माझे गुरु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री विषयक विचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानव विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार राजकारणी, तत्वज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, बहुजनाचे उद्धारकरता, भारताचे भाग्यविधाता, समानतेचा पुरस्कार करणारे होते. त्यांनी देशाच्या विविध क्षेत्रात आपले योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माता असे संबोधले जाते. "शिक्षण जितके पुरुषांसाठी आवश्यकता आहे. तितकेच महत्त्वाचे स्त्रियांना सुद्धा आहे ''. हेे बाबासाहेबांचे विचार आज समाजामध्येेे तंतोतंत जुळत आहे. डॉ. बाबासाहेब म्हणतात,"ज्या समाजात स्त्रिया पुढे तो समाज ज्या देशात महिलांची प्रगती होते तोच देश प्रगतिशील असू शकतो."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते. डॉ. बाबासाहेब यांच्या कार्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांचा अतिशय महत्त्वाचा प्रभाव होता. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा ध्यास घेऊन समाजातील अंधाऱ्या वाटेवर असणाऱ्या स्त्रियांना उजेडात आणले. त्यांना अक्षर ओळख देऊन प्रगतीचा पहिले किरण त्यांनी दाखविले. ती आत्मनिर्भर राहावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्त्रीला कायदेशीर हक्क मिळवून दिले.
त्यांच्या मते बुद्ध हेच स्त्री स्वातंत्र्याची आद्य पुरस्कार होते तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे कार्य स्त्रियांसाठी केले ते अलौकिक आहे. समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून ठरविता येते. समाजाने स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आग्रही भूमिका घेतली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून तिथे मुलींना सुद्धा प्रवेश दिला.
डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाजाची प्रगती ही फक्त पुरुषप्रधान संस्कृतीवर आधारित नसून त्या समाजातील स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असते. समाजाचे मूल्यमापन केवळ पुरुष प्रगतीवर अवलंबून असते. स्त्रियांची देखील होणे गरजेचे असते. याचे भान ठेवणे आवश्यक आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी,"स्त्री एक स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे आणि तिला स्वातंत्र्य मिळाला हवे".
सर्व क्षेत्रात म्हणून त्यांनी स्त्री वर्गांसाठी भरपूर सुविधा केल्या. जसे मजुरांनी कष्टेकरी स्त्रियांसाठी 21 दिवसाची किरकोळ रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई, कोळसा खाण कामगार स्त्रियांना प्रसूती भत्ता व रजा मिळावा यासाठी आग्रही भूमिका असणारे पहिले व्यक्ती म्हणजे बाबासाहेब होते. कामगार पुरुष कामगारांना जितकं वेतन दिल जात तितकेच वेतन स्त्रियांना सुद्धा मिळावे, वीस वर्षाची सेवा संपल्यानंतर सेवानिवृत्ती वेतन यासारखे महत्त्वाचे निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांसाठी दिले.
भारतीय जातीव्यवस्था आणि भारतीय पुरुष प्रधान संस्कृतीला आळा बसावा यासाठी सतत बाबासाहेबांच्या विचारांमध्ये स्त्री ही अग्रेसर राहिलेली आहे. कारण स्त्री आणि शूद्र यांच्या वर सतत अन्याय होत राहिला आहे. हे दोन्ही घटक शोषित आहे. त्यांना स्वातंत्र्य मिळायला हवे, म्हणून जठर विवाह पद्धती, केशवपन पद्धती, बालविवाह पद्धती, सती पद्धती अशा विविध समाजमान्य पद्धती कायद्याने नष्ट व्हाव्या अशी आगरी भूमिका बाबासाहेबांची होती.
स्त्री पिढ्याने- पिढ्या शिक्षणापासून वंचित राहिली. आर्थिक स्वावलंबन संपत्तीवरील समान मालकी हक्क निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रगतीच्या वाटा बंद असलेल्या स्त्रियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 मध्ये कायदामंत्री असताना हिंदू संहिता विधेयक अर्थात हिंदू कोड बिल प्रस्ताव लोकसभेत सादर केला.
