savitalote2021@bolgger.com

love poem life of art kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
love poem life of art kavita लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०२३

संध्याकाळची सावळबाधा

           एक प्रेयसी प्रियकरायला भेटून आल्यानंतर स्तब्ध होते. कोणत्यातरी कारणामुळे त्यांच्यामध्ये थोडासा दुरावा आलेला असतो. का तर, वेळच्या या सांज वेळेला ती एकटीच विचार मग्न झालेली असते. तिच्या मनातला या संवेदनेमधून, भावविश्वातून ही कविता.
           संध्याकाळची सावळबाधा कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित व स्वरचित आहे.


*** संध्याकाळची सावळबाधा ***

कदाचित उगाच नाही येत शांतता 
सुखाचा रंग सांज संध्याकाळच्या 
रंगाशी एकरूप झाले आणि उगाच 
गंध फुलांचा सुगंधहीन झाला 

सगळे कसे गोड नात्यांमध्ये संथ 
हळुवार स्तब्ध विस्तीर्ण पण जखमा 
मात्र खोल पानगळीनंतर पालवी न येणारी 
स्वर हृदयाला भिडणारे गर्दीतही आवेग 
शांत ठेवणारे 

उगाच विचित्र हिशोबात 
स्वतःला गुरफडणारी संध्याकाळच्या 
अंधार अंधारलेले स्पष्टीकरण शून्य ठरतात 
शुभ्र चांदण्यांचा प्रकाश हिरव्यागार रंगाला 
  
सांजवेळीची बाधा मनाला जगून 
उजेडाचे दान देणारी सावळबाधा 
जखमेवर दाटते माया मनात जपवणूक 
संपून पांगरले जाते अथांग सावळबाधा 

काळाकुट्ट मध्यरात्रीच्या सावळ्या रंगांसारखे 
कदाचित शांतता स्तब्ध करते 
मशालीला संथपणे 
कदाचित उगाचच थरथर राहते 
जखम दाटलेल्या श्वासांसोबत 
सांजवेळच्या संध्याकाळच्या सावरबाधेत......!! 

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤



         A girlfriend is stunned after meeting her boyfriend.  Due to some reason there is a slight rift between them.  Why, at this evening time, she is alone in thought.  This poem is from this feeling in her mind, from the world of emotions. 
        Don't forget to like and share if you like evening sawalbadha poem.  The poem is self-written and composed.



*** dusk of evening ***

 Maybe peace is not coming soon
 The color of happiness in the evening
 Matched with the color and so on
 The smell of the flowers became unscented

 How slow everyone is in sweet relationships
 Gentle numb wide but bruised
 However, after deep leaf fall, the leaves do not come
 The heart-pounding voice is an impulse even in the crowd
 Calming

 A very strange calculation
 A self-enveloping evening
 Darkness Darkness is void of explanation
 The light of the white moon turns green

 By living the hindrance of the evening
 Savalbadha, the donor of light
 Chanting in the mind of Maya thickens on the wound
 The bottomless barrage ends

 Kalakutta is like the shades of midnight
 Perhaps the silence is stifling
 Light the torch slowly
 Maybe just shivering
 With gasping breaths
 In the twilight of the evening...

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lotte

 The blog is my home of words.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
 If you like it don't forget to follow comments and share...!💕❤


==========================================================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...