पूर्णविराम द्यावा लागतो काही स्वप्नांना मी नेहमी इथून जात असताना वाटायच की त्या गेटच्या आत मी जाईल... मी माझा स्वप्नाची वाट पूर्ण करेल... जिद्दीने ...मेहनतीने.... पण पूर्णविराम द्यावाच लागला त्या स्वप्नांना...?
त्या गेटच्या आता कधीच जाता येणार नाही. स्वाभिमानाने होईलच या शब्दापासून चालू झालेला प्रवास आता थांबावा लागला आहे. बाबाच्या शब्दात सांगायच तर "आता राहू दे!",
"होईलच", या शब्दापासून चालू झालेला प्रवासात ,"राहू दे..", इथपर्यंत मेहनत ही आता संपलेली आहे आणि अचानक त्या गेट समोरून जाताना मागचे सर्व स्वप्न जागे झाले. उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न त्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र कोणतीही किंमत चुकवायला तयार असलेले ( MPSC) एमपीएससीचे सर्वच विद्यार्थी पण ते स्वप्न एका वेळेनंतर पूर्णविराम कडे जाते आणि ते होत नाही त्यावेळी ते शब्द शब्दात मांडता येत नाही.
त्या भावना शब्दात मांडता येत नाही. देवळातला देव त्यावेळी पाठीशी नसतो 0.01% साठी चालू असलेला हा प्रवास कधीतरी थांबतो. अयशस्वीतेकडे गेलेला त्यावेळी त्या विद्यार्थ्यांची का स्थिती असेल हे मी लिहिताना अनुभवत त्या सर्वच विद्यार्थ्यांच्या मनातले ही भावना माझ्याही मनात आहे. डोळ्यात पापणी आड होतात परत नवीन स्वप्नांचा प्रवास चालू करावा लागेल. अपयश कुणासाठी थांबत नाही आणि यश हे कुणासाठी धावत नाही. जे स्वप्न होते ते त्या सोबत मागे पडले पण बसचा प्रवास तसाच चालू आहे. त्या गेटच्या आत जाण्याचा प्रवास कुठेतरी थांबला .... ती स्वप्न थांबली पण ती जिद्द मेहनत अनुभव तू कुठेही थांबणार नाही. डोळ्यातले अश्रू गालावर येतात दुसऱ्या हाताने आपण पुसून टाकतो पण ती भावना आपल्या मनात तसेच ओलावून राहते. कोपरा शब्दांच्या लटपट त्या हातानासोबत कागदावर उतरत राहते. पूर्णविरामचा आलेख पूर्ण होतो. असो, मागे वळून पाहताना आपण जी मेहनत केली तिला कोणीही शून्यात पाहिल पण आपल्याला माहित आहे आपली मेहनत ....आपली जिद्द आपण कशासाठी आणि का?? यासाठी या स्पर्धेत उतरले. यश प्रत्येकाच्या हाताला लागते असे नाही पण ते हाताला लागावी म्हणून केलेली मेहनत ही कधीही वाया जात नाही. ही एक सामाजिक बांधिलकी आपल्या वाटेला या मेहनतीमुळे या जिद्दीमुळे आलेली असते. कुणाला आपल्याकडे शून्य आहे अस वाटत असले तरी होईलच हा जो शब्द आहे तो सत्यात उतरविण्यासाठी जी मेहनत रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करण्याचा जो अट्टाहास आहे त्याने माणूस प्रगत होत जातो.
जगात बोट दाखविणारे खूप आहे कारण सर्व आयत मिळाल्यावर ते बोट सहज कुणाकडेही फिरतात. तो समाज ....ही व्यक्ती ....ती मानसिकता ....सगळी आयत खाऊ असते म्हणून अपयशाने खचायच नाही. " हे मी त्या गेट कडून शिकले." स्वप्न होत पण ते कुठेतरी मागे पडले कारण कोणतेही असो पण मी कमी पडले हे मात्र नक्की.