अस्पृश्यतेचे उच्चाटन स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार, स्त्री - पुरुष समानता, वारसा हक्क स्त्रियांना देण्याची तरतूद होती. त्यांच्या मध्ये सामाजिक न्यायाचा लढा यशस्वी होण्यासाठी हिंदू समाजाच्या वैयक्तिक कायद्यामध्ये जातिव्यवस्था आणि पुरुषप्रधानता यांना नकार देऊन समान वैयक्तिक संबंधाची पायाभरणी करणे आवश्यक आहे.
हिंदू कोड बिल बाबासाहेबांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. डॉ. बाबासाहेब म्हणतात ,"हिंदू कोड बिल हा देशातील विधिमंडळाद्वारे घेतलेला सर्वात मोठा सामाजिक सुधारण्याचा निर्णय आहे. असा कायदा जो याआधी झाला नाही आणि नजीकच्या भविष्यकाळात देखील. येणाऱ्या कुठल्याही कायद्याची त्याची तुलना होणे शक्य नाही. वर्ग वर्गात असलेली विषमता आणि वर्ग अंतर्गत सुद्धा स्त्री पुरुष असा असणारा लिंगभेद हाच हिंदू समाजाचा आत्मा राहिलेला आहे. हा भेद ही विषमता मिटविल्याशिवाय आर्थिक सुधारणेबाबत कायदे करणे म्हणजे शेणाच्या ढिगार्यावर भारतीय संविधानाचा अवाढव्य महाल बांधण्याचा खोटा दिखावा करण्याइतका दांभिक प्रकार आहे."
डॉ. बाबासाहेब म्हणतात," समाज व्यवस्था ही एका विशिष्ट समाजापुरते निगडित नसून ती संपूर्ण समाजातील घटकांवर अवलंबून असते. त्यांच्या प्रगतीवर अवलंबून असते. स्त्री हा त्या समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. म्हणून जातीय अन्याय आणि स्त्रियांवर होणारे अन्याय हे दोन्ही एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. स्त्री ही आपल्या कुटुंबाचे योग्य पद्धतीने नियोजन करू शकते तसेच स्त्री समाजातही त्या ज्ञानाचा उपयोग करून आपले योगदान देऊ शकते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना मतदानाचा अधिकार दिला. कारण भारतीय स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार द्यावा हा त्याकाळी वादग्रस्त मुद्दा होता. कारण एका विशिष्ट समाज व्यवस्थेमध्ये समाज रचना असल्यामुळे समाजातील काही वर्ग प्रगती आणि विकासापासून वेगळी होते आणि हीच गोष्ट त्याकाळी असलेल्या समाज व्यवस्थेला अभिमानाची वाटत असावी. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा हक्क सहज समाजातील प्रत्येक व्यक्तीला मिळावा म्हणून मतदानाचा अधिकार दिला. भारतीय संविधानाने आर्टिकल 326 नुसार वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. तो स्वातंत्र्यपूर्वे आपल्याला नव्हता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनामध्ये स्त्रियांच्या प्रगतीला विकासाला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील स्त्रियांची प्रगती किती झाली आहे; हे मी मोजतो.''
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 1927 चा महाड चवदारतळ सत्याग्रह, 1930 चा नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह आणि 1942 च्या नागपुरातल्या महिला परिषदेत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बाबासाहेब म्हणतात ,''मुलींच्या प्रगतीमध्ये लग्न हे अडचणीचे कारण होऊ नये म्हणून मुलांसारखेच मुलींच्याही मताला महत्त्व द्यावे. जेणेकरून लग्नानंतर स्त्रियांना समान अधिकार मिळेल. त्यांच्या आवडीनिवडी त्यांना जपता येईल. पुरुषप्रधान संस्कृतीला कुठेतरी त्या कारणाने आळा बसेल आणि नवीन पिढी नवीन संस्कृतीमध्ये स्वतःला नवीन पद्धतीने समाजापुढे मांडेल.''
