana)

1. ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना आहे.
2. कर्जदार आणि बिगर कर्जदार दोन्ही शेतकरी या योजनेस सहभागी होऊ शकतात.
3. ही योजना नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते.
4. ही योजना शेतकऱ्यांना विमा संरक्षण देते.
5. विम्याची रक्कम कमी असणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर 90% पेक्षा जास्त भार शासनाकडून भरला जातो.
6. हंगाम दर एकच असतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक वाक्यता असते.
7. पूर्ण विमा संरक्षण मिळेल आणि दावा केलेली रक्कम पूर्णपणे मिळते.
8. खरिपातील सर्व पिकांसाठी संकट प्रसंगी 70 टक्के भागीदारी निश्चित करण्यात आलेली आहे.

     या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते प्रीमियरची टक्केवारी घरी असल्यामुळे ती सर्वांनाच भरता येते विशेष म्हणजे ही योजना शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वासाने आत्मनिर्भरता निर्माण करते.

** प्रधानमंत्री पिक विमा योजनेचे स्वरूप **

( Nature of Pradhan Mantri Pik Bima Yojana )

       आतापर्यंतच्या ही विमा योजनेमध्ये ही योजना सर्वात कमी हप्त्याची योजना आहे. या योजनेत दोन ते अडीच टक्के प्रीमियम भरावे लागते. या योजनत सहभागी होण्यासाठी मोबाईल फोनचा हे वापर केला जातो.
         नवीन तंत्रज्ञानाचा वापर योजनेत केला जात आहे. तसेच नुकसान पाहण्यासाठी ड्रोन मोबाईल मॅपिंग या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जलद गतीने मिळते आणि आर्थिक सहाय्यता सुद्धा मिळते. 


Nature of Pradhan Mantri Pik Bima Yojana **
( Nature of Pradhan Mantri Pik Bima Yojana )

     ((  This plan is the lowest premium plan in this insurance plan so far.  Two to two and a half percent premium has to be paid in this scheme.  A mobile phone is used to participate in this scheme.
 New technology is being used in the scheme.  Also, drone mobile mapping technology is used to see the damage.  Therefore, farmers get compensation at a faster speed and also get financial assistance.))

**  योजनेचे लाभार्थी कोण होऊ शकतात **
       (Who can be beneficiaries of the scheme )

    या योजनेअंतर्गत कोणताही भारतीय शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
       जे शेतकरी अन्नधान्य पिके वार्षिक फलोत्पादन इत्यादी पिके घेतात ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
      (Any Indian farmer can avail this scheme under this scheme.
 Farmers who grow crops like food grains, annual horticulture etc. can avail this scheme.)


** प्रीमियर किती भरावा लागेल **

(How much is the premium to be paid)

       अधिकृत संकेतस्थळावर त्यासाठी फॉर्म भरावा लागेल. त्यानंतर प्रीमियर किती भरावा हे कळेल.

(You have to fill the form on the official website.  Then you will know how much premium to pay.)



** प्रीमियर ची रक्कम कशी तपासायची*
(How to Check Premier Amount)

      यासाठी ,"pmfby.gov.in ",या वेबसाईटवर जावे लागेल.
   वेबसाईट ओपन केल्यानंतर योग्य पद्धतीने सर्व तपशील भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. त्यानंतरच प्रिमियर ची रक्कम तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

**How to Check Premier Amount**

( pmfby for this.  Govt.  in will have to go to this website.
        After opening the website, the form should be submitted after filling all the details in the correct manner.  Only after that you will see the Premier amount on the screen.) 


      **नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर आली असल्यास  या मदतीसाठी कोण दावा करू शकतात. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.**

1 सतत त्या पावसामुळे पीक खराब झाल्यास तो शेतकरी मदतीसाठी दावा करू शकतो पण पावसात खंड पडल्यास पिकाची कमी नुकसान झाल्यास आणि योग्य पद्धतीने वाढीस लागल्यास आणि उत्पादन आले पण कमी आले या नुकसान भरपाईसाठी पिक विमा भरपाई मिळत नाही.

2. शेतमालावर संसर्गजन्य किड्यांचा प्रादुर्भाव झाल्यास या विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यास पिक विमा योजनेचा लाभ घेता येत नाही.

3. पिक विमा भरण्याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारीख. नुकसान भरपाईसाठी नैसर्गिक आपत्तीच्या तारखेपासून किती दिवस आपत्तीजन्य परिस्थिती होती. यावरून ही नुकसान भरपाई दिली जाते अन्यथा दिली जात नाही. त्यानंतर जर तुम्ही दावा केलास ते भरपाई दिली जात नाही म्हणून मोबाईलद्वारे या इतर वेबसाईटवरून तुमच्या नुकसानीचा दावा लवकरात लवकर करावा लागतो.

4.  नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत मदत मिळते .त्यासाठी टोल फ्री क्रमांक किंवा वेबसाईटवर अधिकृत संकेतस्थळावर नुकसानीची माहिती नोंदविता येते.

5. विमा कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरणे अतिशय महत्त्वाचे असते.यावरूनच तुमच्या नुकसान भरपाईचा मोबदला ठरवला जातो. 

6. कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन फॉर्म भरावे.

7. बँकेतून विमाची रक्कम भरल्यास त्या बँकेत माहिती देणे महत्वाचे आहे.

8. एकदा शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची माहिती कंपनीकडे नोंदविली की प्रक्रिया सुरू होते. ही पाहणी झाल्यानंतर नुकसान भरपाई निश्चित केली जाते.

9. नैसर्गिक आपत्तीनंतर दहा दिवसाच्या तुम्हाला अर्ज करावा लागतो. पीक कापणी नंतर 14 दिवसानंतर जर नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतमालाचे नुकसान झाले. तर तुम्हाला या योजनेचा लाभ होऊ शकतो. याची माहिती विशेष वेब पोर्टल वर दिली जाते.

(Who can claim for this help if a natural calamity befell the farmer.  There are a few things to keep in mind.)

1. If the crop is damaged due to continuous rains, the farmer can claim for help but if the rains fail, crop insurance does not cover the damage if the crop is less damaged and grows properly and the crop is produced but less.

 2. Crop insurance scheme cannot be availed in case of infestation of infectious insects in case of these various diseases.

 3. The most important thing to pay for crop insurance is the date.  How many days the catastrophic situation existed from the date of natural calamity for compensation.  This compensation is otherwise not paid.  After that if you claim it is not compensated so you have to claim your loss as soon as possible through this other website via mobile.

 4. In case of damage, help is available within 72 hours. For this, the damage information can be reported on the official website on the toll free number or website.

 5. It is very important to go to the office of the insurance company and fill the form.


6. Go to Agriculture Officer office and fill the form.

 7. If the insurance amount is paid through a bank, it is important to inform that bank.

 8. Once the farmers report their loss to the company, the process begins.  After this inspection the compensation is fixed.

9.  You have to apply within 10 days after the natural calamity.  14 days after crop harvest if the crop is damaged in a natural calamity.  So you can benefit from this plan.  This information is provided on a special web portal.


    प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वासाने मनोबल उंचावणारी आहे. 



✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

******************************************************************************

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...