म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मित्र-मैत्रिणींना एकच सांगणार आहे .अपयश हे घेऊनच स्पर्धा परीक्षांमध्ये उतरायचे असतो. यश हे आपण स्वतःसाठी कमवत असतो त्यासाठी खूप स्वप्न खूप इच्छा एक एन्जॉयमेंटच्या वयामध्ये किंवा बेधुंद जगण्याच्या वयामध्ये आपण या स्पर्धेकडे वळतो हेच खऱ्या अर्थाने आपण जिंकलेले असते म्हणून जिद्द कोणी सोडू नका.
होय ते होईल आणि," होईलच", या शब्दाच्या पाठीमागे शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहा. संघर्ष करत राहा. ते गेट आपल्या स्वागतासाठी कधीही तयार आहे. कारण त्या आज जाण्याचे स्वप्न म्हणजे तुम्ही माणूस म्हणून जगण्याच्या त्या प्रत्येक पायरीवर यशस्वी होण्याच्या मार्गाकडे जाणाऱ्या तो मार्ग आहे. ते वळण आहे... बसमधून जाताना त्या मार्गाने प्रवास करताना ते गेट दिसले की सर्व स्वप्न जागे होता. लावलेल्या मनाने परत स्वप्नाची नवीन पायवाट तयार करावी लागणार आहे. या वळणावर स्वबळावर हो इच्छेने जिद्दीने आणि मेहनतीने पण नवीन पायवाटेवर होईलच या शब्दाने आणि पूर्णविराम हा कोणत्या स्वप्नांना नसते हे मला लिहिताना परत अनुभवाला आले. कारण जी मेहनत जो विश्वास जो एकोपा त्या अभ्यासाने निर्माण केला त्यामुळे कोणत्याही अनुभवासाठी हे मन तयार असते कारण जिद्दीने उभा केलेला विद्यार्थ्यांचा हा प्रवास तो स्वतः तयार केलेला असतो. स्वखुशीने तयार केलेला असतो. म्हणून होईलच आणि शेवटपर्यंत होईलच या शब्दांवरच चालत राहा.
स्पर्धा परीक्षा हे खचवणारी गोष्ट नाही... खच्चीकरण करणारी गोष्ट नाही तर स्पर्धा परीक्षा ही एका विद्यार्थ्याला स्वयंपूर्ण बनवणारी गोष्ट आहे. ती व्यक्ती मेहनती...ती व्यक्ती स्वयंभू व्यक्ती बनवणारी गोष्ट आहे म्हणून ज्यांनी पूर्णविराम दिला आहे त्यांनी सुद्धा आपण काहीतरी करत होतो हे नेहमी लक्षात ठेवा. पूर्णविराम फक्त त्या स्पर्धेसाठी आहे. आतल्या विद्यार्थ्यांसाठी नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ,"मी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहील." हे वाक्य आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वतःच्या मेंदूत आणि मनात कोरून ठेवा. कारण दुसरी पायवाट परत आपली वाट बघणार आहे. आपण केलेली मेहनत त्यासाठी केलेले कष्ट हे तिथे वापरू या...!
यश अपयशाच्या या शिदोरी मध्ये स्वतःला कुठेही कमी लेखू नका. पूर्णविराम हा त्या स्पर्धेसाठी आहे. हसत्या खेळत्या आनंदी आयुष्यसाठी वाहत्या पाण्याला खळखळाट फार असते तसाच आपल्या आजूबाजूच्या जगाला आपल्यावर हसण्यासाठी खूप वेळ आहे आणि आपण सुद्धा त्यांसोबत हसण्याचा सराव करू या..!! पण इतरांवर नाही तर स्वतःवर हसण्याचा त्यांच्यासोबतच नवीन पायवाट तिला जिद्दीने आणि मेहनतीने यशाच्या मार्गावर नेण्यासाठी..!💕
✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
--------------------------------------------------------------------------