आजची स्त्री सुशिक्षित आहे. शिक्षित आहे. स्वतंत्र विचारसरणीची आहे. स्वावलंबी आहे. त्यांचे संपूर्ण श्रेय सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना जाते तसेच आजची स्त्री स्वतःच्या हक्कासाठी जागरूक आहे तिला तिचे अधिकार माहित आहे. तिला तिचे हक्क माहित आहे. तिला तिच्या जबाबदाऱ्या माहित आहे म्हणून तिला कुठल्याही क्षेत्रात आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा आणि योग्य न्याय मागण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेशीर रित्या दिला. डॉ. आंबेडकरांनी स्त्री पुरुष समानतेला स्थान दिले. हिंदू कोड बिल हे सर्वोत्तम उदाहरण आहे. स्त्रीमुक्तीचा ध्यास हा डॉ आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये दिसतो तसेच त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये स्त्री पुरुष समानतेला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे.
ती सक्षम आणि साक्षर बनविण्याचे सर्वोत्तम कार्य बाबासाहेबांनी स्त्रियांना दिले. आज स्त्री स्वातंत्र्य विचारसरणीची आहे. ती समाजातील कुठल्याही परिस्थितीला समोर जाण्याची ताकद तिच्यामध्ये निर्माण केलेली आहे हे सर्व फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या कायदेशीर रित्या संरक्षणामुळे होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व चळवळी समाजातील महिलांच्या नेतृत्वाचा पाय भक्कम करण्यासाठीच होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1924 - 25 पासून सर्व आंदोलनांमध्ये स्त्रियांना समाविष्ट करून घेतले. यामुळे बाबासाहेबांना कट्टर समाजाकडून विरोध होत होता. महिलांचे प्रश्न, दलित महिलांचे प्रश्न, समाजातील सर्व स्त्रियांचे प्रश्न, दलितांचे अधिकार आणि हक्क, दलित व स्त्रियांना मंदिर प्रवेश यासारखा प्रश्नांवर बाबासाहेबांनी समाजाचे लक्ष वळविले. पण कधीही या प्रश्नांसाठी सनातनी लोकांनी मदत केलेली नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 जुलै 1942 रोजी नागपूर येथे आयोजित, ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वुमन्स कॉन्फरन्स मध्ये 25 हजार स्त्रियांना उद्देशून केलेला भाषणात म्हणतात," स्त्रीची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून समाजाची प्रगती मी मोजीत असतो. म्हणून मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे .कारण त्या सभेला प्रचंड महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला होता
आजही समाजातील काही त्याच विचारसरणीचे लोक मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश महिलांना नाकारतात. हे भारतीय समाजाचे सत्य आहे. कारण बाबासाहेबांनी कायदेशीर रित्या कितीही स्वातंत्र्य स्त्रियांना दिली असले तरी,जोपर्यंत सामाजिक स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही तोपर्यंत कायद्याची कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.हे भारतीय समाज व्यवस्थेने सिद्ध केलेले आहे. ही एक शोकांतिकाच आहे.
कारण आजही कायद्यासमोर विशिष्ट विचारसरणीला इतके महत्त्व का दिले जाते. हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्नच आहे.
स्त्रीला जातिव्यवस्था रूढी, प्रथा, परंपर, संस्कृती या मध्ये अडकविले आणि आजही अडकू पाहत आहे. स्त्री कुटुंबवत्सल आहे. पण आज ती स्त्री पुरुषप्रधान संस्कृतीच्या वेदना सोडून आज उच्च पदावर कार्यरत आहे. आज स्त्री पुरुष समानतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे. जगाच्या इतिहासात स्त्रियांचे योगदान अमूल्य आहे.
आधुनिक स्त्रीची वाटचाल सकारात्मक आणि आशादायक आहे. बाबासाहेबांनी लावलेले या रोपट्याला आता फुले- फळे येत आहे. स्त्रीचे योगदान हे कुणीही कानाडोळा करू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी आधुनिक समाजाचे जे चित्र रेखाटले होते ते चित्र आपल्या चारही बाजूने दिसत आहे. आज स्त्री शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा, संरक्षण इत्यादी क्षेत्रात सक्षम झालेली आहे. सक्षमीकरणाचा नारा काय असतो हे दाखवून दिले आहे. हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या मिळाले आहे.
बाबासाहेबांनी बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असे न करता त्यांनी स्वतःही रमाबाईंना या चळवळीत येण्यास प्रोत्साहन दिले. रमाबाईंनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या कार्यामध्ये योगदान दिले. बाबासाहेब हे केवळ बोलते समाज सुधारक नव्हते तर ते करून दाखविणारे समाज सुधारक होते. आज स्त्री फक्त पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी पुरुषप्रधान संस्कृतीचे प्रतीक न राहता स्वातंत्र्य यशस्वी स्त्री झालेली आहे. याचे सर्व श्रेय बाबासाहेबांना द्यावे लागेल.
कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो .पण आधुनिक भारताच्या स्त्रियांच्या मागे त्यांच्या प्रगती मागे त्यांच्या आजच्या यशोगाथा मागे फक्त एकाच महापुरुषाचा हात आहे तो म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होय.
बाबासाहेबांनी ज्या सुविधा सामाजिक स्तरावर स्त्रियांना मिळाव्या असे वाटत होते त्या सर्व सुविधा त्यांनी कायदेशीर रित्या भारतीय संविधानात दिला. आज स्त्री काही प्रमाणात असुरक्षित वाटत असली तरी बाबासाहेबांनी दिलेले कायदेशीर हक्क जर तंतोतंत लागू झाले तर समाजामध्ये असलेली विषमता आणि असुरक्षित भावना कमी होईल.
स्त्री समाजामध्ये सुरक्षित राहील. कारण स्त्री सुरक्षित राहिली तर समाज सुरक्षित राहील आणि समाज सुरक्षित राहील तर प्रगतीच्या नवनवीन वाटा सर्वांसाठी खुल्या होते. आपण महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनच बाबासाहेब म्हणतात, शोषितांच्या वेदनांची जाणीव होऊ द्या स्वातंत्र्य, समता, बंधुता ,सामाजिक न्याय या मूल्यांचा उपयोग करा. यावरच आजच्या समाजाची प्रगती आहे आणि उद्याचे भविष्य आहे."
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांच्या हक्काप्रती असलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे.
भारतीय स्त्रियांना हक्क मिळवून देण्यात सर्वात मोठे योगदान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. आज समाजातील सर्व क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत आहे. ज्या स्त्रीला फक्त गुलामासारखे आणि उपभोग वस्तू म्हणून वापरले जात होते. ती स्त्री समाजात अर्थ, धर्म ,राज्य, सुरक्षा इत्यादी क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहे. हे सर्व बाबासाहेबांनी त्यांना संविधानात्मक दर्जा प्राप्त करून दिला. त्यांच्या हक्कासाठी म्हणून पूर्णत्वास येत आहे. समाजात मान सन्मान मिळत आहे. स्त्री म्हणजे पायाची दासी नसून विविध क्षेत्रात पुरुषांबरोबर आपलं योगदान देत आहे.
चूल आणि मूल ही संकल्पनेला आळा देत घराचा उंबरठा ओलांडून जगभरात आपले कर्तव्य गाजवीत आहे आणि हे सर्व फक्त बाबासाहेबांमुळे स्त्रियांच्या वाटेला आलेले आहे. स्त्रियांना मिळालेली आहे जर बाबासाहेब नसते तर कदाचित हा प्रश्नच अंगाला काटे आणणार आहे. कारण स्त्री कुठे सुरक्षित असती.
महिलांना पुरुष समान अधिकार मिळाली नसते तर?
स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला नसता तर ?हिंदू कोड बिल मध्ये सुविधा मिळाल्या नसत्या तर???
तिला घटस्फोटाचा अधिकार मिळाला नसता तर?
स्वातंत्र्य विचारसरणीचे अधिकार मिळाले नसते तर?
रूढी प्रथा परंपरा मान्यच करा असे कायदेशीर गुलामगिरी लादली असती तर?
