savitalote2021@bolgger.com

शनिवार, २९ मे, २०२१

तुला एक सांगू

****** तुला एक सांगू ******

नको वाटतो पाऊस 
आजही ...
आलेला पाऊस 
तू मला आवडत होतास 
खिडकीच्या काचेमधून बघताना 
चारही बाजूने बरसला ना 
वाटायचं 
मुक्त मी 
सुरेल आवाजात 
सुराने 

राहू दे!
आता याच आठवणीत 
मी म्हटलं ...
तुझ्यासारखी बरसेल मुक्त!
तु ही हटवादी ना? 
रडू दिले परत 
त्याच निराशेच्या कागदांवर 
माघार घेतली... 
लालबुंद झालेल्या नयनांनी 
पावलांनी 
चेहऱ्याने 
कोवळ्या गवतफुलांची झालेली 
आठवा परत 

आश्वासन 
घेऊन; आसवा संगे 
पण एक सांगू! 
तू आला की हसावसं वाटतं 
मनाला नक्की 
तुझ्या सारखे मुक्त 
बरसाव वाटतं 
नवीन आठवणींन सोबत 
तुझ्या बरोबर संवाद साधण्यासाठी 
पाऊस वेड्या ...
पावसाच्या आठवणीला 
आपलेसे करून,  
हसऱ्या बरसणाऱ्या सरी समोर!!!!

✍️©️सविता तुकाराम लोटे 

----------------------------------

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...