savitalote2021@bolgger.com

बुधवार, ३१ जुलै, २०२४

#अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (#ARTI )

        आपण या लेखांमध्ये आर्टी( ARTI) म्हणजेच "अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था" ,
( Annabhau Sathe Research and Training Institute",) या NGOs ची माहिती बघणार आहोत.



1.प्रस्तावना आणि स्थापना
  ** Introduction and Establishment **

        "अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था ", या संस्थेची स्थापना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
        या निर्णयामध्ये अनुसूचित जाती प्रवर्ग समावेश असणाऱ्या मातंग समाजाचा सामाजिक ,शैक्षणिक ,आर्थिक ,सांस्कृतिक आणि  राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी 11-7-2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमाती अंतर्गत मातंग तत्सम जातीमध्ये जाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी -मांग,मांग -म्हशी, मदारी, गारुडी, राधे -  मांग, मांग -गारोडी, मांग -गारुडी,मदगी, मदिगा) समाजाच्या विकासाकरिता ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय शासनाचा आहे.
       या संस्थेची स्थापना कंपनी नोंदणी कायदा 2013 अंतर्गत नियम आठ अन्वये करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
       संस्था 2021  - 22 पासून कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी विविध मेळाव घेणे, स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देणे ...असे विविध उपक्रम ती राबवीत आहे.
       संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संस्थेचे मुख्यालय पुणे येथे सुसज्ज व वाचन साहित्य आणि समृद्ध असा ग्रंथालय व अभ्यासितीची निर्मिती करण्यात आली आहे.  2019 पासून विविध महत्त्वपूर्ण विषयावर ग्रंथ साहित्याची समृद्धी असे ग्रंथालय अभ्यासिका स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे.
    संस्था 2019 पासून एकेक पावले आपल्या ध्येय उद्दिष्टांकडे आगे कूच करीत आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेला मान्यता दिली.
( The Institute has been moving forward step by step towards its mission objectives since 2019 and against this backdrop the Government of Maharashtra approved the Annabhau Sathe Research and Training Institute on the lines of Dr. Babasaheb Ambedkar Research and Training Institute.)


2. अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण         संस्थेचे उद्दिष्टे खालील प्रमाणे  :-

 **  Annabhau Sathe Research and Training The objectives of the institute are as follows **

1.समता विचारपीठ चालू करून विकासात्मक कामे करणे.
(Doing developmental work by starting the Samata think tank.)


2. विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक समता  प्रस्थापित करण्यासाठी संशोधन करून सामाजिक समता न्याय बंधुता विकास या तत्व प्रणालीचा समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक होण्यासाठी संशोधन करणे. 

 ( Research to establish social equality in various fields to make the principle system of Social Equality Justice Fraternity Vikas maximum effective in the society. )



3.व्यवसायिक ज्ञान उपलब्ध करून देणे. व्यवसायिक प्रशिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात उद्योगाला चालना देण्याचे काम सकारात्मक पार्श्वभूमी समाजात निर्माण व्हावी यासाठी विविध संशोधन करणे.

( Providing business knowledge.  Conducting various researches to create a positive background in the society for vocational training and promotion of industry in the social sector.)


4.भावी भारतीय तरुण पिढीला उद्योगाकडे वळविण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे. त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक नितीनुसार सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे. यासाठी विविध उपक्रम आयोजित करणे, सामाजिक स्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे. 

( To provide various facilities to attract the future Indian youth to the industry.  To impart training that will enhance their knowledge from the point of view of sociology and social policy as a whole.  For this, organizing various activities, organizing various programs at the social level. )


5. तरुण पिढीला व्याख्यान चर्चासत्र वक्तृत्व स्पर्धा चर्चासत्र परिसंवाद विविध संमेलने सामाजिक जडणघडण यातील बारकावे सांगण्यासाठी विविध मान्यवरांचे मार्गदर्शन इत्यादी कामे संस्थेने हाती घेतले आहे.

