savitalote2021@bolgger.com

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

"क्षितिजापलीकडे मनातलं" ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह



          विविध भावना आणि विषयांना समर्पित ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह "क्षितिजापलीकडे मनातलं"  मराठी चारोळी होय.
    
         चारोळी( चार +ओळी ) इंग्रजीत owls म्हणजे चार ओळीची कविता होय. चारोळी अगदी मोजक्या शब्दात भावना अर्थपूर्ण पद्धतीने सांगून जातात. 

        आयुष्यातील सुंदर क्षण चार ओळीत मांडण्याचा मनाला स्पर्श करणारी सुंदर अर्थपूर्ण रचना म्हणजेच चारोळी होय ....क्षितिजापलीकडे मनातलं"  मराठी चारोळी संग्रह विविध भावनेला समर्पित चारोळी लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी चारोळी मोजक्याच शब्दात परंतु मनातील संवेदना ओळींमधून मांडण्याची ही एक पद्धत म्हणून अशा काही खास मराठी चारोळी तुमच्यासाठी आणले आहे.

        हा मराठी चारोळी संग्रह तुमच्यासाठी आणलेला आहे. आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरु नका ...प्रतिसाद द्यायला विसरू नका..!!



            नव स्वप्नाच्या गावाला जाताना नवनवीन वळणे येतात तसेच हे एक वळण माझ्या आयुष्यातले. "क्षितिजापलीकडे मनातलं", हा माझा पहिलाच ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद द्या ही आशा बाळगतो माझ्या सर्व वाचक मित्रांसाठी घेऊन येत आहे;प्रत्येकांच्या मनातील ,"क्षितिजापलीकडे मनातलं"  ऑनलाईन मराठी चारोळी संग्रहामध्ये भावना रेखाटण्याचे थोडाफार प्रयत्न माझ्याकडून केला गेला आहे.




     1


तुझ्या माझ्या नात्यात हे
सत्य हातात आहे नव्याने 
त्या रंगात रंगायचे आहे 
माळायचा आहे प्रीतीचा गजरा


                       2
जगासाठी गोड राहायचे 
असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी 
होय म्हणा नाही म्हणताच 
सगळे जग वाईट म्हणतात

                    

                  3

कोणत्याही वाटेवर चालताना 
चालाविच लागते ...
पायाखाली काय आहे त्यापेक्षा 
त्यातून सुखरूप निघणे महत्वाचे




                        4

रोज  झुरते मी 
त्याच वाटेवर 
हरवलेल्या क्षणांसोबत 
नव्याने उगाच






                   5



एकाच आकृतीमध्ये राहण्यापेक्षा 
त्यापासून  दूर राहा... 
थकलो तरी चालेल 
येईल पायवाट विश्वासाचे


                  6

                     
टिका करणे सोपे असते 
कदाचित खुप सोपे असते 
स्वतःला सिद्धकरणे तितकेच 
कठीण सदैव जीवनात

                     7


परिस्थितीवर मात करता येत नाही 
म्हणूनच संयम ठेवा हेच 
एकच औषध आहे 
जीवन धारेतील सत्याला 

                8
तुला सांगतो स्पर्धा माझी 
तुझ्याशी तु ही ये असाच 
माझ्या कवेत असा मी आलो 
तुझ्या कवेत तुला भेटण्यासाठी

                  
                       9
                     
                   
वेदनाही तू सुखही तू 
शब्दांची शब्द प्रतिमा ही तू 
पेटलेले विचार ही तू 
प्रेमाची ज्योतही प्रकाशाची तू !!!



                       
                 10
धुक्यातून वाट काढत चालावे 
चालतो आयुष्याचे गणित सोडवितांना 
घेऊन जाते सहज आपल्यातील 
माणसाला आपलाच माणसाजवळ
                11


वेळेनुसार चला वा वेळेला 
बदला आपल्यानुसार वेळ 
आपली असेल प्रत्येक वेळ 
क्षणाक्षणाला जीवनातील !!!

                      12

नकारात्मकतेला खतपाणी घालू नको 
वाईट गोष्टी विचारात घालू नका 
सुरुवात आत्ताच करा नवविचारांची 
नवे झाड लावा मेंदू सकारात्मकतेचे



                 13



वलय शून्यातून निर्माण होते 
तरंगणारे पाण्यात गोलाकार 
आयुष्यही असेच माझ्या तुझ्या 
नात्यातील वर्तुळासारखी फिरत



                    14

एक एक पायरी चढावी 
ध्येय गाठण्यासाठी हीच एक लढाई 
आपल्यातील माणुसकी जागे 
ठेवण्याची !!



                     15


रंग नभातील मी आहे 
अजून सोबतीला माझ्यातील जिद्दीने
उगवतीच्या नभातील रंगासोबत 
परत भेटण्यासाठी

              16



पंख नसले तरी 
झेप माझी आकाशी 
तोल सांभाळत सुखदुःखाच्या 
दगडावरील साक्षी तू माझा 



                   17

पाखरू होऊन आकाशात 
उडा पाखरू होऊन 
जग येईल कवेत
बळ देईल उडण्यासाठी पंखात !!




18

मागे वळून पाहताना वाटतं 
खूप समोर आले
मात्र मन त्याच हिंदोळ्यावर 
झुलते तिथेच वळून बघताना




19
संयम हवा आपल्याला आपल्यापर्यंत 
आणण्याचा वेळ बदलत आहे सुखाच्या 
राशीवर चालण्यासाठी फक्त प्रयत्न 
सयंम शांतता ठेवा मनात !!!



20



जिंकण्यासाठी ओळखावे लागतात चित्रविचित्र चेह-यामागील सत्य अनावशक 
कुठल्याही वेळी कुठल्याही घटना प्रसंगात जिंकतो आपण त्या क्षणाला जीवनात

माझ पहिल 
.....प्रेम 
शेवटच 
प्रेम.....

21

22

ऊन पावसाच्या खेळत खेळला 
अवेळी आलेला पावसाने मनसोक्त 
भिजून नेले बेभान 
वाटसरू करून गुंतलेला घरट्यामध्ये




23

इथे थांबणार नाही विचार मंथन 
अनुत्तरीत किंचाळताही येत नाही फितूर झालेल्या क्षणांना एक वेगळीच लाट


24

माझे दोन 
मित्र ... 
पुस्तक .....
....ग्रीन टी


25



नजर झेप माझी आकाशी 
कवेत माझे स्वप्नात तंगणार
गरुड झेप स्वप्नांच्या वाटेवर
जिंकण्याच्या सहआनंदात
🌹🌹🌷🌷🏆



26



पानांच्या देखाव्यात 
पाखरांचे घर आणि 
फक्त पानांचा  
आभास.... विसावायला 



27

सोडविला गुंता मावळतीचा 
रंगाच्या उगवत्या सूर्याचा 
रंगाबरोबर....
गुंता सुटलेल्या नात्यांच्या

28

वसंत फुलला की फुले फुलतात 
फुले फुलले की वसंत फुलतो 
हृदय फुलले की गालावरील कळी फुलते 
टवटवीत फुलांच्या रूपा संगे



29

चुकीच्या गोष्टीचे समर्थन 
करता करता चिखल कधी होतो 
माहित नाही आनंदाचा शांततेचा 
आणि समाधानाचा टाकाऊ शब्दांनी !!



30
हृदयातील Life line चालूच 
          असते तिथे....प्रेमाचा झरा 
          वाहू द्या! अखंड.
  

31

समोरचा कितीही
शक्तिशाली असो
लहानपण आपलेसे करतात 
त्या शक्तीला !!!





32



हृदयाची चाबी 
कुणाजवळही देऊ नये 
ती आपल्या स्वाभिमानाची 
गुरुकिल्ली असते !!

जिथे आशा संपते 
त्या क्षणापासून चालू होतो 
सकारात्मकतेचा प्रवास परत 
हृदयापासून !!!



34।    आवरलेले मन कधीही चांगले 
          कारण ते बेभान घेऊन जाते 
          इतरांचेही आणि स्वतःचीही 
          सुख शांती...!!

35 


सांभाळणारे हदय 
रक्ताळलेले स्वप्न एकटेच 
असतात... न समजलेल्या 
भावना रुपी व्यक्तीला !!



36.

जुन्या संस्काराचे पायेमुळे 
खोल असतात 
ते दिसायला कुरूप होते 
स्वार्थी माणसांना... 
असे असले तरी 
संस्कार असतात 
ते ...
खानदानीपणाचे !!!

37
शोधता शोधता कधी हरवून गेलो 
कळलच नाही प्रेमाला रम्य पहाट 
मावळतीचा क्षण कधी झाला 
कळलेच नाही हरवलेल्या प्रेमाने

38

जगण्याच्या सप्तसुरांच्या सुरांना तुझ्याच गालातल्या गालात हसूनची 
सवय झालेले मनाला मनातल्या मनात 
सुरेल हसण्यासाठी....!!!



39

उंच माझा झोका 
स्वप्नांच्या प्रत्येक वाटेवर 
उंच माझा 
झोका

40

पावसाची सर अलगद 
सृष्टीला ओलेचिंब करीत 
नवनिर्मितीची झाली सुरुवात 
ढगांना थेंब जड झाले...!!!
      42

स्मृतीच्या पानांमधून योगायोगाने लपवलेली पाने जगण्याच्या प्रवासात अलगद मार्गावर  पानगळीसारखे आले आणि रिकामे झाले  स्मृतीचे पाने नयन अश्रुने ....!!




    नाते आपुले जन्मोजन्मीचे रेशीमगाठी 
   नव स्वप्नांचे क्षितिजापलीकडे मनातलं   भावबंध शब्दांची मन शब्दांचे मनातलं क्षितिजापलीकडे..!!


               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  क्षितिजापलीकडे मनातलं ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
 
 

चारोळी

शोधता शोधता कधी हरवून गेलो 
कळलच नाही प्रेमाला रम्य पहाट 
मावळतीचा क्षण कधी झाला 
कळलेच नाही हरवलेल्या प्रेमाने

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- चारोळी 

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!!

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...