आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, दलितांचे कैवारी, आरक्षणाचे अग्रदूत, बहुजन प्रतिपालक, सामाजिक क्रांतीच्या उत्थानासाठी ब्राह्मणवादी विचारसरणीला समूळ नष्ट करण्याचा विडा उचलणारे, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, पुरोगामी राजा, बहुजनाचे कैवारी, बहुजन हिताय बहुजन सुखाय या न्याय तत्वावर चालणारे, सामान्य माणसातील विकासाचे शक्तीस्थळ, औद्योगिक क्रांतीत गरुड झेप घेणारे एक वादळ छत्रपती शाहू महाराज!!
छत्रपती शाहू महाराज आणि सामाजिक समता हे समीकरण फार महत्त्वाचे आहे. शाहू महाराजनी आयुष्यभर बहुजन समाजासाठी कार्य केले. एक नवविचारांची प्रयोगशील राजे समाजसुधारक कृतीशील राजा विचारवंत संशोधक होते.
व्यवस्था परिवर्तनासाठी
शिक्षणाची धरली साद
सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी
सक्ती शिक्षणाची, दारे उघडी केली
सामान्य माणसांच्या अंतकरणात कायमस्वरूपी लोकराजा रयतेचा राजा सामान्य माणसाच्या उद्धारासाठी वापर करणारा सहज सोप्या भाषेत तळागाळातील जनतेपर्यंत आपल्या आधुनिक विचार पोचविणारा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती 26 जून ला सामाजिक न्याय दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते.
बहुजनांच्या विकासाचे शक्तीस्थळ छत्रपती शाहू महाराज यांचे विचार नवीन दिशा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे शाहू महाराज सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय धार्मिक कृषी सहकार इत्यादी क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. छत्रपती शाहू महाराज आरक्षणाचे प्रणेते होते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार पुरोगामी राजा होय.
कोल्हापूरचे शाहू महाराजांचा जन्म २६ जून१८७४ मध्ये कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव आणि आईचे नाव राधाबाई होते. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते तीन वर्षाचे असतांना आईची माया हरवली. कोल्हापूरचा राजा शिवाजी चतुर्थीच्या विधवा आनंदीबीने त्यांना दत्तक घेतले. त्या काळातली दत्तक नियमानुसार मुलांच्या रक्तात भोसले घराण्याचे रक्त असेल तरच त्यांना दत्तक घेण्याची मान्यता होती आणि यशवंतराव यांचे कुटुंब भोसले रक्ताचे होते.
शाहू महाराजांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून प्रिन्स कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केले. १८९४ राज्यभिषेक झाला त्यावेळी ते वीस वर्षाचे होते आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याला एक नवी दिशा मिळाली. शाहू महाराजांचे लग्न बडोद्याच्या लक्ष्मीबाई खानविलाकर यांच्याशी झाला.
अंधारातील वाटेला प्रकाश तू
मन परिवर्तनाचा पायात तू
स्पर्श झाला तुझा...
नवविचारांचा दिशेने बदलली
समाजव्यवस्था नवनिर्मितीच्या नवीन पाऊलखुणांच सोबत..
रयतेचा राजा तूच
समानतेचा राजा तूच
१८९४ ते १९२२ या २८ वर्षाच्या काळामध्ये कोल्हापूरच्या गादीवर होते. ही कारकीर्द कोल्हापूर संस्थानातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानले जाते. कारण शाहू महाराजांनी फक्त राजा म्हणून राज्य केले नाही. तर आपल्या साम्राज्यात अनेक सामाजिक सुधारणा केल्या खालच्या जातीसाठी बरीच कामे केली. त्यांचे श्रेया छत्रपती शाहू महाराजांना जाते. संस्थांना साक्षरतेचे प्रमाण कमी होते मागासलेला समाज स्पृश्य-अस्पृश्य जातीवादाने पोखरलेला होता समाज शिक्षण सत्ता संपत्ती ज्ञान या गोष्टी पासून वंचित होतात का त्यांचे सतत शोषण होत होते सुशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला.दुर्लभ घटकांसाठी ५० टक्के आरक्षण सर्वप्रथम महाराजांनी दिले. २६ जुलै १९०२ मध्ये त्यांनी लंडनमधून आदेश काढून क्रांतिकारी पाऊल शाहू महाराजांनी उचलले.
महाराष्ट्राच्या इतिहासाला एक अमूल्य रत्न मिळाले. सामाजिक सहरचना ही मानवतेवर समानतेवर आधारित असावी. या विचारांना त्यांनी आपले कार्य सुरू केले. सामाजिक चातुर्यवर्ण व्यवस्थेमुळे आर्थिक सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक शेती खेळ स्त्रियांचे प्रश्न इत्यादी क्षेत्रामध्ये बहुजनांचे शोषण केल्या जात होते पाणी रस्ते शेती कला व्यापार ह्या मागास होता महाराजांनी आपल्या रंजल्या-गांजल्या लोकांसाठी सत्तेचा उपयोग सुधारण्यासाठी केला नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली.