( The organization has undertaken activities like lectures, seminars, elocution competitions, seminars, seminars, various meetings, guidance of various dignitaries to teach the nuances of social structure to the young generation. )

6. सर्वांगीण विकासाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार करून संशोधन करणे. प्रशिक्षण देणे. अनुभव विचार यांच्या जोडीला परिवर्तनाची जोड सक्षम असावी यासाठी विविध उपक्रम तयार करून समाज मान्यता देणे.

( To research and plan for holistic development of holistic development.  Training.  Acknowledging the society by creating various activities so that the combination of experience and thought can be capable of transformation. )

 
7.सर्वांगीण विकासासाठी सामाजिक  समता या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात जनसामान्यापर्यंत पोहोचविणे. 

( To bring the program of social equality for overall development to the masses. )


8.संस्थेच्या उद्दिष्टानुसार ग्रंथालय स्थापन करणे. विविध पुस्तके नियतकालिके संशोधनात्मक निबंध प्रस्थापित करणे.

( Establishment of library according to the objectives of the institution.  Establishing various books periodicals research essays. )

9. महाराष्ट्र राज्य सरकारचे विविध प्रयोगात्मक कार्यक्रम उपक्रम या संस्थेमार्फत तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचावे यासाठी कटिबद्ध आहे.

( Various experimental program initiatives of the Maharashtra State Government are committed to reach the grassroots through this organization. )

10.आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण उच्च शिक्षण प्रशिक्षण संशोधन कौशल्य विकासात्मक कार्यक्रम रोजगार स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम नवीन रोजगार निर्मिती सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक  शैक्षणिक आणि औद्योगिक त्यांच्याशी निगडित असलेला योजना राबविणे.

( Using modern technology education higher education training research skill development programs employment self employment training programs new job creation socio economic political cultural educational and industrial related schemes.)


11. या योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचावा म्हणून विविध प्रसार माध्यमाचा उपयोग करणे. 

(To use various media to reach the masses of this scheme. )


12. लोककला लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य इत्यादी संदर्भात संशोधन व प्रशिक्षण प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध करणे.

(  To publicize research and training in the field of folk art, folk culture and folklore etc. through media.)

13. पारंपारिक लोककलेला प्रोत्साहन देणे.

(To promote traditional folk art.)

14.परंपरागत व्यवसायांना आर्थिक मदत करणे. विविध संधी त्यांना उपलब्ध करून देणे. 

( Financial assistance to traditional businesses.  Providing various opportunities to them. )


15. वाढत्या स्पर्धात्मक युगामुळे विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे.सुसज्ज ग्रंथालयाची निर्मिती करणे. अभ्यासिका तयार करणे ....त्यांना पुस्तक उपलब्ध करून देणे. त्यांची आर्थिक मदत करणे असे विविध उपक्रम संस्था राबविणार आहे .


( Conducting competitive examination for students due to increasing competitive age.Building well equipped library.  Creating a study guide ....making books available to them.  The organization will implement various activities to help them financially.)

16. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षेचे ऑनलाईन अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत सरळ सोप्या पद्धतीने पोहोचविणे. 
(..... To create online courses for competitive exams through social media and deliver them to students in a simple and straightforward manner) 

17.महिलांना विविध प्रशिक्षण उपलब्ध करून देणे .

     ( Providing various training to women )


18. स्पर्धात्मक परीक्षेचे राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर विविध परिषदे भरविणे आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विचार मंचावर संधी उपलब्ध करून देणे तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध परिषदेमध्ये सहभागी होऊन संस्थेची सर्वांगीण विकासाची समताधिष्ठ विचारसरणी प्रचार करणे.नवनवीन माहिती यामुळे जी संस्थेला मिळेल ते संस्थेमार्फत विविध उपक्रमाद्वारे जनसामान्यापर्यंत पोहोचविणे.

