savitalote2021@bolgger.com

मराठी लेख मराठी कविताMarathi article English article सकारात्मक लेखआयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख मराठी कविताMarathi article English article सकारात्मक लेखआयुष्य कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

Search for an Existence Coal ** **शोध एक अस्तित्वाचा निखारा **

     ** शोध एक अस्तित्वाचा निखारा **


          कधी कधी सूर्याच्या वास्तविक प्रकाशात सत्य करपून जाते आणि चालू होते एक नवीन युद्ध. अस्तित्वाचे ज्यावेळी किड्या मुंग्यांसारखे विचार मेंदूत चालू होतात तेव्हा बरबटली जाते आपले विचार.
        चिखलात तेव्हा चालू होतो शोध नवीन अस्तित्वाचा. अस्तित्व पाण्यातल्या साखरेसारखे. अस्तित्व पाण्यातल्या मिठासारखे. अस्तित्व पाण्याचे बर्फ झालेल्या रूपाचे. अस्तित्व चिखलाचे रूपांतर विशिष्ट एका आकृतीमध्ये तयार होते.

        बरबटले जातात त्यावेळी अस्तित्वाचे गणित. तेजस्वी सूर्यासारखे अस्तित्व सुखाच्या उंबरठ्यावरचे. अस्तित्व दुःखाच्या उंबरठ्यावरची कदाचित दोन्ही सारखेच असावे. कदाचित दोन्हीही वेगवेगळे असावे.

          म्हणतात, आपण बघू तसे जग दिसेल पण माझे म्हणणे असे आहे की, अनुभवावरून आपण जगाकडे बघत असतो. पण तसे नसावेच कदाचित. येणाऱ्या परिस्थितीनुसार आपण त्या गोष्टीकडे बघत असतो.

        अस्तित्व कदाचित हेच असावे. करपून गेलेला प्रकाश आणि लख्ख प्रकाश यामध्ये जसा फरक करू शकत नाही तसेच अनुभव आणि परिस्थिती यातील फरक करू शकत नाही. कारण अस्तित्व हे प्रत्येकांच्या आपल्या जन्म संस्कार आणि आपल्या संस्काराने जन्म घेत असतात.

        अस्तित्वाचे वास्तविक रूप हे आपण समजावे इतके सोपे नसावे. प्रकाशमय होईल या आशेने...! आपण आपण आपले जीवन जगत असतो. अस्तित्व संपुष्टात येणार नाही याकडे प्रकर्षाने लक्ष देत असतो. तरीही कधी कधी धुक्याच्या पलीकडे प्रकाशाची चाहूल घेताना वास्तविक जगातले प्रकाश दृष्टीआड होऊन जाते आणि तेव्हाच अस्तित्वाचा शोध घ्यावा लागतो.

        हा शोध धुक्यात अडकलेल्या प्रकाशासारखा नसतो. अंधारे वाटेवर चालणाऱ्या रस्त्यासारखा नसतो. उंबरठा संपलेल्या त्या चौकटी सारखा नसतो की रातकिड्यांच्या आवाजा सारखा नसतो. तर, "अस्तित्वाचा शोध स्वतःचा शोध असतो".

        उद्धटपणा आणि स्पष्ट वक्ता यामध्ये जी एक दरी आहे तीच कदाचित अस्तित्वाची लढाई असते. अस्तित्वाचा शोध असेल पाण्यातल्या साखरेचे अस्तित्व ते पिल्यानंतरच कळते. पाण्यातल्या मिठाचे अस्तित्व ते जिभेवर आल्यानंतरच कळते. तसेच दुःखाचे अस्तित्वही दुःख आल्यावरच कळते आणि सुखाचे अस्तित्वही सुख आल्यावरच कळते.

        अस्तित्व शून्य असावे कारण शून्याच्या आधी आणि नंतर कोणताही आकडा लावा त्या शून्याला किंमत येते तसेच आयुष्याला अस्तित्वाचा शब्द लावला की आयुष्याला अर्थ येतो.

        प्रकाश करपलेला असतो की प्रकाश प्रकाशमय असो ,"स्वयं दीप भव" या शब्दाचा अर्थ कळतो. 

       अस्तित्वाच्या शोधा तो उंबरठा आहे तिथे अस्तित्व मिळते आणि तेच मिळालेले अस्तित्व आयुष्याचे गणित असते. आठवणी हरवले जातात पण अस्तित्व कधीही हरवत नाही. कारण त्याचा शोध आपण सतत घेत असतो.

         कधी कळत कधी नकळत. कारण अस्तित्वा शिवाय आयुष्य नाही आणि आयुष्य शिवाय अस्तित्वाची गणित पूर्ण होऊ शकत नाही.

        उंबरठा अस्तित्वाचा शोध....अस्तित्वाचे सुखाचे स्वरूप.... अस्तित्व शब्दांचा पूर्णविराम ..... आणि शब्दांच्या गोळा बेरजेमध्ये चाललेली आयुष्याची पायवाट म्हणजे अस्तित्व...!!

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



*********✍️✍️✍️✍️✍️✍️✍️**********


**Search for an Existence Coal **

Sometimes the truth fades into the real light of the sun and a new war begins.  When the thoughts of existence like insects and ants start running in the brain, our thoughts are destroyed.


In the mud, the search for a new existence begins.  Existence is like sugar in water.  Existence is like salt in water.  Existence in the frozen form of water.  Existential clay is transformed into a particular figure.

 The mathematics of existence at that time are shattered.  Existence like the bright sun on the brink of bliss.  

Existence on the brink of suffering may be the same for both.  Maybe both are different.

 It is said that the world will appear as we see it, but what I am saying is that we look at the world through experience.  But maybe not.  We look at it according to the situation.

 This is probably what existence is all about.  He cannot distinguish between experience and circumstance, just as he cannot distinguish between passing light and bright light.  

Because beings are born with our own birth rites and our rites.


The real form of existence may not be as simple as we think.  Hoping to be enlightened...!  We live our lives.

  Being keenly aware that existence will not cease.  Yet sometimes the light in the real world fades away from the fog, and that's when we have to search for existence.

 This discovery is not like a light caught in a fog.  Darkness is not like a road.  The threshold is not the same as the finished frame or the sound of nightingales.  So, "the discovery of existence is the discovery of self".
 The gulf between brashness and outspokenness is perhaps a battle for survival.  

 Discovery of Existence The existence of sugar in water is known only after drinking it.  The presence of salt in water is known only after it reaches the tongue.  Similarly the existence of sorrow is known only after suffering and the existence of happiness is known only after happiness.

 Existence should be zero because put any number before and after zero that zero has value and life has meaning if you put the word existence to life.
 
The meaning of the word "Swayam Deep Bhava" is understood whether the light is dim or bright.

 The search for existence is the threshold where existence is found and that existence is the mathematics of life.  Memories are lost but existence is never lost.  Because we are constantly looking for it.

 Sometimes knowing and sometimes not knowing.  Because without existence there is no life and without life the math of existence cannot be completed.

 Threshold Existence Search....Existence's Nature of Happiness....Existence is the full stop of words.....and the path of life in the sum total of words is Existence...!!

 Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...