savitalote2021@bolgger.com

मराठी कविता दलित साहित्य दलित कविता बाबासाहेबांच्या कविता मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कविता दलित साहित्य दलित कविता बाबासाहेबांच्या कविता मराठी साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

माणूसपण ( विद्रोही कविता )

      मी मानतो माझ्या खरा इतिहास , कारण त्या इतिहासामुळे भाग्यविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उन्हाची दाहकता सावलीमध्ये परिवर्तित केली दीक्षांतरानंतर नव आरंग नवयुगाचा आत्मसन्मानाने जगण्यासाठी. सामान्य माणसाला समानतेची  पायवाट  आत्मसन्मान आत्मविश्वास ....!!❤
      कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद..💕💕

**माणूसपण**

मी मानतो माझा 
खरा इतिहास विचारांचा 
जळलेल्या वर्णव्यवस्थेचा 
चालीरीतींना मूठमाती देणारा 
धर्मनिरपेक्षतेकडे नेणारा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास संघर्षाचा ज्वालांचा 
जळजळीत इंजन देणार 
अंधश्रद्धेला पायदळी तुडविणारा  
विषमतेला खोल दरीत फेकणारा 
समानतेच्या वाटेवर चालणारा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास मुळासकट वर्णव्यवस्थेला 
जाळून टाकणारा 
प्रश्नांच्या प्रत्येक प्रश्नांना 
उत्तर देणारा 
माणसातील माणसाला सजीव करणारा 
पंचशीलाच्या शब्दानी जग जिंकणारा 
म्हणून लिहिते आहे सविता
नवा आरंभ नवयुगाचा 
नवा धम्म क्रांतीचा 
माणुसकीचा माणसातल्या 
माणसातील अस्तित्वाचा 

मी मानतो माझा 
खरा इतिहास इतिहासातील 
पानांमध्ये शूरवीरांच्या पिढ्यांचा 
आरंभ नवयुगाचा 
आरंभ नव्या महास्फोटाचा 
आधुनिकतेच्या विचारांचा 
आधुनिकतेच्या महाज्योतीचा

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------


* संघर्षाच्या प्रवासात *( महिला दिनविशेष कविता)

स्त्री म्हणजे संघर्षाची कहाणी आहे. स्त्री या शब्द सर्व विश्व सामावलेले आहे. याच पार्श्वभूमीवर ही कविता ......याच भाव संवेदनेतून ही कविता.   ...