*** सोहळा ***
हजार वर्षाचा इतिहास सोनेरी पानाने
लिहिणाऱ्या माझ्या बापाची जयंती
अन्यायाविरुद्ध बंड करणारा
अमानुषतेचा सागरावर बंड करणारा
रूढी परंपरेला मुठमाती देणारा
माझ्या बापाची जयंती
तहानलेला पाणी देणारा
आसमंत निळा पाखरांचा थवा
नव्या दमाच्या नव्या प्रगतीचा
नव्या सृष्टीचा निर्माता
व्यवस्थेला आपल्या ज्ञानाच्या ज्योतीने
मोकार सुटलेला परंपरेला स्वार्थी
उद्याच्या - आजचा सूर्य दाखविला
धर्माच्या गुलामगिरीला संविधानाने लोकशाहीने
नष्ट केला त्या हजारो वर्षाच्या
बदलविणाऱ्याची जयंती
चला नाचू गाऊ सोबत
ज्ञानाची ज्योत लावू
पुस्तकाचे महत्व समजून सांगू
डीजेच्या तालावर ताल धरताना
पुस्तकाची किंमत जगाला सांगून देऊ
शाळा नावाचा इमारत काय असते
शिक्षणाची धुरा सांभाळताना आमची
म्हणून चला नाचू गाऊ या
घर सजवूया अंगणात रांगोळीचा
बहरदार रुबाबदार असा
बाबासाहेबांचा जय भीम चा घोषवाक्य
लिहू या
विटाळ्याचा सावलीचा अभिमान
असणाऱ्या समाज व्यवस्थेला
माझ्या बापाच्या जयंतीचा सोहळा
दाखवू या...!!❤
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
============================