savitalote2021@bolgger.com

मराठी लेख मराठी कविता सुविचार ललित लेख मराठी चारोळी मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी लेख मराठी कविता सुविचार ललित लेख मराठी चारोळी मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

* प्रामाणिकपणा *Honesty *

          ***  प्रामाणिकपणा  ***

         प्रामाणिकपणाची प्रत्येक वेळी किंमत मोजावी लागते. कारण प्रामाणिकपणा हा त्या संस्कारावर अवलंबून असतो; जो स्वतः स्वतःवर केलेला असतो. म्हणून प्रामाणिकपणाची किंमत कोणीही करू शकत नाही. किंमत करणारा एकदा जिंकतो पण प्रामाणिकपणा आयुष्याच्या त्या क्षणापर्यंत सोबत राहतो जिथे आयुष्य संपलेले असते आणि उगवता सूर्य वाटेला येणारही नसते तरीही तो कुठेतरी जागाच असतो.  
         प्रामाणिकपणा हा त्या कर्माच्या हिशोबा सारखा आहे, जे कर्म आयुष्याच्या नंतरही सोबत असते असे म्हणतात. कडुलिंबाची चव कधीही गोड होत नाही. साखरेची चव कधी कडू होत नाही. पाणी कोणत्याही रूपात असले तरी पाणी आपले स्वरूप बदलवतो पण गुण नाही तसेच प्रामाणिकपणा आहे.         
           प्रामाणिकपणा हा त्या माणसाचा आधारस्तंभ असतो. समोरचा कितीही फुगला स्वार्थाने अहंकाराने अविश्वासाने  कडू शब्दांनी तरी तो प्रामाणिकच असतो आणि प्रामाणिकपणाची किंमतच त्याला चुकवावी लागते.
                आयुष्याच्या अशा वेळेला जो वेळ त्याला सोन्याहूनही महत्त्वाचा असतो तरी प्रामाणिक माणूस प्रामाणिकपणे त्या वेळेला सोबत देत असतो.   हेच प्रामाणिकपणाचे जिंकणे असते आणि तो जिंकतोच..!

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

=============================



*** Honesty ***

 Honesty always pays.  Because sincerity depends on that culture;  Which is self-inflicted.  So no one can put a price on honesty.  The pricer wins once but honesty stays with him until that moment of life where life is over and the rising sun is nowhere to be seen.
 Honesty is like the reckoning of karma, which is said to follow after life.  The taste of neem is never sweet.  Sugar never tastes bitter.  In whatever form water is, water changes its form but has no quality, so does sincerity.
 Honesty is the pillar of that man.  No matter how much the front is inflated with selfishness, arrogance, mistrust, bitter words, he is honest and he has to pay the price of honesty.
      At such a time of life when time is more important than gold to him, an honest man spends his time honestly.  This is the winning of honesty and it wins..!
        ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=============================


 

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...