शिक्षण माणसाच्या प्रगतीचा पाय आहे. प्राथमिक शिक्षण ही सर्वात महत्वाची प्राथमिकता असावी म्हणून शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. छत्रपती शाहू महाराज यांनी शिक्षणावर भर दिला. आपल्या साम्राज्यात अनेक सामाजिक सुधारणा सुरु केल्या. खालच्या जातींसाठी बरेच समाज प्रयोगी सुविधा खालच्या जातीसाठी सुरू केला.
शिक्षण जनसामान्यांपर्यंत पोहोचावे त्यासाठी शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले. जातीपातीच्या संघर्षाच्या लढाईमध्ये त्यांनी सर्वप्रथम शिक्षण शस्त्र उपयोगात आणले. त्यांनी सर्व जातीच्या लोकांसाठी शाळा काढल्या.मिस क्लार्क बोर्डिंग हे वसतिगृह उभारले. अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयीसाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या. शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहित केले. महाराजांनी १९०७ ते १९१६ या काळात सक्तीचे प्राथमिक शिक्षण केले गेले प्राथमिक शाळा महाविद्यालय उघडण्याचा आले रंजल्या गांजल्या बहुजन समाजाला शिक्षणाची दारे उघडी करण्यात आली. १८ फेब्रुवारी १९०७ रोजी राधानगरी धरण सुरू केले. हा प्रकल्प १९३५ मध्ये पूर्ण झाला. धरणाच्या परिसरातील जनतेच्या पाण्याची संपूर्ण व्यवस्था झाली.
राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. बहुजन समाजाला त्यांचे राजकीय हक्क देण्यासाठी १९१६ मध्ये डेक्कन रयत असोसिएशन संस्थेची स्थापना निपाणी येथे केली. १९१८ साली त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी १९१९ मध्ये स्वर्ण व अस्पृश्य या दोघांनाही एकत्र आणण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. समाजातील सर्व विद्यार्थ्यांना एकच शाळा असावी या विचारातून त्यांनी एकत्र शाळा भरविल्या. व्यवसायिक शिक्षण शाळेमध्ये देण्यास सुरुवात केली. तंत्र व कौशल्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रम त्यांनी राबविले. अस्पृश्य समाजातील लोकांना उपहारगृहे हॉटेल दुकाने काढण्यास आर्थिक साहाय्य केले.
१९२० मध्ये घटस्फोटाचा कायदा केला.
दाविली वाट आरक्षणाची
प्रगतीसाठी.....पहिली
जागविला मानसन्मान
तयांच्या विचारधारेने
शूद्र अतिशूद्रांचे जीवन
केले सन्मानाचे
प्रहार केला अंधश्रद्धा
कर्मकांड... दैववादावर
प्रहार ब्राह्मणवादी विचारसरणवर
विश्वास धरिला नव तंत्रज्ञानावर
मूलनिवासी आम्ही
अधिकार आम्हा आमच्या
प्रगतीचा...
दिला मानसन्मान तू
दलितांचा राजा ...
..........दलितांचा राजा
संस्कृत भाषेवर फक्त उच्चवर्णीयांचा अधिकार आहे. अशा मानणाऱ्या समाजामध्ये त्यांनी संस्कृत भाषेच्या विकासासाठी संस्कृत शाळा सुरू केल्या आणि समाजातील प्रत्येक जातीतील विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा खुली करून दिली.
महाराजांनी समाजातील प्रत्येक समाज वर्गाची प्रतिष्ठा वाढावी वर्षानुवर्ष ज्या समाजाला गुलामगिरीचे अस्पृश्य म्हणून प्रत्येक हक्कापासून वंचित ठेवले हा कलंक घालवावा यासाठी त्यांनी विविध उपाययोजना केले. त्यांचे प्रयत्न विशेष मोलाचे होते. महाराजांनी महार वतने नष्ट केली. रामोशी यासारख्या जातीच्या लोकांना रोज पाटलाकडे वर्दी द्यावयास लागे त्या पद्धती रद्द करण्यात आला मोटार चा ड्रायव्हर चाबूक स्वार माहूत हे महार असावे असे आदेश काढण्यात आले. छत्रपती शाहूमहराज समाजातील सर्व स्तरावरील समानतेचे पुरस्कर्ता होते.
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून वेदोक्त संघर्ष शाहू महाराजांच्या कळात झाला. वेदोक्त प्रकरणावरून त्यांना जातीयतेचा अनुभव आला माझ्यासारख्या राजा बरोबर हे असे वागू शकतात तर सामान्य माणसाचे काय खरे आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात एका नवीन सामाजिक सुधारणावादी वादळाची सुरुवात झाली.
छत्रपती शाहू महाराजांनी स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना केली. शेतकऱ्यांसाठी बाजारपेठेचे आणि व्यापारपेठेची स्थापना केली गुळाच्या बाजारपेठेची निर्मिती त्यांनी केली गोरगरीब जनतेसाठी विविध उपक्रम संस्थांना मार्फत राबविण्यात आले सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आले संस्थान आर्थिक सहाय्यता देण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत असे शेतीसाठी आधुनिक शेती विषयक संशोधनाचा प्रकल्पांना मान्यता दिली शेतीमध्ये आधुनिक उपकरणाच उपयोग करावा हे आग्रही भूमिका शाहू महाराजांची होती त्यासाठी त्यांनी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूटची स्थापना केली.
