savitalote2021@bolgger.com

रविवार, ६ एप्रिल, २०२५

नियम

*** नियम ***

सुकलेल्या फुलांची जागा 
आता नवीन ताजे टवटवीत 
फुल घेतील 
पण सुकलेल्या 
फुलांचा काय? 
 तेही आदल्या दिवशी तसेच होते..!
 असो हा निसर्ग नियम 
तरीपण कधी कधी हा नियम 
कुणासाठी लागूच होत नाही 
कदाचित हेच कर्म आहे 
कदाचित हाच निसर्ग 
नियमाचा कर्माचा हिशोब आहे
आयुष्याच्या रंगमंचावर 
वर्तुळाच्या चक्रासारखा

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

      आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

============================

बहरले मी

*** बहरले मी ***

रंगात रंगले मी 
मुक्त बहरले मी 
मुक्त बरसले मी 
त्याच्या रंगात रंगूनी मी 

क्षितिजा पलीकडे मन हलके 
जणू मिळाले नवेच पंख 
सोबत त्यांच्या रंगात रंगले 
त्याच्या स्वप्नाच्या वाटेवर
 
अपूले स्वप्न पाहिले 
हसत खेळत नकळत 
चालत राहिले सूर जूळवूनी 
प्रतिबिंब तोच माझा 

हृदयस्पंदने तेच माझे
नयनातील स्वप्नांसोबत 
विसरूनी भान आता 
 परतावे, परत वाटत नाही 

स्वतःच्या रंगविलेल्या स्वप्नांकडे 
आता पाऊलखुणा दिसत नाही 
मुक्त बहरलेला माझ्याच 
मला...💕💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

मी आहे

*** मी आहे ***

स्वातंत्र्याच्या वादळाबरोबर 
लढलेली मी आहे 
अस्तित्वाच्या प्रश्नांचे 
उत्तर मी आहे 
उजळून माझ्या आयुष्याच्या 
भाग्यरेषा 
तरी लढा ही सुरू आहे 
नियतीच्या खेळाबरोबर 
चौकटीचा राजासोबत 
पण जिंकणार हे अस्तित्वाचा 
वादळ आहे 
थकलेले वाटत असेल 
कधीतरी तरी 
सुगंधित अत्तराचा फुललेला 
प्रवास आहे 
स्वातंत्र्याच्या वादळाबरोबर 
लढलेली  मी आहे

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

          ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

त्याच्यात गुंतने

*** त्याच्यात गुंतने *** जितके टाळावे वाटते  तितके तुझ्याकडे चालली  आहे गुंतत त्याच काठावर बसून  कुठल्यातरी नात्याची  जोड देत आहे  तू समजू न...