( Conducting various conferences of competitive examination at the state level and district level and through that providing opportunities for different thought forums and also participating in various conferences at the international level to promote the egalitarian ideology of holistic development of the organization. To convey the new information that the organization will get to the public through various activities through the organization.)



19.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याशी संबंधित असलेले विविध साहित्य प्रसिद्ध करणे. काही कारणाने अप्रकाशित राहिलेले साहित्य प्रकाशित करणे. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य भाषांतरित करून आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर पोहोचविणे.

( Publication of various materials related to Sahityaratna Annabhau Sathe.  Publish material which remains unpublished for some reason.  Translating the literature of Annabhau Sathe and bringing it to the international and national level )

20.      Contact @asarti. org,          917498509626
        

       अशा विविध उद्दिष्ट आणि ध्येयाने स्थापित झालेली अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (आर्टी )आहे.


3.
   अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था उद्दिष्ट पूर्ततेसाठी काही उपाययोजना :-

( Annabhau Sathe Research and Training Institute Some measures to achieve the objective )


            अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने स्थापन झालेल्या या संस्थेचे मूळ उद्देश केवळ अनुसूचित जाती आणि विशेषतः मातंग समाजातील युवकांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे आहे .ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील शेतकरी शेतमजूर बिराडी कामगार सफाई कामगार  स्थलांतरित ग्रामीण विद्यार्थी आणि कुटुंब इत्यादी याच्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था आग्रही आहे. 
       म्हणून शासनाने या संस्थेला एक मोठी जबाबदारी दिलेली आहे. 
         विकासाच्या मुख्य प्रवाहापासून समाजातील कोणताही वंचित घटक दुर्लक्षित राहू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा एक मोठा निर्णय आहे. सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक अशा विविध स्तरावर काही घटक दुर्लक्षित होत आहे हे संस्थेने महाराष्ट्र सरकारच्या निदर्शनात आणून दिले आणि संस्थेच्या प्रयत्नाने महाराष्ट्र सरकारने 2024 चा अर्थसंकल्पने संस्थेला मान्यता दिली.
      सोबतच अण्णाभाऊ साठे यांच्या मूळ गावी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प उभा करण्याचे काम या संस्थेने हाती घेतले आहे.
     
      सद्यस्थितीत "#डॉ. बाबासाहेब  आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था #बार्टी पुणे "
( Dr.  Babasaheb Ambedkar Research and Training Institute Pune) या संस्थेच्या मार्फत मंजुरी तात्पुरती स्वरूपात निधी उपलब्ध करून दिला गेला आहे. (याही संस्थेची माहिती या आधीच्या लेखांमध्ये तुम्हाला दिली आहे ते तुम्ही नक्की सर्च करा) 


    साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्य दिली गेलेली मान्यता संपूर्ण समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करणारी आहे. संस्था स्थापन करताना ज्या उद्दिष्ट आणि ध्येय पुरतेने आपल्या कामाला सुरुवात केली ते ध्येयपूर्ती उद्दिष्टे लवकरच मोठ्या प्रमाणात पूर्ण करण्यासाठी नवनवीन उपायोजना आपल्याला माहित होईल.
त्या संदर्भाची सविस्तर माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची माझा छोटासा प्रयत्न राहील.

         "अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था" यांच्या नावातच ,"मला लढा मान्य आहे रडगाणे नाही "हे वाक्य मोटिवेटेड करणारे आहे रडणाऱ्या फक्त रडत राहतात लढा देणारे नेहमी विजयाची पताका घेऊन चालतो  तिथे ध्येयपूर्ती असते तिथे आत्मसन्मान आत्म स्वाभिमान आत्मभिमान आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची सर्व अधिकार मिळते अण्णाभाऊ साठे यांच्यास कवितेच्या शब्दात सांगायचे तर ..." जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव...!"

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक  शेअर करायला विसरू नका .




✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक शेअर करायला विसरू नका .

==========================================================

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...