छत्रपती शाहू महाराज यांची ओळख भीमराव आंबेडकर यांच्याशी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्यबद्दलच्या महान क्रांतिकारक विचारांशी शाहू महाराज सहमत होते. डॉ. आंबेडकर यांच्या सर्वांगीण क्षेत्रातील विचारांना समर्थन देत. सामाजिक जातीभेदाचे रूढी प्रथा परंपरेचे नकारात्मक झाडे समूळ उच्चाटन करण्यासाठी शाहू महाराजांनी सतत डॉ. आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहिले. १९२० रोजी त्यांनी अस्पृश्यांच्या सुधारणेसाठी एक परिषद आयोजित केले. आणि छत्रपती शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांना अध्यक्ष बनविले. कारण त्यांना विश्वास होता की डॉ. आंबेडकर समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी काम करणारे नेते होते आणि करत राहतील. शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांचे वृत्तपत्र 'मूकनायक' सुरू करण्यासाठी देणगी दिली.
डॉ. आंबेडकर यांना "सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ ", असे समर्पक शब्दात वर्णन केले. छत्रपती शाहू महाराज माझ्यानंतर अस्पृश्यउद्धारक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच असतील. असा मोठा मानाचा राजा होता. जो आपल्याला आज विविध क्षेत्रात शोधूनही सापडणार नाही म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांना यशवंतराव चव्हाण यांनी मोठ्या दिलाचा राजा असे म्हटले आहे.
महाराज यांनी फक्त कोल्हापूर संस्थान यासाठी कार्य न करता संपूर्ण महाराष्ट्रासाठी कार्य केले. कोल्हापूर संस्थानाचे राजे असूनही सामाजिक प्रतिष्ठा जपत नवविचारांची कास धरत छत्रपती शाहू महाराजांनी लोकशाही पद्धतीने सर्वव्यापक राज्यकारभारा चालविला. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत लोककला चित्रपट चित्रकला यांनाा राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. यामुळे या क्षेत्रातील कलाकारांसोबत याा कलेचा विकास होत गेला.
छत्रपती शाहू महाराजांनी औद्योगिक क्षेत्रात गरुड झेप घेत सूतगिरण्या कापड गिरण्या सुरू केल्या उद्योगाला प्रोत्साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर बेळगाव येथे स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक मदत देऊ केली.
आधारस्तंभ बहुजनांचा
समानतेची दारे खुली
करून नसानसात नैतिकता
निर्माण केली सकारात्मक
वैचारिक विचार जागृत केले
गुलामगिरीच्या महाजाळ्यातून
मुक्ती केली ....शिक्षणाच्या दाराने
जगण्याचा अर्थ समजून
दिला गोरगरीब जनतेला
कलेला राजाश्रय
स्त्री उन्नतीचा मार्ग दाविला
मल्ल विद्येची पंढरी
आरक्षणाचा अग्रदूत आमच्या
सामाजिक क्रांतीची मशाल
नवविचारांची
संपूर्ण महाराष्ट्रात कलांचा विकास होत गेला. महाराष्ट्रासोबतच कलाकारांनी ही कला संपूर्ण भारतभर विस्तार केला. छत्रपती शाहू महाराजांनी लेखक नवीन विचारवंतांचेे कलाकार संशोधन यांनाही प्रोत्साहन दिले. कोल्हापूरला "मल्ल विद्येची पंढरी",असेे म्हटले जात असे. कारण छत्रपतींनी कुस्ती या खेळाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. पुरोगामी राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समानतेवर आधारित राज्य निर्माण केले म्हणूनच यशवंतराव चव्हाण," छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या दिलाचा राजा म्हणतात".
छत्रपती शाहू महाराज यांच्या या सर्वव्यापक कार्यामुळेच कानपूरच्या कूर्मी क्षत्रिय समाजाने त्यांना 'राजर्षी', हि पदवी बहाल केली.
छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकशाहीवर आणि समानतेवर आधारित राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीवादी समाजकंटक लोकांनी महाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यशस्वी झाले नाही कारण जनतेचे प्रेम आणि प्रार्थना त्यामुळे ते सुखरूप राहिले. त्यांना विविध कारणावरून समाजामध्ये बदनाम करण्याचा अपप्रचार करण्याचा खूप प्रयत्न केला गेला पण शत्रूंचे सारे प्रयत्न विफल ठरले.
" एक वेळ गादी सोडीन पण बहुजन समाजाच्या उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही" असे महान विचारवंत सामाजिक क्रांतीचे अग्रदूत समाजाचे कार्य करणारे, महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीवादी समाजसुधारक इतिहासातील एक अमूल्य रत्न छत्रपती शाहू महाराज यांचे ६ में १९२२ रोजी निधन झाले.
✍️🏻©️सविता तुकाराम लोटे
©️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- दलितांचे कैवारी सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती शाहू महाराज
*अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा *
Thank you
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा