savitalote2021@bolgger.com

मराठी आर्टिकल मराठी लेख दलित साहित्य मराठी साहित्य आयुष्य साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी आर्टिकल मराठी लेख दलित साहित्य मराठी साहित्य आयुष्य साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

शेवटच्या श्वासाच्या पूर्णविरामानेच **


** शेवटच्या श्वासाच्या पूर्णविरामानेच **

  365 दिवसा मधून एखादा दिवस एखाद्या महिन्याची एखादी तारीख वर्षातला एखाद्या महिन्यातल्या एखादा दिवस हा त्रासदायक असतो. प्रत्येक वेळी हे नव्याने अनुभवायला येत आहे. तो दिवस आपल्यासाठी त्या दिवसापेक्षाही तो दिवस तारीख तो क्षण डिलीट झालेला असतो तरीही अलगद आपल्या डोळ्यासमोर येऊन जातो. कदाचित तोच दिवस दुःखाचा असेल...! दुःखाची पहिली ठिणगी असेल...! तो दिवस शब्दातही व्यक्त होत नाही. भावनेमध्येही व्यक्त होत नाही, आणि कोणत्याच दुःखालाही तो अभिप्रेत असू शकत नाही. इतका तो दुःखद क्षण... ती तारीख ....ती वेळ ....त्या दिवसाठी फक्त एवढेच शब्दात लिहावेसे वाटते कवितेच्या माध्यमातून....💔,

दुसऱ्याच्या वेदनेच्या पहिल्या पुस्तकाचे 
पहिले पान, पहिला धडा
 तो दिवस असतो
 आयुष्याच्या स्वप्नांच्या शेवटच्या 
पानासाठी 
यातना कमी होत नाही 
दुःख कमी होत नाही 
सुखाची चाहूल दिसत नाही 
पण क्षणात झालेल्या यातना 
कदाचित अश्रूंसोबत वाहत जातो 
गालावर आणि सर्व काही संपते
संपेल शेवटच्या श्वासाच्या 
पूर्णविरामानेच त्या दिवसाच्या 
सोहळ्यानंतर...!! 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹



==========================================================

त्याच हसू

** त्याच हसू ** त्याच हसू  मनाला जगण्याचे बळ देते  रित्या मनाला स्वप्नाची पायवाट न दाखवता  जगण्याची रीच शिकवते  त्याच हसू  चेहऱ्यावर स्माईल ...