savitalote2021@bolgger.com

बुधवार, १४ एप्रिल, २०२१

मला ही लिहिता येते

मला ही लिहिता येते 
मला ही लिहिता येते र ला र स ला स
पण रस्त्याच्या लगत वसलेली वस्तीस पाहिले की कळते जगण्याची भीषण वास्तव संघर्ष आणि जगण्या अन्नासाठी ची तडफड 

मलाही लिहिता येते म ला म ग ला ग 
पण अंगावरची कपडे पाहिले फॅशन श्रीमंताची,कपडे म्हणायचे की चिंध्या... कपड्याच्या नावाखाली आणि रस्त्यावर फॅशनेबल फाटकी वस्त्रे 

मलाही लिहिता येते ट ला ट फ ला फ
पण इवल्याशा पायात बळ येईल का?शिक्षणाचे!  हसत-हसत जाईल का?
शाळा नावाच्या इमारतीमध्ये 
सावरेल का?आपले अंधारमय उघडे आयुष्य

मलाही लिहिता येते ध ला ध न ला न 
पण काय जगणं हे उघडावरले...गरिबीचे हसू की हसूच गरिबीचे श्रीमंतीचा शहरात लढायचे कुणाबरोबर आटलेल्या डोळ्यातील पाण्याबरोबर??

मलाही लिहिता येते ध ला ध छ ला छ 
पण थोपविता येणार का स्वच्छ भारताच्या नकाशात हरवलेले बालपण जगण्याची
आशा भिरकावून देणाऱ्या झोळीतील
अंधकार...

मलाही लिहिता येते ल ला ल श ला श 
पण त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल का 
भारतीय संविधान,मूलभूत हक्क समानतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विचार
संपेल का विश्वासातील आशावाद जगण्याच्या सरणावरील मरणयातना 
टिपेल का उंच भरारी यशाची 
                         जीवनाच्या लढाईत 
मला ही लिहिता येते स ला स,म ला म आणि बरच काही 
                       सविता तुकाराम लोटे

जाळ

वलय

चिऊ

चिमणी

सावरावे त्याने

             सावरावे त्याने
सावरावे त्याने माझ्या मनाला 
कान डोळे तृप्त करावे प्रेमळ 
शब्दाने...
शहाण्यासारखे वागावे प्रश्न 
न विचारताच, उत्तरच प्रश्न 
असावे ...थंडगार पाण्यासारखे 
तडतड नसावी माझ्या चुकीला 
पावसाविना मातीला सुगंध यावा 
नवनिर्मितीचे... नाद न करता 
हसत भांडण शब्द विसरावे
सकाळी -सकाळी गुलाब द्यावा 
हसऱ्या नयनाने कधीतरीच 
चाकोरीबद्ध दैनंदिन सोडून 
रुसली कि सांगावे माझे 
हसत कायम तू माझी 
               यशमाळेत...
लपाछपीच्या संसार खेळात 
सावरावे त्याने
        सविता तुकाराम लोटे 

ती त्याच्यासाठी

    
 ती त्याच्यासाठी 

वळणावळणावर खुलते ती 
सहज सर्वकाही करते ती 
अशक्य शक्य करते ती 
अवघड ही सोप करते ती 
जीवनाचे गोंधळ सोडविते ती  
आणि मार्गदाता होते ती
इच्छेला सांभाळते ती 
परिस्थितीला बदल ती
गोंधळाला क्षमवते ती 
त्याचा आनंदात आनंदी असते ती
सर्वस्व पणाला लावते 
           ती त्याच्यासाठी

बाबाबासाहेब

बाबासाहेब 
आज नवी पहाट निळ्या रक्ताची 
अथांग सागराला कवेत घेण्याची
आम्ही गुलाम , बादशहा आजचे 
निळे आकाश होते फाटलेलेच 
आता लढाई आहे जिंकलेलीच
वादळ झुकले डोळ्यातील पाणीही सुकलेच 
लढाई जिंकता जिंकताच 
जातीपातीची समाजव्यवस्थाही हरलीच
शिका संघटित व्हा संघर्ष करा या मंत्रानीच 
आज गाथा तुझ्या जीवनप्रवासाची
आभाळाच्या सावलीची अडसर एकट्यानेच 
लढुन आम्हासाठी जिंकलीच 
पाण्यालाही खुले केले वादळाला पायदळीच तुडवून, साधे सोपे नसलेले आयुष्यही तूच 
केले कौतुकास्पद भवितव्याचे 
त्रिशुलाच्या टोकावर लेखणी संविधानाची अंधश्रद्धेच्या उपवासाला खाऊ पंचशीलचे ज्ञानसागरा मार्गदाता अंगणात बोधिवृक्षाच्या अभिमानाच्या.....
स्वाभिमानाच्या कोहिनूर तूच !!!
             सविता तुकाराम लोटे

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...