अशी कितीतरी प्रश्न स्त्रियांसमोर असते. पण आज हे प्रश्न स्त्रिया समोर नाही याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाते. महिलांना नैसर्गिक मानवी हक्क बाबासाहेबांनी मिळून दिले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण समाज व्यवस्थेला जी गुलाम बंदिस्त परंपरा रूढी प्रथा परंपरा ब्राह्मण संस्कृतीने तेही स्वार्थी यात बंदिस्त होती ती स्वातंत्र्य करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये केले
भारतीय विषमतेच्या प्रश्नाला जसे वर्णव्यवस्था जातिव्यवस्था अवलंबून होते तेच सर्व स्त्रियांसाठी सुद्धा होते. अशा स्त्रियांना मुक्त करण्याचे काम बाबासाहेबांनी केले त्यांच्या या कार्याला शब्दात मांडावे इतके शब्दही माझ्याकडे नाही कारण एक स्त्री म्हणून मी आज आशावादी आहे एक स्त्री म्हणून प्रगतीच्या प्रत्येक वाटेवर एक एक पावले चालत आहे. सुरक्षितता हा माझा कायदेशीर अधिकार आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले नैसर्गिक रित्या मी स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले. मी एक स्त्री इतिहासाच्या पुस्तकात गुलाम होती वर्णव्यवस्था जातिव्यवस्थेत बंदिस्त होती आज मी स्वातंत्र आहे हे मला बाबासाहेबांमुळे कळले.
मी मुक्त विचारसरणीने मी आपले मत मांडू शकते हे मला बाबासाहेबांमुळे कळले आणि स्त्री मुक्त सुद्धा आहे हे सुद्धा बाबासाहेबांमुळे कळले. बाबासाहेबांनी लावलेले हे रोपटे आज गोड फळांनी बहरलेले आहे आणि ते फळ खाण्यासाठी मला संघर्ष करावा लागतो यातच कुठेतरी समाजव्यवस्था अजूनही वर्णव्यवस्थेतले जात आहे का? हा प्रश्न महिलांना पडत आहे.
अजूनही आम्ही गुलामच होऊ का? हाही प्रश्न कधी कधी मनात येऊन जातो पण या प्रश्नाचे सर्व उत्तरे नकारात्मक असतात. कारण बाबासाहेबांनी जे कार्य संपूर्ण समाज व्यवस्थेसाठी करून ठेवले ते कोणीही नष्ट करू शकत नाही किंवा त्यांचे योगदान कमी लेखू शकत नाही. बाबासाहेब म्हणजे एक स्वातंत्र्य विद्यापीठ आहे. विचारांचे समानतेचे प्रतिष्ठेचे शिक्षणाचे राजकारणाचे अर्थकारणाचे शैक्षणिक करण्याचे आणि जातीय व्यवस्थेचे सुद्धा म्हणून बाबासाहेब माझे गुरु आहे.
कारण मला जे अधिकार मिळाले एक स्त्री म्हणून ते सर्व फक्त फक्त बाबासाहेबांमुळे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाचे दुःख समजून घेतले नाही तर महिलांचे सुद्धा दुःख त्यांनी समजून घेतले आणि स्त्री नैसर्गिक दृष्ट्या स्वातंत्र्य व्यक्तिमत्व आहे हे जगापुढे पहिल्यांदा मांडले आणि त्यांच्यासाठी संविधानात्मकरीत्या खूप काही देऊन गेले लिहून गेले आणि समाजात ठेवून गेले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेले चळवळ जगाच्या इतिहासात मानवी मुक्तीचा लढा ठरला आहे. भारतीय समाज व्यवस्थेला मुळापासून नष्ट करण्याचे काम बाबासाहेबांच्या चळवळीमुळे झाले.
शिक्षणाचे अखंड ज्योत बाबासाहेबांनी पेटवली. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. आपल्या हक्कासाठी संघर्ष करा कारण समाजात सर्व एकच आहे इथे कोणीही मोठा किंवा कोणीही लहान नाही. समता बंधुत्वा न्याय स्वातंत्र्य संपूर्ण समाजाला दिली. ...........राज्यघटनेचा खरा शिल्पकार महामानव माझे गुरु माझे मार्गदर्शक मला स्त्री म्हणून जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून देणारे स्वातंत्र्य व्यक्तिमत्व स्त्रियांना मानवी हक्क देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा मानाचा मुजरा.
नव्हती आम्हा जगण्याची मुभा नव्हती आम्हा चालण्याची मुभा नव्हती आम्हा शिक्षणाची मुभा बाबासाहेबांमुळे आज सर्वोच्च पदावर जाण्याची मुभा सुरक्षितता प्रदान करण्याची मुभा सुरक्षा देण्याची मुभा शिक्षण घेण्याची मुभा आणि स्वातंत्र्य उपभोगण्याची मुभा...!!!
✍️©️®️सविता सूर्यकांत तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