savitalote2021@bolgger.com

मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२

माझीच वात ***

      ही कविता स्त्री विश्वातील स्त्रियांची आहे.ती नेहमीच दुसऱ्याला प्रकाश देत राहते पण एक वेळ अशी येते तिला तिचे अस्तित्व नष्ट होत आहे असे जाणवते. तेव्हा ती एक पाऊल मागे जावे असा विचार करते पण ती स्त्री असते तिला त्याच प्रकाशाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
           त्या भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!


****माझीच वात ***

वातीचा प्रकाश अधिकच होत होता 
तेव्हा तिला वाटले मागे सरावे 
एक पाऊल... 
पण क्षणात तिच्याही लक्षात आले 
एक एक पाऊल मागे जाणे 
म्हणजे आयुष्य नष्ट करणे 
तेव्हा तिनेच निर्णय घेतला 
तेलाच्या मैत्रीपेक्षा 
आपलेच अस्तित्व महत्त्वाचे 
म्हणूनच तिने त्याच प्रकाशाबरोबर 
मैत्री केली 
अधिक प्रकाशमय होत 
जळतच प्रकाश देत
आपल्याच अवतीभवती 
अंधार ठेवून 
हसतच...!💕

✍️®️©️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया म्हणजे आपल्या येण्याची जाणीव होय. कमेंट बॉक्समध्ये आपल मत जरूर नोंदवा.धन्यवाद...!!!



This poem is about women in the world of women. She always gives light to others but there comes a time when she feels that her existence is disappearing.  So she thinks to take a step back but being a woman she has to decide to go with the same light.
 This poem is composed from that spirit.  The poem is self-written and composed.  If you like, don't forget to like and share...!



 ****my opinion***

 The light of the wick was getting brighter
 Then she thought to practice backwards
 one step...
 But in a moment she also noticed
 Take a step back
 It means destroying life
 Then she made the decision
 than the friendship of oil
 Our own existence is important
 That's why she with the same light
 made friends
 becoming more luminous
 Giving light while burning
 Around us
 Keeping it dark
 Just smiling...!💕

 ✍️®️©️Savita Suryakanta Tukaram Lote

 Don't forget to like and share if you like.  Your reaction is your sense of arrival.  Be sure to write your opinion in the comment box. Thank you...!!!


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
🌹🌹🌹🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁...!!!!!!

........व्यथाफार.......

        स्त्री विश्वातील अजूनही एक कविता. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

....व्यथाफार ...

जगण्याच्या व्यथा फार 
तरी हसण्याचा 
बहाणा शोधत 
असतेच स्त्री 

स्त्रीच्या जगण्यात 
बहाण फार दुःखाचे 
तरी सुखाचा 
नाट्यमय प्रवास 
हसूनच दाखवितो 
अश्रू लपवीत 

स्त्रियांच्या जगण्यात 
अपेक्षा नसतातच मुळे 
असते थोडा सन्मान 
थोडा आत्मविश्वास 
मिळावा 

यासाठी शेवटच्या पानापर्यंत 
आयुष्याच्या जीर्ण होत राहते 
संपूर्ण आयुष्याच्या 
शेवटच्या पूर्णविराम होत 

स्त्री जगण्याच्या व्यथा न सांगता  
कितीही फाटलेले असले 
तरी फाटू देत नाही 
ती जगण्याच्या या प्रवासात

स्त्री जगण्याच्या व्यथा फार...!!

✍️®️©️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
       आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया होय. कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की नोंदवा. धन्यवाद..!



Still a poem in the feminine universe.  The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.

 ....wasteful...

 A lot of pain to live
 Still laughing
 Looking for excuses
 There is a woman

 In the woman's life
 The excuse is very sad
 Happy though
 A dramatic journey
 Shows with a smile
 Hiding the tears

 In women's lives
 Because there are no expectations
 Have some respect
 A little confidence
 to get

 For this till the last page
 Life continues to deteriorate
 of whole life
 The last full stop occurs

 Not to mention the pain of a woman's life
 No matter how torn
 However, it does not tear
 In this journey of living

 The pains of a woman's life are many...!!

 ✍️®️©️Savita Suryakanta Tukaram Lote
 Your awareness of coming is your response.  Be sure to register your opinion in the comment box.  Thank you..!


=============================

अजूनतरी...!

        आज एका विशिष्ट विचारसरणीला इतका महत्त्व दिले जात आहे की ती विचारसरणी समाजमान्य होईल का अशी भीती राहून राहून मनात येते. तेव्हा एक सशक्त विचार माझ्यासमोर येते तो म्हणजे ,"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" आणि तेव्हाच आत्मविश्वास निर्माण होते.
     अजूनतरी आम्ही विसरलो नाही आमच्यावरील झालेला अन्याय त्याच विचारसरणीमुळे. याच भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. काही चुका झाल्या असल्यास नक्की कळवा.


....अजूनतरी....

समानतेच्या वाऱ्यामध्ये 
चालू झाले नवीन 
चाटूकारिता.... 
अंधश्रद्धा जातीभेद अविश्वास 
भ्रष्टाचाराचे नवीन अन्यायाचे 
नवीन फार्मूले नवीन वायरससारखी 

नवीन समाजव्यवस्थेच्या नावाखाली 
चिरडली जात आहे माणुसकी 
शोषण आणि असमानतेच्या 
वृक्षाला देऊ पाहत आहे 
नवीन व्याख्या जगण्याची 
नवीन घोषणा नवीन नारे 

पण विसरलो नाही अजूनही 
मडक आणि खराटा 
गाव कुशाबाहेरील जिवंत पण 
मरणयातना शूद्रत्वाचे 

विसरलो नाही अजूनतरी 
बाबासाहेब, बाबासाहेबांचे संविधान  बाबासाहेबांची शिकवण....
समानतेच्या वाऱ्यामध्ये चालू आहे 
नवीन चाटूकरिता..!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया होय माझ्या ब्लॉगला नक्की भेट द्या..!





              Today, a certain ideology is being given so much importance that there is a constant fear that whether that ideology will be accepted by the society.  Then a strong thought comes to my mind that is "Dr. Babasaheb Ambedkar" and only then confidence arises.
        Still we have not forgotten the injustice done to us by the same ideology.  This poem is composed from this spirit.  If you like the poem, don't forget to like and share.  The poem is self-written and composed.  Please let me know if there are any mistakes.


 ....even more....

 In the wind of equality
 Started new
 flattery...
 Superstition Casteism Mistrust
 Corruption is the new injustice
 New formulas are like new viruses

 In the name of new social order
 Humanity is being crushed
 of exploitation and inequality
 Trying to give to the tree
 A new definition of living
 New Slogans New Slogans

 But still not forgotten
 Madak and Kharata
 Alive outside the village Kush
 Shudratva in death

 I haven't forgotten yet
 Babasaheb, Babasaheb's constitution Babasaheb's teaching....
 Running in the same wind
 For new licks..!!


✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 If you like the poem, don't forget to like and share.




माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...