savitalote2021@bolgger.com

बुधवार, ९ एप्रिल, २०२५

गुलाब

*** गुलाब ***
कळलं का कुणाला 
हा गुलाब कुणाचा होता 
टवटवीत फुललेला सुगंधाने 
मंत्रमुग्ध करणारा 
हृदयाच्या स्पंदनाना 
शांत निर्मळ पवित्र अशा 
आसमंतात घेऊन जाणारा 

कळल का कुणाला 
हा गुलाब कुणाचा होता 
रात्रीच्या अंधारात कुणी ठेवला 
असेल दाराजवळ यामागचा 
काय प्रयोजन असेल 
कवितेत असेल की शब्दात 
असे की बस सहज 
कुणीतरी कुणाच्यातरी 
मर्जीनुसार मस्तीखोर 
स्वभावात असेल 

कळल का कुणाला 
हा गुलाब कुणाचा होता 
हसणे हसण्यातच दिवस गेला 
गुलाबाचे रहस्य तसेच होते 
पण आमच्या गालावरची लाली मात्र
...... गुलाबासारखीच होती 
कळल असेलच, कुणाला तरी??
 तो गुलाब कुणाचा असेल! 
आता तो गुलाब माझ्याच 
पुस्तकांच्या सोबत आहे 
पण कळलेच नाही कुणाला 
तो गुलाब कूणासाठी होता 
म्हणून गालावर स्मित हसू येते 
माझच मला गुलाबासारखे 
लाल झालेल्या माझ्या 
गालावरील रंगाच्या...!!❤🤣

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...